शुक्रवार १३ ऑक्टोबर २०१७
आजचं पाहिलं आणि महत्वाचं काम इमिग्रेशन ऑफिसमधे जाऊन परमिट काढणे.
सकाळी लवकर उठून आवरले. ब्रेकफास्ट केला. ठरल्याप्रमाणे DD आणि दुसरा ड्राइवर दोन मारुती Wagon R घेऊन सकाळी आठ वाजता हॉटेलच्या पार्किंगमधे हजर होते. त्यांनी आम्हाला इमिग्रेशन ऑफिसच्या बाजूच्या पार्किंगमधे सोडले. इमिग्रेशन ऑफिस समोर एक रांग लागली होती. मी त्या रांगेत उभा राहिलो. लगेच लक्षात आले कि मी चुकीच्या रांगेत उभा आहे. हि रांग डेली वर्क परमिट साठीची आहे. युपी बिहारी लेबरर्स साधारणपणे रांग दिसेल अशा प्रकारे धक्काबुक्की करत होते. भूतानमधे लेबरर्स भारतीय जातात, जे बिल्डिंग बांधायची, रस्ते बनवायची कामं करतात.
तोपर्यंत DD तिथे आला. त्याने मला दुसरी रांग दाखवली. ह्या टुरिस्ट च्या रांगेत मोजकी चार पाच माणसं होती. एवढ्या सकाळी आल्यामुळे गर्दी नव्हती. माझ्यासारखा फॉर्म भरून तयारीनिशी आलेला आणखी एकच होता. थोड्या वेळाने स्टाफची माणसं आली. रांगेतले माझ्यापुढचे दोन जण कागदपत्रं आणायला निघून गेले. त्यामुळे माझा दुसराच नंबर लागला. माझ्याकडे सर्वांचे फॉर्म भरून कागदपत्रांसहित तयार होते. मार्चमधल्या भूतानच्या दौऱ्यामुळे सर्व प्रोसेस मला माहिती होती. जर स्वतःहुन भूतानला जात असाल तर तुम्ही बनवलेली itinerary बरोबर ठेवा. तुमचा जो काही प्लॅन असेल तो डिटेलमधे प्रत्येक दिवसाप्रमाणे बनवून एक प्रिंट बरोबर न्या. आमचे फॉर्म आणि कागदपत्रं तपासल्यावर काउंटर वरच्या स्टाफने माझ्याकडे itinerary मागितली. माझ्याकडे प्रिंट तयार असल्यामुळे मी लगेच पिशवीतून काढून दिली.
काउंटर वरच्या स्टाफने आमचे फॉर्म तपासून मागे पाठवले आणि आम्हाला तयार राहायला सांगितले. बोलावल्यावर वरच्या मजल्यावर जायचे होते. दोन मिनिटात एक माणूस बोलवायला आला. त्याच्या मागून सर्वजण वरच्या मजल्यावर गेलो. कुठल्या काउंटर वर जायचं ते मी बघितलं. तीन पैकी एका काउंटरवर आमचे फॉर्म दिले. इथे प्रत्येकाचा फोटो काढण्यात आला आणि हाताच्या बोटांचे ठसे घेण्यात आले. सकाळी स्टाफ फ्रेश असल्याने पटापट कामं होत होती. आता आमचा फॉर्म एक माणूस खालच्या मजल्यावर घेऊन गेला आणि आम्हाला बसायला सांगितले. थोड्याच वेळात तो प्रोसेस पूर्ण करून आमचे आणि इतरांचे फॉर्म घेऊन परतला. एका काउंटरवर परमिट बनवून माझ्याकडे दिले. झाले. आता आम्ही थिंफूला जायला नऊ वाजताच मोकळे.
DD च्या सल्ल्याप्रमाणे मी रस्त्यापलीकडच्या दुकानातून भूतानी सिमकार्ड विकत घेतले. शंभर रुपये टॉक टाइम असलेलं सिम कार्ड एकशे ऐंशी रुपयांना मिळाले. एक महिना व्हॅलिडिटी. ह्या भूतानी सिमकार्डचा ट्रिपमधे खूप उपयोग झाला.
हॉटेलवर परतून बॅगा घेतल्या आणि चेक आऊट केलं.
पावणेअकरा वाजता आमची थिंफूच्या दिशेने सफर सुरु झाली. बॉर्डर जवळच एक सुंदर नितांत जागा आहे ती पाहून पुढे जायचा बेत मी DD ला सांगितला. त्याचं म्हणणं तिथे वेळ न घालवता आपण पुढच्या एका जागेजवळ थांबूया. तिथून उंचावरून पूर्ण फुनशिलींगचा व्हू दिसतो. आणि आधी crocodile zoo मधे जाऊया. त्याप्रमाणे आधी crocodile zoo ला भेट दिली.
इथून पुढे थिंफूच्या रस्त्याने निघालो. फुनशिलींग सोडल्यावर एका बौद्ध monastery जवळ आमच्या गाड्या थांबल्या. आम्ही गाडीतून उतरतोय तोवर पाऊस आला. DD ने गाडीतून एक भलीमोठी छत्री काढून दिली. नक्की कुठे जायचेय ते काही कळत नव्हते. एक लोखंडी गेट दिसले. ते ढकलून आत शिरतोय तोवर दुरून एक रखवालदार शिव्या घालत पळत आला. त्याचं म्हणणं इथे प्रवेश बंद आहे. तुम्ही दार उघडलेतच का. इथे प्रवेश नाही म्हटल्यावर दीप्ती, ख़ुशी, आणि मी दुसरीकडे काही आहे का ते पाहायला निघालो. थोड्या अंतरावर काही पर्यटक दिसले. आम्ही तिकडे गेलो. इथे काही स्तूप होते. डोंगराच्या कडेवरून फुनशिलींगचा मस्त व्हू दिसत होता.
परत एक पावसाची सर आली. पाऊस थांबल्यावर आम्ही भरपूर फोटोग्राफी केली.
दुपारच्या बारा वाजता थिंफूकडे मार्गस्थ झालो. फुनशिलींग ते थिंफू साधारण पाच तासाचा रस्ता आहे. एकशे पासष्ठ किलो मीटर. माझ्या मार्चमधल्या भूतानच्या दौऱ्यात हा प्रवास वैतागवाणा झाला होता. त्याला करणेही तशीच होती. ह्यावेळी योग्य प्लॅनिंग केल्यामुळे तोच प्रवास मजेदार वाटला.
फुनशिलींग समुद्रसपाटीपासून २९३ मीटर उंचीवर आहे तर थिंफू २३२० मीटर
उंचीवर. आम्हाला २०२७ मीटर चढून जायचे होते. म्हणजे हिमालयाच्या
पायथ्यापासून कुठेतरी पर्वतरांगात.
खुशीला एकदा उलटीचा त्रास झाला. ह्या नंतर पुढच्या आठ दिवसात तिला उलटीचा त्रास कधीच नाही झाला. अर्धा तास दाट धुक्यातून गाडी चालली. इथे शिकाऊ ड्रायव्हरचं काम नाही.
१९६१ मधे फुनशिलींग ते थिंफू रस्ता बांधण्यासाठी तीस हजार लेबरर्स (भारतीय आणि नेपाळी) खपत होते म्हणे. चिनी आक्रमणाचा धोका ओळखून त्याकाळी जीप जाईल असा रस्ता घाईघाईने बांधण्यात आला. ह्या हिमालयीन पर्वतरांगात रस्ते बांधणे हे सोपे काम नाही.
भूतानमधील मुख्य रस्त्यांची देखभाल बॉर्डर रोड ऑर्गनिझशन ह्या भारतीय सेनेच्या अभियांत्रिकी दलाकडून केली जाते. इतर छोटे मोठे रस्ते भूतान सरकारचे खाते सांभाळते.
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात इथे रस्त्यावर दरड कोसळण्याच्या घटना
नेहमीच्याच. दरड बाजूला करून रस्ता मोकळा करणं हे मोठं जिकरीचं काम. ह्या
कामाला भारतीय लेबरर्स जुंपतात.
डॅम व्हू रेस्टोरंट मधे जेवणासाठी थांबलो. जिल्हा चुखा, गाव वांगखा. जेऊन झाल्यावर शेजारच्या दुकानात थोडी खरेदी झाली.
समोरच्या डोंगरावर गावातली घरं आणि त्यांच्यापलीकडे एक monastery दिसत होती. मी तिथे जायचं ठरवलं. मी थोडं वर गेल्यावर दिप्ती आणि ख़ुशीनेही यायला सुरुवात केली. गावातली घरं ओलांडून पलीकडे जायची वाट काही सापडेना. वाट शोधत शोधत सगळ्या घरांच्या पलीकडे पोहोचलो. एका मोठ्या दगडावर चढून मी फोटो काढले.
वरून मी दीप्ती आणि ख़ुशीला रस्ता दाखवला कसे वरपर्यंत यायचे ते. मी पुढे monastery पर्यंत जाऊन बघितले. आपल्याकडे गावचे एक मंदिर असते तशी वांगखा गावची हि monastery होती. खास बघण्यासारखे काही नव्हते. आता उतरायला सुरुवात केली. बघतो तर ख़ुशीच्या पायावर एक जळू. आम्ही आपापले पाय तपासले. इथून पटकन खाली उतरलो. माझ्या दोन्ही बुटात चुरचुरत होतं. खाली गेल्यावरच बघू म्हटलं. आधी सगळ्यांना खाली पोहोचूदे.
खाली पोहोचल्यावर मी बूट आणि सॉक्स काढले. दोन्ही पायाला एक एक जळू चावली होती. दोघींनाही सॉक्स मधून काढून मारले. दीप्ती ने जरा जास्तच काळजीने माझे दोन्ही सॉक्स आणि पॅन्ट चांगल्या प्रकारे झटकली. जंगलात जळू चावण्याचा मला आधी अनुभव होता. त्यामुळे मी बिलकुल पॅनिक झालो नाही. ह्या छोट्या अनुभवावरून लक्षात आले - भूतानमधे ट्रेकिंग करणे जरा अवघडच असणार. बघू पुढे कधीतरी भूतानमधे ट्रेकिंगचा माझा प्लॅन आहे.
वांगखा गावातून पुढे गेल्यावरही दाट धुक्यातून प्रवास. आता रस्ता बऱ्याच ठिकाणी खड्ड्यांनी भरलेला.
बऱ्याच वेळाने आमच्या ड्रायव्हरने एका ठिकाणी गाडी थांबवली. इथून दरीत दिसत होतं आम्ही कुठून चढून आलोय ते. थिंफूकडे जाणारा नवीन रस्ता बनवण्याचं काम आणि नदीही दिसत होती. ढग बऱ्याच खालच्या पातळीवर होते.
सातनंतर कधीतरी थिंफूमधे पोहोचलो. नेमसेलिंग हॉटेलमधे आम्ही चार दिवसांचं रूम बुकिंग केलेलं होतं. आम्हाला निळ्या रंगसंगतीतली रूम मिळाली. दमल्यामुळे नेमसेलिंग हॉटेल मधेच जेवलो. बाहेर कुठे गेलो नाही.
उद्याचा कार्यक्रम थिंफू आणि आजूबाजूला भटकंती.
आजचं पाहिलं आणि महत्वाचं काम इमिग्रेशन ऑफिसमधे जाऊन परमिट काढणे.
सकाळी लवकर उठून आवरले. ब्रेकफास्ट केला. ठरल्याप्रमाणे DD आणि दुसरा ड्राइवर दोन मारुती Wagon R घेऊन सकाळी आठ वाजता हॉटेलच्या पार्किंगमधे हजर होते. त्यांनी आम्हाला इमिग्रेशन ऑफिसच्या बाजूच्या पार्किंगमधे सोडले. इमिग्रेशन ऑफिस समोर एक रांग लागली होती. मी त्या रांगेत उभा राहिलो. लगेच लक्षात आले कि मी चुकीच्या रांगेत उभा आहे. हि रांग डेली वर्क परमिट साठीची आहे. युपी बिहारी लेबरर्स साधारणपणे रांग दिसेल अशा प्रकारे धक्काबुक्की करत होते. भूतानमधे लेबरर्स भारतीय जातात, जे बिल्डिंग बांधायची, रस्ते बनवायची कामं करतात.
तोपर्यंत DD तिथे आला. त्याने मला दुसरी रांग दाखवली. ह्या टुरिस्ट च्या रांगेत मोजकी चार पाच माणसं होती. एवढ्या सकाळी आल्यामुळे गर्दी नव्हती. माझ्यासारखा फॉर्म भरून तयारीनिशी आलेला आणखी एकच होता. थोड्या वेळाने स्टाफची माणसं आली. रांगेतले माझ्यापुढचे दोन जण कागदपत्रं आणायला निघून गेले. त्यामुळे माझा दुसराच नंबर लागला. माझ्याकडे सर्वांचे फॉर्म भरून कागदपत्रांसहित तयार होते. मार्चमधल्या भूतानच्या दौऱ्यामुळे सर्व प्रोसेस मला माहिती होती. जर स्वतःहुन भूतानला जात असाल तर तुम्ही बनवलेली itinerary बरोबर ठेवा. तुमचा जो काही प्लॅन असेल तो डिटेलमधे प्रत्येक दिवसाप्रमाणे बनवून एक प्रिंट बरोबर न्या. आमचे फॉर्म आणि कागदपत्रं तपासल्यावर काउंटर वरच्या स्टाफने माझ्याकडे itinerary मागितली. माझ्याकडे प्रिंट तयार असल्यामुळे मी लगेच पिशवीतून काढून दिली.
काउंटर वरच्या स्टाफने आमचे फॉर्म तपासून मागे पाठवले आणि आम्हाला तयार राहायला सांगितले. बोलावल्यावर वरच्या मजल्यावर जायचे होते. दोन मिनिटात एक माणूस बोलवायला आला. त्याच्या मागून सर्वजण वरच्या मजल्यावर गेलो. कुठल्या काउंटर वर जायचं ते मी बघितलं. तीन पैकी एका काउंटरवर आमचे फॉर्म दिले. इथे प्रत्येकाचा फोटो काढण्यात आला आणि हाताच्या बोटांचे ठसे घेण्यात आले. सकाळी स्टाफ फ्रेश असल्याने पटापट कामं होत होती. आता आमचा फॉर्म एक माणूस खालच्या मजल्यावर घेऊन गेला आणि आम्हाला बसायला सांगितले. थोड्याच वेळात तो प्रोसेस पूर्ण करून आमचे आणि इतरांचे फॉर्म घेऊन परतला. एका काउंटरवर परमिट बनवून माझ्याकडे दिले. झाले. आता आम्ही थिंफूला जायला नऊ वाजताच मोकळे.
DD च्या सल्ल्याप्रमाणे मी रस्त्यापलीकडच्या दुकानातून भूतानी सिमकार्ड विकत घेतले. शंभर रुपये टॉक टाइम असलेलं सिम कार्ड एकशे ऐंशी रुपयांना मिळाले. एक महिना व्हॅलिडिटी. ह्या भूतानी सिमकार्डचा ट्रिपमधे खूप उपयोग झाला.
हॉटेलवर परतून बॅगा घेतल्या आणि चेक आऊट केलं.
फुनशिलींग मधल्या हॉटेल भूतान रेसिडेन्सच्या काउंटर समोर |
फुनशिलींगच्या crocodile zoo मधली मगर |
ढगाळ वातावरणात डोंगराच्या कडेवरून पाहिलेलं फुनशिलींग |
स्तूपांभोवती प्रदक्षिणा घालणारी एक बौद्ध भिक्कू |
फुनशिलींग ते थिंफू रस्त्याकडेचा एक फलक |
खुशीला एकदा उलटीचा त्रास झाला. ह्या नंतर पुढच्या आठ दिवसात तिला उलटीचा त्रास कधीच नाही झाला. अर्धा तास दाट धुक्यातून गाडी चालली. इथे शिकाऊ ड्रायव्हरचं काम नाही.
फुनशिलींग ते थिंफू रस्त्याकडेचा एक फलक |
१९६१ मधे फुनशिलींग ते थिंफू रस्ता बांधण्यासाठी तीस हजार लेबरर्स (भारतीय आणि नेपाळी) खपत होते म्हणे. चिनी आक्रमणाचा धोका ओळखून त्याकाळी जीप जाईल असा रस्ता घाईघाईने बांधण्यात आला. ह्या हिमालयीन पर्वतरांगात रस्ते बांधणे हे सोपे काम नाही.
भूतानमधील मुख्य रस्त्यांची देखभाल बॉर्डर रोड ऑर्गनिझशन ह्या भारतीय सेनेच्या अभियांत्रिकी दलाकडून केली जाते. इतर छोटे मोठे रस्ते भूतान सरकारचे खाते सांभाळते.
फुनशिलींग ते थिंफू रस्त्याकडेचा एक फलक |
डॅम व्हू रेस्टोरंट मधे जेवणासाठी थांबलो. जिल्हा चुखा, गाव वांगखा. जेऊन झाल्यावर शेजारच्या दुकानात थोडी खरेदी झाली.
समोरच्या डोंगरावर गावातली घरं आणि त्यांच्यापलीकडे एक monastery दिसत होती. मी तिथे जायचं ठरवलं. मी थोडं वर गेल्यावर दिप्ती आणि ख़ुशीनेही यायला सुरुवात केली. गावातली घरं ओलांडून पलीकडे जायची वाट काही सापडेना. वाट शोधत शोधत सगळ्या घरांच्या पलीकडे पोहोचलो. एका मोठ्या दगडावर चढून मी फोटो काढले.
दगडावर चढून माझी फोटोग्राफी... समोर वांगखा गावातली घरं सर्वत्र हिरवीगार झाडं पलीकडचा पर्वत अर्ध्यानंतर ढगात हरवलाय |
खाली पोहोचल्यावर मी बूट आणि सॉक्स काढले. दोन्ही पायाला एक एक जळू चावली होती. दोघींनाही सॉक्स मधून काढून मारले. दीप्ती ने जरा जास्तच काळजीने माझे दोन्ही सॉक्स आणि पॅन्ट चांगल्या प्रकारे झटकली. जंगलात जळू चावण्याचा मला आधी अनुभव होता. त्यामुळे मी बिलकुल पॅनिक झालो नाही. ह्या छोट्या अनुभवावरून लक्षात आले - भूतानमधे ट्रेकिंग करणे जरा अवघडच असणार. बघू पुढे कधीतरी भूतानमधे ट्रेकिंगचा माझा प्लॅन आहे.
वांगखा गावातून पुढे गेल्यावरही दाट धुक्यातून प्रवास. आता रस्ता बऱ्याच ठिकाणी खड्ड्यांनी भरलेला.
बऱ्याच वेळाने आमच्या ड्रायव्हरने एका ठिकाणी गाडी थांबवली. इथून दरीत दिसत होतं आम्ही कुठून चढून आलोय ते. थिंफूकडे जाणारा नवीन रस्ता बनवण्याचं काम आणि नदीही दिसत होती. ढग बऱ्याच खालच्या पातळीवर होते.
थिंफूला जाताना रस्त्याकडेला क्षणभर विश्रांती |
उद्याचा कार्यक्रम थिंफू आणि आजूबाजूला भटकंती.
No comments:
Post a Comment