मंगळवार १७ ऑक्टोबर २०१७
प्लॅन प्रमाणे आज थिंफू सोडून पुनाखा कडे प्रयाण. कालच परमिट एक्सटेन्ड केल्यामुळे आज सकाळी ब्रेकफास्ट नंतर नऊ वाजता पुनाखाला निघायचा बेत होता. थिंफू ते पुनाखा साधारण नव्वद किलोमीटर आणि अडीज तास. वाटेत डोचूला पासचा ब्रेक पकडून तीन तास.
पुनाखाकडे प्रयाण केल्यानंतर अर्ध्या तासाने चेकपोस्टपाशी पोहोचलो. इथे परमिट चेक करून घेतले. मी पटकन एक फोटो काढला.
चेकपोस्ट पासून निघाल्यावर दहा मिनिटात डोचूला पास आला. इथे वीसेक गाड्या थांबलेल्या. पर्यटकांची वर्दळ. मार्चमधल्या भूतानच्या दौऱ्यात हि जागा स्वप्नवत वाटली होती. गर्दीमुळे आज साध्या वेशात आलेल्या राजासारखी भासली.
समोरच्या टेकडीवरच्या द्रुक वान्ग्याल हखांग (म्हणजे एक बौद्ध मठ) कडे आधी मोर्चा वळवला. हि वास्तू २००८ मधे बांधून पूर्ण झाली. भूतान मधल्या सध्याच्या राजसत्तेला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ हि वास्तू बांधली आहे. सर्वच देशात आता राजसत्ता एकतर निकाली निघाली आहे किंवा फक्त नावापुरती शिल्लक आहे. इथे भूतान मधे मात्र आजही राजसत्ता आहे. जनतेमधे राजाला देवासमान स्थान आहे. भूतानमधे सर्व दुकानांमधे, हॉटेलांमध्ये, सार्वजनिक इमारतींमधे राजाचे किंवा राजाच्या कुटुंबाचे फोटो लावलेले असतात. जनतेला लोकशाही नकोय. आधीच्या राजानेच राज्यघटनेत बदल करून भूतानमधे लोकशाही आणलीये. पण जनतेमधे आजही राजाच लोकप्रिय आहे. त्याचे कारणही तसेच आहे. इथले चार पिढ्यांचे राजे हुशार आणि प्रजेची काळजी घेणारे होऊन गेलेत. इतर ठिकाणांसारखे उडाणटप्पू खुशालचेंडू राजे इथे अस्तित्वात नाहीत.
द्रुक वान्ग्याल हखांग पाहून झाल्यावर, यथेच्छ फोटोग्राफी झाल्यावर, मग टेकडी उतरून रस्त्यापलीकडचे एकशे आठ चोरटेन पाहायला निघालो. आज धुकं नसल्याने दूरवरचे बर्फाचे पर्वत दिसत होते. पण पर्यटकांच्या गर्दीमुळे थोडा वैताग आला. मार्चमधल्या भूतानच्या दौऱ्यात गर्दी नसताना हि जागा स्वप्नवत वाटली होती. एकशे आठच का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर फारच छान. जरा शोधा ह्याचे उत्तर. फार वेळ नसेल तर इथून सुरुवात करा.
भूतान मधला सर्वात उंच पर्वत गंगखर पुएनसुम इथून दिसतो म्हणे.
८० च्या दशकापर्यंत भूतानच्या १०% भागात हिमनद्या होत्या. इथल्या हिमनद्या वितळतायत. दरवर्षी तीस ते चाळीस मीटरने वितळतायत. २०३५ पर्यंत भूतानमधल्या सर्व हिमनद्या वितळलेल्या असतील असा अंदाज आहे. सर्व जगभरच हिमनद्या वितळतायत. हिमनद्या वितळण्याचं आणि आमचं काहीच नाही हो, असं म्हणणं म्हणजे "मी नाही त्यातली..." चा प्रकार. आपण सर्वमिळून पृथ्वीची वाट लावतोय. ग्लोबल वॉर्मिंग हा तुमच्या आमच्या सगळ्यांचा प्रश्न आहे.
डोचूला पास ला आम्ही तासभर होतो. इथून पुढे वाटेत एका गार्डन मधे थांबूया असे आमच्या ड्रायव्हरने सांगितले. कुठले गार्डन ते मला माहिती नव्हते. अर्ध्या तासाने आम्ही पोहोचलो रॉयल बोटॅनिकल पार्क समोर.
पर्यावरणाविषयी उपयुक्त माहिती देणारं एक छोटं प्रदर्शन आधी पाहिले. मग निघालो आजूबाजूला फेरफटका मारायला. इथे सेहेचाळीस प्रकारची ऱ्होडोडेंड्रोन झाडं आहेत.
इथून छोट्या मोठ्या अंतराच्या ट्रेकिंगच्या वाटा आहेत. इथे मधमाश्या बऱ्याच होत्या. त्यामुळे आम्ही जवळपासच्या भागात अर्धा तास फेरफटका मारून बाहेरचा रस्ता पकडला. ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांनी ह्या जागेसाठी दोन तीन तास वेळ ठेवावा. बरोबर इथला माणूस घेऊन जंगलात दोन तासाचा मस्त फेरफटका होईल. पेहराव व्यवस्थित करावा. फुल पॅन्ट आणि फुल हाताचा शर्ट. हूड असेल तर आणखीन छान.
रॉयल बोटॅनिकल गार्डन पासून पुनाखा साधारण दीड तासाच्या अंतरावर होते. म्हणजे आम्ही जेवायला पुनाखात पोहोचणार होतो. जेऊन झाल्यावर पुनाखा झॉन्ग आणि झुलता पूल बघायलाही वेळ असणार होता.
रस्त्यात एका ठिकाणी ड्रायव्हरने गाडी थांबवली. पिण्याचे पाणी भरून घेण्यासाठी. मी पण उतरलो पाणी भरून घ्यायला. भूतान मधे नदीचं पाणी पीत नाहीत. फक्त झऱ्याचं पाणी पितात. इथे वर्षभर पाण्याला काही तोटा नाही.
एक छोटा धबधबा होता बाजूलाच. त्याचा सुंदर फोटो मिळाला. निसर्गसौन्दर्याने नटलेल्या ह्या देशात राहणाऱ्यांचा हेवा वाटला.
इथून पाऊण तासात पुनाखा मधल्या दामचेन रिसॉर्टला पोहोचलो. आमच्या मागोमाग कॉक्स अँड किंग्स च्या गाड्या दाखल झाल्या. हि मंडळी डोचूला पास आणि रॉयल बोटॅनिकल गार्डनलाही आमच्या बरोबर होती. मार्चमधल्या भूतानच्या दौऱ्यात मिळालेली पहिल्या मजल्यावरची रूम फारच छान होती. त्या अनुभवावरून इथे आलो होतो. ह्यावेळी तळमजल्यावरच्या रूम मिळाल्या. ह्या तळमजल्यावरच्या रूम बहुतेक नेहमी वापरात नसाव्या. आमच्या रूम मधे एक पालीचं पिल्लू होतं. बाथ टब तुटलेला होता. रूम बदलून देणार का म्हणून मी विचारले तर नाही असे सांगण्यात आले. एकच दिवस राहायचे असल्याने आम्ही विषय सोडून दिला.
जेऊन झाल्यावर पुनाखा झॉन्ग आणि झुलता पूल बघायला निघालो. हॉटेलच्या बाहेर येऊन बघतो तर आमचा ड्राइवर गायब झालेला. त्याला कॉल करून बोलावून घेतले.
१९५५ पर्यंत पुनाखा भूतानची राजधानी होती. इथली प्रेक्षणीय स्थळं दोनच. पुनाखा झॉन्ग आणि झुलता पूल. दोन्ही जवळ जवळ आहेत. आधी लागतो पुनाखा झॉन्ग. फो चू आणि मो चू नद्यांच्या संगमाजवळ बांधलेला हा भूतानमधील दुसऱ्या क्रमांकाचा जुना आणि मोठा झॉन्ग. फो चू आणि मो चू एकत्र आल्यानंतर ह्या नदीला पुना सांग चू म्हटले जाते. भारतात आल्यावर हि संकोश नदी म्हणून ओळखली जाते.
आमची आजची पार्किंगची जागा म्हणजे मार्चमधल्या भूतान मॅरेथॉनचा
शेवट जिथे झाला ती जागा. त्यावेळी मॅरेथॉन हे एकच उद्दिष्ट असल्यामुळे हा
झॉन्ग बघायचे राहून गेले होते. आता नदीवरचा पूल पार करून झॉन्ग बघायला
निघालो.
तिकिटं काढताना आम्हाला विचारले तुमच्याबरोबर गाईड आहे का म्हणून. मी नाही सांगितल्यावर एक गाईड आम्हाला दिला. गाईडचे वेगळे काही चार्जेस नव्हते. पण झॉन्ग पाहून झाल्यावर गाईडला शंभर दोनशे वगैरे टीप द्यावी अशी अपेक्षा तिकिट काउंटर वर सांगण्यात आली.
झॉन्ग म्हणजे किल्ला. हा झॉन्ग आपल्या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांसारखा डोंगरी किल्ला नाही. ह्याला भुईकोट किल्ला म्हणता येईल. झॉन्ग हे प्रत्येक जिल्ह्याचे धार्मिक, प्रशासकीय, आणि सामाजिक केंद्र असते. झॉन्ग मधला साधारणपणे अर्धा भाग प्रशासकीय उपयोगासाठी आणि अर्धा धार्मिक उपयोगांसाठी असतो. प्रशासन आणि धर्म एकत्र ठेवल्याचे फायदे सांगावे तेवढे कमी.
पुंगतांग देवा छेनबी फोद्रांग (म्हणजे the palace of great happiness) नावाचा हा झॉन्ग १६३८ मध्ये बांधलेला. आमच्या गाईडने आम्हाला झॉन्गमधे फिरवून झॉन्गची माहिती दिली. झॉन्गच्या ठराविक भागातच पर्यटकांना फिरता येते.
पुनाखा झॉन्ग पाहून झाल्यावर आम्ही समोरचा बौद्ध मठ पाहायला निघालो. इथे बरोबर गाईड नसल्यामुळे ह्या ठिकाणची ऐतिहासिक माहिती कळली नाही. इथल्या आवारात एक मांजर झोपली होती. मांजरीबरोबर ख़ुशीचा वेळ मजेत गेला. नंतर "आपण एक मांजर पाळूया ना", "आपण एक बंगला बांधूया ना" अशा प्रश्नांची मला योग्य व समर्पक उत्तरं द्यावी लागली.
आम्ही इथून बाहेर पडल्यावर मठाचे दार बंद करण्यात आले. आता आमची स्वारी निघाली जवळच्या झुलत्या पुलाकडे. इथे फिरताना माझ्या मार्चमधल्या भूतान अर्धमॅरेथॉनच्या आठवणी जाग्या झाल्या. अर्धमॅरेथॉन चा ट्रॅक ह्या पुलावरून होता.
पुलावर पहिल्या मिनिटभरासाठी काहीतरी वेगळे वाटत होते. नंतर सवय झाली.
हा भूतानमधला सर्वात मोठा झुलता पूल. पुलाच्या पलीकडे गेल्यावर तिथे थोडा वेळ थांबलो.
पुनाखामधे कधीच बर्फ पडत नाही. इथले हवामान थिंफूपेक्षा उबदार असते. थिंफूमधे दरवर्षी बर्फ पडतो. पुनाखाचा परिसर भातशेतीसाठी प्रसिद्ध आहे.
झुलत्या पुलाकडच्या वाटेत एक कुंपण होते, आणि कुंपण ओलांडायला एक छोटीशी लाकडी शिडी.
हॉटेल मधे परत जाण्यासाठी गाडीत बसलो तेव्हा पावणे सहा झाले होते. हळुहळु अंधार पडायला लागला होता.
दुपारचे जेवण उशिरा झाल्यामुळे रात्रीचे जेवण सर्वांनाच नको होते. साडेआठ वाजता मी फेरफटका मारायला बाहेर पडलो. हॉटेलच्या गेटबाहेर येताच लक्षात आले - बॅटरी घ्यायला पाहिजे. परत रूममध्ये जाऊन बॅटरी घेऊन आलो. बऱ्याच रस्त्यांवर अंधारच होता. मधेच कुठेतरी स्ट्रीट-लाइट होते.
एका किराणा मालाच्या दुकानातून दोन छोट्या ज्युसच्या बाटल्या घेतल्या. फिरता फिरता पिऊन जी काही थोडीफार भूक होती ती संपवली. मार्चमधल्या भूतानच्या दौऱ्यात जिथे जेवलो होतो ते हॉटेल शोधून काढले. जवळच होते.
इथे फिरताना मी लहान असताना खेडला राहायचो त्याची आठवण झाली.
एक लोखंडी पूल पार करून नदीच्या पलीकडच्या बाजूला जाऊन परत फिरलो. उद्या सकाळी उठून गेलेफूकडे प्रयाण.
भूतानच्या सफरीत आपल्या रोजच्या जीवनातल्या संकल्पनांना धडाधड तडे जातात. १९६१ पर्यंत इथे डांबरी रस्ते नव्हते. दळणवळणाची साधने होती - चालत जाणे किंवा खेचर अथवा घोड्यावरून. भारताच्या बॉर्डर पासून थिंफूला जायला सहा दिवस लागायचे म्हणे. आजही रस्त्यांची स्थिती बऱ्याच ठिकाणी जेमतेमच. पूर्ण भूतानमध्ये एकाच विमानतळ चालू स्थितीत आहे. एक थिंफू सोडलं तर इतर कुठेही आधुनिक इमारती नाहीत. तरीही एक गोष्ट जाणवली - जगण्याचा अर्थ ह्यांना जेवढा उमगलाय तेवढा दुसऱ्या कुठल्या देशाला उमगला असण्याची शक्यता कमीच. उगाच नाही हे GDP च्या ऐवजी GNH च्या गोष्टी करत. शेवटी माणसाचं जीवन म्हणजे काय, एका वाक्यात सांगायचं तर pursuit of happiness. आणखी कशाच्या मागे आपण सगळे वर्षानुवर्ष धावतोय. ह्या एकविसाव्या शतकात जिथे टेकनॉलॉजि ओसंडून वाहतिये पण शहाणपणाचा पत्ता नाही, अशा जगात स्वतःचे वेगळेपण जपलेला हा छोटासा समृद्ध देश खरोखरच The last shangri la आहे.
प्लॅन प्रमाणे आज थिंफू सोडून पुनाखा कडे प्रयाण. कालच परमिट एक्सटेन्ड केल्यामुळे आज सकाळी ब्रेकफास्ट नंतर नऊ वाजता पुनाखाला निघायचा बेत होता. थिंफू ते पुनाखा साधारण नव्वद किलोमीटर आणि अडीज तास. वाटेत डोचूला पासचा ब्रेक पकडून तीन तास.
पुनाखाकडे प्रयाण केल्यानंतर अर्ध्या तासाने चेकपोस्टपाशी पोहोचलो. इथे परमिट चेक करून घेतले. मी पटकन एक फोटो काढला.
चेकपोस्ट |
चेकपोस्ट पासून निघाल्यावर दहा मिनिटात डोचूला पास आला. इथे वीसेक गाड्या थांबलेल्या. पर्यटकांची वर्दळ. मार्चमधल्या भूतानच्या दौऱ्यात हि जागा स्वप्नवत वाटली होती. गर्दीमुळे आज साध्या वेशात आलेल्या राजासारखी भासली.
समोरच्या टेकडीवरच्या द्रुक वान्ग्याल हखांग (म्हणजे एक बौद्ध मठ) कडे आधी मोर्चा वळवला. हि वास्तू २००८ मधे बांधून पूर्ण झाली. भूतान मधल्या सध्याच्या राजसत्तेला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ हि वास्तू बांधली आहे. सर्वच देशात आता राजसत्ता एकतर निकाली निघाली आहे किंवा फक्त नावापुरती शिल्लक आहे. इथे भूतान मधे मात्र आजही राजसत्ता आहे. जनतेमधे राजाला देवासमान स्थान आहे. भूतानमधे सर्व दुकानांमधे, हॉटेलांमध्ये, सार्वजनिक इमारतींमधे राजाचे किंवा राजाच्या कुटुंबाचे फोटो लावलेले असतात. जनतेला लोकशाही नकोय. आधीच्या राजानेच राज्यघटनेत बदल करून भूतानमधे लोकशाही आणलीये. पण जनतेमधे आजही राजाच लोकप्रिय आहे. त्याचे कारणही तसेच आहे. इथले चार पिढ्यांचे राजे हुशार आणि प्रजेची काळजी घेणारे होऊन गेलेत. इतर ठिकाणांसारखे उडाणटप्पू खुशालचेंडू राजे इथे अस्तित्वात नाहीत.
द्रुक वान्ग्याल हखांग च्या पायऱ्यांवर ख़ुशी आणि दीप्ती फोटोसाठी उभं राहिल्यावर ख़ुशी नेहमीप्रमाणे काहीतरी उद्योग करतीये |
द्रुक वान्ग्याल हखांग पाहून झाल्यावर, यथेच्छ फोटोग्राफी झाल्यावर, मग टेकडी उतरून रस्त्यापलीकडचे एकशे आठ चोरटेन पाहायला निघालो. आज धुकं नसल्याने दूरवरचे बर्फाचे पर्वत दिसत होते. पण पर्यटकांच्या गर्दीमुळे थोडा वैताग आला. मार्चमधल्या भूतानच्या दौऱ्यात गर्दी नसताना हि जागा स्वप्नवत वाटली होती. एकशे आठच का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर फारच छान. जरा शोधा ह्याचे उत्तर. फार वेळ नसेल तर इथून सुरुवात करा.
डोचूला पास ... रस्त्यापलीकडच्या टेकडीवरून पाहिलेले एकशे आठ चोरटेन दूरवर ढगांच्या रांगेत लपलेली बर्फाच्छादित शिखरं |
भूतान मधला सर्वात उंच पर्वत गंगखर पुएनसुम इथून दिसतो म्हणे.
८० च्या दशकापर्यंत भूतानच्या १०% भागात हिमनद्या होत्या. इथल्या हिमनद्या वितळतायत. दरवर्षी तीस ते चाळीस मीटरने वितळतायत. २०३५ पर्यंत भूतानमधल्या सर्व हिमनद्या वितळलेल्या असतील असा अंदाज आहे. सर्व जगभरच हिमनद्या वितळतायत. हिमनद्या वितळण्याचं आणि आमचं काहीच नाही हो, असं म्हणणं म्हणजे "मी नाही त्यातली..." चा प्रकार. आपण सर्वमिळून पृथ्वीची वाट लावतोय. ग्लोबल वॉर्मिंग हा तुमच्या आमच्या सगळ्यांचा प्रश्न आहे.
डोचूला पास ला आम्ही तासभर होतो. इथून पुढे वाटेत एका गार्डन मधे थांबूया असे आमच्या ड्रायव्हरने सांगितले. कुठले गार्डन ते मला माहिती नव्हते. अर्ध्या तासाने आम्ही पोहोचलो रॉयल बोटॅनिकल पार्क समोर.
रॉयल बोटॅनिकल गार्डनच्या प्रवेशद्वाराजवळील फलक |
रॉयल बोटॅनिकल गार्डन मधला एक फलक |
इथून छोट्या मोठ्या अंतराच्या ट्रेकिंगच्या वाटा आहेत. इथे मधमाश्या बऱ्याच होत्या. त्यामुळे आम्ही जवळपासच्या भागात अर्धा तास फेरफटका मारून बाहेरचा रस्ता पकडला. ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांनी ह्या जागेसाठी दोन तीन तास वेळ ठेवावा. बरोबर इथला माणूस घेऊन जंगलात दोन तासाचा मस्त फेरफटका होईल. पेहराव व्यवस्थित करावा. फुल पॅन्ट आणि फुल हाताचा शर्ट. हूड असेल तर आणखीन छान.
रॉयल बोटॅनिकल गार्डन पासून पुनाखा साधारण दीड तासाच्या अंतरावर होते. म्हणजे आम्ही जेवायला पुनाखात पोहोचणार होतो. जेऊन झाल्यावर पुनाखा झॉन्ग आणि झुलता पूल बघायलाही वेळ असणार होता.
पुनाखा कडे जाताना गाडीत बसल्या बसल्या फोटोग्राफी ... गर्द झाडीभरल्या जंगलातून गेलेला रस्ता रस्त्याला फारशी वर्दळ नाही कसलीही घाई गडबड न करता गाडी चाळीसच्या स्पीडने आरामात चाललेली |
रस्त्यात एका ठिकाणी ड्रायव्हरने गाडी थांबवली. पिण्याचे पाणी भरून घेण्यासाठी. मी पण उतरलो पाणी भरून घ्यायला. भूतान मधे नदीचं पाणी पीत नाहीत. फक्त झऱ्याचं पाणी पितात. इथे वर्षभर पाण्याला काही तोटा नाही.
पिण्याचे पाणी भरून घेण्यासाठी थांबलो तिथला फलक |
एक छोटा धबधबा होता बाजूलाच. त्याचा सुंदर फोटो मिळाला. निसर्गसौन्दर्याने नटलेल्या ह्या देशात राहणाऱ्यांचा हेवा वाटला.
रस्त्याच्या कडेला लागलेला एक छोटा धबधबा |
इथून पाऊण तासात पुनाखा मधल्या दामचेन रिसॉर्टला पोहोचलो. आमच्या मागोमाग कॉक्स अँड किंग्स च्या गाड्या दाखल झाल्या. हि मंडळी डोचूला पास आणि रॉयल बोटॅनिकल गार्डनलाही आमच्या बरोबर होती. मार्चमधल्या भूतानच्या दौऱ्यात मिळालेली पहिल्या मजल्यावरची रूम फारच छान होती. त्या अनुभवावरून इथे आलो होतो. ह्यावेळी तळमजल्यावरच्या रूम मिळाल्या. ह्या तळमजल्यावरच्या रूम बहुतेक नेहमी वापरात नसाव्या. आमच्या रूम मधे एक पालीचं पिल्लू होतं. बाथ टब तुटलेला होता. रूम बदलून देणार का म्हणून मी विचारले तर नाही असे सांगण्यात आले. एकच दिवस राहायचे असल्याने आम्ही विषय सोडून दिला.
जेऊन झाल्यावर पुनाखा झॉन्ग आणि झुलता पूल बघायला निघालो. हॉटेलच्या बाहेर येऊन बघतो तर आमचा ड्राइवर गायब झालेला. त्याला कॉल करून बोलावून घेतले.
१९५५ पर्यंत पुनाखा भूतानची राजधानी होती. इथली प्रेक्षणीय स्थळं दोनच. पुनाखा झॉन्ग आणि झुलता पूल. दोन्ही जवळ जवळ आहेत. आधी लागतो पुनाखा झॉन्ग. फो चू आणि मो चू नद्यांच्या संगमाजवळ बांधलेला हा भूतानमधील दुसऱ्या क्रमांकाचा जुना आणि मोठा झॉन्ग. फो चू आणि मो चू एकत्र आल्यानंतर ह्या नदीला पुना सांग चू म्हटले जाते. भारतात आल्यावर हि संकोश नदी म्हणून ओळखली जाते.
नदीपलीकडून दिसलेला पुनाखा झॉन्ग |
तिकिटं काढताना आम्हाला विचारले तुमच्याबरोबर गाईड आहे का म्हणून. मी नाही सांगितल्यावर एक गाईड आम्हाला दिला. गाईडचे वेगळे काही चार्जेस नव्हते. पण झॉन्ग पाहून झाल्यावर गाईडला शंभर दोनशे वगैरे टीप द्यावी अशी अपेक्षा तिकिट काउंटर वर सांगण्यात आली.
पुनाखा झॉन्ग मधली एक वास्तू |
झॉन्ग म्हणजे किल्ला. हा झॉन्ग आपल्या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांसारखा डोंगरी किल्ला नाही. ह्याला भुईकोट किल्ला म्हणता येईल. झॉन्ग हे प्रत्येक जिल्ह्याचे धार्मिक, प्रशासकीय, आणि सामाजिक केंद्र असते. झॉन्ग मधला साधारणपणे अर्धा भाग प्रशासकीय उपयोगासाठी आणि अर्धा धार्मिक उपयोगांसाठी असतो. प्रशासन आणि धर्म एकत्र ठेवल्याचे फायदे सांगावे तेवढे कमी.
पुंगतांग देवा छेनबी फोद्रांग (म्हणजे the palace of great happiness) नावाचा हा झॉन्ग १६३८ मध्ये बांधलेला. आमच्या गाईडने आम्हाला झॉन्गमधे फिरवून झॉन्गची माहिती दिली. झॉन्गच्या ठराविक भागातच पर्यटकांना फिरता येते.
पुनाखा झॉन्ग मधील एक इमारत |
पुनाखा झॉन्ग पाहून झाल्यावर आम्ही समोरचा बौद्ध मठ पाहायला निघालो. इथे बरोबर गाईड नसल्यामुळे ह्या ठिकाणची ऐतिहासिक माहिती कळली नाही. इथल्या आवारात एक मांजर झोपली होती. मांजरीबरोबर ख़ुशीचा वेळ मजेत गेला. नंतर "आपण एक मांजर पाळूया ना", "आपण एक बंगला बांधूया ना" अशा प्रश्नांची मला योग्य व समर्पक उत्तरं द्यावी लागली.
मांजर आणि ख़ुशी |
आम्ही इथून बाहेर पडल्यावर मठाचे दार बंद करण्यात आले. आता आमची स्वारी निघाली जवळच्या झुलत्या पुलाकडे. इथे फिरताना माझ्या मार्चमधल्या भूतान अर्धमॅरेथॉनच्या आठवणी जाग्या झाल्या. अर्धमॅरेथॉन चा ट्रॅक ह्या पुलावरून होता.
पुलावर पहिल्या मिनिटभरासाठी काहीतरी वेगळे वाटत होते. नंतर सवय झाली.
पुनाखा सस्पेन्शन ब्रिज |
पुलाच्या पलीकडची शेतं, घरं, डोंगर |
झुलत्या पुलाकडच्या वाटेत एक कुंपण होते, आणि कुंपण ओलांडायला एक छोटीशी लाकडी शिडी.
कुंपण ओलांडण्यासाठी छोटीशी शिडी |
दुपारचे जेवण उशिरा झाल्यामुळे रात्रीचे जेवण सर्वांनाच नको होते. साडेआठ वाजता मी फेरफटका मारायला बाहेर पडलो. हॉटेलच्या गेटबाहेर येताच लक्षात आले - बॅटरी घ्यायला पाहिजे. परत रूममध्ये जाऊन बॅटरी घेऊन आलो. बऱ्याच रस्त्यांवर अंधारच होता. मधेच कुठेतरी स्ट्रीट-लाइट होते.
एका किराणा मालाच्या दुकानातून दोन छोट्या ज्युसच्या बाटल्या घेतल्या. फिरता फिरता पिऊन जी काही थोडीफार भूक होती ती संपवली. मार्चमधल्या भूतानच्या दौऱ्यात जिथे जेवलो होतो ते हॉटेल शोधून काढले. जवळच होते.
इथे फिरताना मी लहान असताना खेडला राहायचो त्याची आठवण झाली.
एक लोखंडी पूल पार करून नदीच्या पलीकडच्या बाजूला जाऊन परत फिरलो. उद्या सकाळी उठून गेलेफूकडे प्रयाण.
लोखंडी पूल |
भूतानच्या सफरीत आपल्या रोजच्या जीवनातल्या संकल्पनांना धडाधड तडे जातात. १९६१ पर्यंत इथे डांबरी रस्ते नव्हते. दळणवळणाची साधने होती - चालत जाणे किंवा खेचर अथवा घोड्यावरून. भारताच्या बॉर्डर पासून थिंफूला जायला सहा दिवस लागायचे म्हणे. आजही रस्त्यांची स्थिती बऱ्याच ठिकाणी जेमतेमच. पूर्ण भूतानमध्ये एकाच विमानतळ चालू स्थितीत आहे. एक थिंफू सोडलं तर इतर कुठेही आधुनिक इमारती नाहीत. तरीही एक गोष्ट जाणवली - जगण्याचा अर्थ ह्यांना जेवढा उमगलाय तेवढा दुसऱ्या कुठल्या देशाला उमगला असण्याची शक्यता कमीच. उगाच नाही हे GDP च्या ऐवजी GNH च्या गोष्टी करत. शेवटी माणसाचं जीवन म्हणजे काय, एका वाक्यात सांगायचं तर pursuit of happiness. आणखी कशाच्या मागे आपण सगळे वर्षानुवर्ष धावतोय. ह्या एकविसाव्या शतकात जिथे टेकनॉलॉजि ओसंडून वाहतिये पण शहाणपणाचा पत्ता नाही, अशा जगात स्वतःचे वेगळेपण जपलेला हा छोटासा समृद्ध देश खरोखरच The last shangri la आहे.
No comments:
Post a Comment