मागची तीन चार वर्ष डोक्यात घोळत असलेला नेपाळ सफारीचा योग आता जुळून आला. त्याचा हा भ्रमण वृत्तांत.
आमच्या सोसायटीतल्या गाड्या धुणारी नेपाळी मुलं वर्षातून एकदा त्यांच्या घरी नेपाळला जातात. त्यांच्या बरोबर नेपाळला जाऊन यायचा किडा माझ्या डोक्यात कधीतरी घुसला. आमच्या गाड्या धुणाऱ्या विवेक कडून कळले कि दरवर्षी एप्रिल मध्ये, जेव्हा नेपाळी नवीन वर्ष सुरु होते, तेव्हा तो आणि त्याचे सहकारी नेपाळला आपापल्या गावी जातात. मला बरोबर घेऊन जायला ह्यावर्षी विवेक तयार झाला. विवेकच्या गावापर्यंत एकत्र जायचे आणि मग तिथून पुढे माझी नेपाळ सफर, असा बेत ठरवला. पुणे ते दिल्ली विमान तिकीट तीन हजार होते. विवेकचे दोन नेपाळी साथीदार बरोबर यायला तयार झाले. आमच्या चौघांची तिकिटं काढली (प्रत्येकाने आपापल्या खर्चाने). दिल्लीहून बसने नेपाळ मध्ये एन्ट्री करून विवेकच्या गावापर्यंत जायचे ठरवले.
मग मी परतीच्या प्रवासाचे विमान तिकिट काढले बागडोगरा ते पुणे. नेपाळच्या पश्चिम भागातून सुरुवात करून पूर्व भागातून बाहेर पडायचे. तिथून बागडोगरा विमानतळ तासाभराच्या अंतरावर. असा बेत बनवताना गूगल मॅप्स ची फार मदत होते.
विवेकच्या गावापासून पोखराला जाण्यासाठी एक दिवस, पोखरामध्ये दोन दिवस, पोखरा ते काठमांडू प्रवास एक दिवस, काठमांडूमध्ये एक दिवस, आणि काठमांडू पासून बागडोगरा पर्यंत एक दिवस असा बेत ठरवला. हॉटेल बुकिंग केली नाहीत. हॉटेल बुकिंग केली तर flexibility निघून जाते. आणि नेपाळमध्ये मी पहिल्यांदाच जात असल्याने तिथल्या प्रवासांना किती वेळ लागतो ह्याचे गणित माहिती नव्हते. नेपाळ मध्ये राहणाऱ्या एका मित्राच्या मित्राला विचारून हॉटेल बुकिंग करण्याची गरज नाही हे पक्के केले.
विकिपीडिया, विकीव्हॉयेज, ट्रिप ऍडव्हायजर इत्यादी धुंडाळून जमेल तेवढी माहिती गोळा केली. पण शेवटी प्रत्यक्ष जाऊन फिरण्याचा अनुभव तो वेगळाच.
हौशी आणि नवख्या पर्यटकांसाठी सावधानतेचा इशारा - प्रदेशाची योग्य माहिती करून घेतल्याशिवाय एकट्याने भ्रमण (solo travel) करणे धोक्याचे ठरू शकते. साहसाला सावधतेची जोड असावी.
१९५० मध्ये झालेल्या करारानुसार भारतीय नागरिकांना नेपाळमध्ये व्हिसाशिवाय प्रवेश मिळतो, कितीही दिवस राहता येते, आणि कामही करता येते.
भूतान दोनदा बघून झाल्यानंतर मला आता नेपाळ बघण्याची उत्सुकता होती.
ह्या सफरीची ट्रॅव्हल स्टाईल :
दिवस पहिला - पुणे ते दिल्ली
दिवस दुसरा - नेपाळमध्ये प्रवेश आणि लमकी गाव
दिवस तिसरा - पोखरा
दिवस चौथा - पोखरा
दिवस पाचवा - पोखरा
दिवस सहावा - पोखरा ते काठमांडू
दिवस सातवा - काठमांडू
दिवस आठवा - काठमांडू ते विर्तामोड
दिवस नववा - विर्तामोड ते पुणे

- Like a Local
- Thrill Seeker
- Backpacker
अन्नपूर्णा पर्वतरांग |
दिवस दुसरा - नेपाळमध्ये प्रवेश आणि लमकी गाव
दिवस तिसरा - पोखरा
दिवस चौथा - पोखरा
दिवस पाचवा - पोखरा
दिवस सहावा - पोखरा ते काठमांडू
दिवस सातवा - काठमांडू
दिवस आठवा - काठमांडू ते विर्तामोड
दिवस नववा - विर्तामोड ते पुणे
No comments:
Post a Comment