रविवार १७ सप्टेंबर २०१७ रोजी स्वछंद गिर्यारोहक विशाल काकडे आणि इतर स्वछंद गिर्यारोहकांबरोबर नाणेघाट, नानांचा अंगठा आणि भोरांड्याचं दार पाहायचा योग आला. त्याचा हा इतिवृत्तांत. खरंतर हा पायलट ट्रेक ठरला होता. मेंबर वाढल्यामुळे रेग्युलर ट्रेक बनला. पुण्याहुन ११ जण आणि मुंबईहुन ९ असे २० ठरले होते.
टोळके
१. विशाल काकडे
२. डॉ. मुग्धा कोल्हटकर मॅम
३. स्वप्नील खोत
४. सविता कानडे मॅम
५. सुरेश भाग्यवंत
६. उदय मोहिते
७. सागर मोहिते
८. रुपेश गौल (रुपेश मित्रा, तुझं आडनाव जर मि चुकवलं असेल तर चुक भुल देणे घेणे)
९. भाग्येश मोहिते
१०. दिलीप गाडे
११. योगेश सावंत
शनिवारी दिवसा विशाल आणि भाग्येशने स्वछंद गिर्यारोहकांचा रिव्हर्स अंधारबन ट्रेक यशस्वीरीत्या पार पाडला. त्यांची बस रात्री ९ वाजता शिवाजीनगरला पोहोचली. तिच बस घेऊन त्यांनी पुढचा ट्रेक सुरु केला. ठरल्याप्रमाणे ११ वाजता इतर सदस्य जमले आणि बस मार्गस्थ झाली. रुपेश आणि मि नाशिक फाट्याला बसमध्ये चढलो. नारायणगावला चहा आणि मसाला दुध अशी सर्वांची फर्माईश होती. सर्व हॉटेले बंद झाल्यामुळे ति राहुन गेली.
ड्राइवर काकांना बिलकुल घाईची लागलेली नव्हती. त्यांनी सरळ सोप्या पद्धतीने बस चालवली. रात्रीच्या अंधारात विशालने गुगल मॅपचा आधार घेत ड्राइवर काकांना रस्ता सांगितला. घाटात एका चेकपोस्ट वर पोलीसमामांनी १०० रुपये घेतले. आधी ५० दिले तर ते त्यांना कमी पडले. पुण्यापासुन जसजसे लांब गेलो तसतसे रस्तावरचे खड्डे वाढतच गेले. त्यामुळे झोप काही चांगली झाली नाही.
साधारण साडेतीनला विशालने एका ठिकाणी बस थांबवली. सर्वजण बसमधुन उतरून तयार झालो. इथुन पुढे पायगाडीने प्रवास होता. उद्या दुपारी बस कुठे आणायची ते विशालने ड्राइवर काकांना सांगितले. आम्ही नाणेघाटातुन चढुन जाणार होतो आणि भोरांड्याच्या दाराने उतरणार होतो.
मुंबईचे ९ स्वछंद गिर्यारोहक आमच्या दोन तास आधी पोहोचले होते. त्यांनी चढायला सुरुवात केलेली होती. नाणेघाट चढून गेल्यावर त्यांना भेटण्याचा आमचा प्लॅन होता.
सर्वांची थोडक्यात तोंडओळख केली आणि पायगाडीला स्टार्ट मारला. मिट्ट अंधार असल्यामुळे आजुबाजुच्या परिसराचा फारसा अंदाज येत नव्हता. बॅटऱ्यांच्या उजेडात सर्वजण एका रांगेत जात होतो. वाट अवघड नव्हती पण घाम काढणारी होती. बहुदा आमचा स्पीड चांगला होता. ट्रेकची सुरुवात चांगल्या स्पीडने केली कि पूर्ण ट्रेक चांगला जातो. नवखे कोणीच नसल्यामुळे हा ट्रेक चांगला होणार ह्याचा अंदाज आला.
नाणेघाटाच्या पायऱ्या जिथे सुरु होतात तिथे एक मोठा ब्रेक घेतला. निमित्त होते नानांच्या अंगठ्याचा फोटो काढण्याचे. हळुहळु उजाडायला लागले. थोडे उजाडल्यावर नानांचा अंगठा दिसायला लागला. अंगठा नक्की कसा बघायचा ते काही मला समजले नाही. असो. आमचा लॉन्ग ब्रेक चालु असताना एका उंदराने आमच्या अधेमधे लुडबुडून जमेल तसे खाऊचे तुकडे पळवुन नेले.
आम्ही पहिला टप्पा जोरदार पार केलेला होता. लॉन्ग ब्रेक आटोपल्यावर पुढच्या वाटचालीस सुरुवात. घडीव पायऱ्यांची वाट माथ्यापर्यंत आहे. कुठे चुकण्याचा प्रश्नच नाही. ग्रुप ट्रेक मध्ये लीड ला राहण्याचा मोह काही मला सोडवत नाही.
फार्फार पुर्वीच्या काळी कधीतरी सोपारा ते पैठण हा व्यापारी मार्ग होता. कल्याण ते जुन्नर हा ह्या मार्गाचा एक भाग. सातवाहन काळातील हा एक्सप्रेस-वे. ह्या मार्गावर सह्याद्री चढून वर येण्याचा घाट तो नाणेघाट. कल्याण पासुन ५५ किलोमीटर वर हा नाणेघाट आहे.
एक दोन वेळा वानरांचा आवाज परिसरात घुमला. मोरांचा आवाज ह्या पूर्ण ट्रेक मध्ये कुठेच आला नाही. रात्री बंद असलेले कॅमेरे आता बाहेर आले होते. आम्हा सर्वांचा स्पीड चांगला असल्यामुळे वेळेत ट्रेक पूर्ण होतो का नाही वगैरे विषय आलेच नाहीत. आणि दिवसभर मनसोक्त फोटोग्राफीला वेळ मिळाला.
सध्याच्या काळात माळशेज घाटाचा गुळगुळीत डांबरी रस्ता बनल्यावर नाणेघाटाची गरज संपली. आसपासच्या गावातले दोनेक जण फक्त जाताना दिसले. नाणेघाटाच्या शेवटच्या टप्प्यात कातळात कोरलेली पाण्याची टाकं आणि सातवाहन कालीन लेणी आहेत. घाट चढून वर आल्यावर प्यायला पाणी आणि आरामाला जागा हवीच.
सातवाहन राजा सातकर्णी ह्याची राणी नागनिका हिने हि लेणी बनवुन घेतली. लेण्याच्या भिंतींवर ब्राम्ही लिपीतील शिलालेख कोरलेला आहे. सातवाहनांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग वाचा.
इथून पुढे नाणेघाटाचा फक्त शेवटचा चढ राहिला होता. एका घळीतला दगड धोंड्यांनी भरलेला १०० मीटर ट्रॅक. पाणी वाहुन जायला भरपूर जागा असल्यामुळे हे दगड घसरडे नव्हते.
शेवटचा चढ मि हिल गियर टाकुन संपवला. साडेआठला आम्ही घाटमाथ्यावर आलो. समोर नाणेघाटाच्या प्राचीन दगडी मार्गाला भिडलेला आजचा डांबरी रस्ता पाहुन आश्चर्य वाटले. डोंगरपठारावर उजवीकडे जीवधन किल्ला तर डावीकडे नवरा नवरी भटजी आणि वाजंत्र्यांचा डोंगर. मध्ये जुन्नरहुन आलेला आजच्या काळातला डांबरी रस्ता. ह्या रस्त्याने सर्वसामान्य जनतेची सोय केलेली आहे. तशीच गैरसोयही केलेली आहे. इथपर्यंत दुचाकी आणि चारचाकी सहज येत असल्यामुळे काचपात्रातून तीर्थप्राशन करणाऱ्यांची गर्दी आता इथे जमु लागलीये.
मुंबईचे ९ स्वछंद गिर्यारोहक इथुन बऱ्याच आधी पुढे गेलेले होते. ते आम्हाला भोरांड्याच्या दाराने उतरून गेल्यावरच भेटले.
उन्हात न्हाऊन निघालेलं डोंगरपठार, सर्वत्र हिरवंगार गवत, काही रानफुले, मधेच कुठेकुठे पाणी. दूरवर दिसणारे उंचच उंच डोंगर. उत्कृष्ट लँडस्केप.
नाणेघाट चढून घाटमाथ्यावर पोहोचल्यावर एक दगडी रांजण दिसतो. ह्या मार्गाचा वापर करणारे व्यापारी इथे टोल देत असणार नाण्यांच्या स्वरूपात. म्हणून हा नाणेघाट.
डोंगरपठारावर पोहोचल्यानंतर थोड्या वेळाने आम्ही बाजूच्या नानांच्या अंगठ्याकडे मोर्चा वळवला. घाटमाथ्यावरून कोकणच्या दिशेला थेट आकाशात घुसलेला डोंगर आणि पलीकडे सरळसोट खोल दरी. एक टप्पा आऊट वगैरे नाहीच. डायरेक्ट बाउन्सर कोकणात जाणार. हाईट ची भीती घालवायची असेल तर अतिउत्तम जागा.
एकेक करत सर्वजण नानांच्या अंगठ्यावर पोहोचलो. रुपेश खालीच राहिला. मागचे काही आठवडे (त्यात वीकेंड्स पण) त्याच्या कंपनीने त्याला जबरी राबवून काढल्याने बिचारा मिळेल तिथे मिळेल तशी झोप पूर्ण करत होता. यथेच्छ फोटोग्राफी झाल्यावर सर्वानुमते इथे एक खादंती ब्रेक झाला. सुरेश भाग्यवंत सरांनी आणलेली भाकरी, मिरचीचा ठेचा आणि चटणी ज्यांनी नानांच्या अंगठ्यावर बसून खाल्ली तेच खरे भाग्यवंत.
नानांच्या अंगठ्यावरून उतरल्यानंतर आम्ही दूरवर दिसणाऱ्या आमच्या ब्रेकफास्ट च्या जागी पायगाडी वळवली. डोंगरपठारावर सकाळच्या उन्हात न्हालेली रानफुलं. दूरवर दिसणारे सह्याद्रीचे रथी महारथी. असं दिवसभर भटकलं तरी मन भरेल कि नाही सांगता येत नाही.
वाटेत एक मेलेला साप सापडला. ह्या भागात साप खूप आहेत म्हणे. आमच्या वाटेल त्यातला एकही नाही आला. सापांविषयी दिवसभरात चांगली डिस्कशन झाली. इतरही अनेक विषय चावले गेले. भुतं, सातवाहन काळ, घाटवाटा, भारतीय स्वातंत्र्यलढा, आजूबाजूचे किल्ले, रानफुलं, वगैरे वगैरे. स्वप्नील खोत हा तर एक चालता बोलता विकिपीडिया आहे. विशेष म्हणजे डोकं आभाळात असूनसुद्धा पाय पक्के जमिनीवर.
रस्त्यावर बसून थोडी फोटोग्राफी झाली. मि माझी फोटो स्टाईल रुपेश आणि उदय मोहिते सरांना शिकवली.
आधी एक चहाचा राऊंड, मग अनलिमिटेड पोहे, वर अजून एक चहाचा राऊंड असा भरपेट ब्रेकफास्ट झाला. खुर्चीत बसल्या बसल्या मि एक डुलकी घेतली. काहीजण पळशीकरांना भेटून आले.
आता आल्या वाटेने नाणेघाटातून उतरून न जाता भोरांड्याच्या दाराने जायचे होते. भोरांड्याच्या दारापर्यंत पोहोचण्याची एक छोटीशी शोधमोहीम पार पडली.
हि घळ ६०० फूट उतरत जाते. कोकणातल्या घाटवाटा पावसाळ्यात सुद्धा घाम काढतात. उन्हाळ्यात काय होत असेल इथे.
उतरायला सुरुवात केली तेव्हा तासाभरात खाली पोहोचू असा अंदाज होता. जसजसे पुढे जाऊ लागलो तसतसा उलगडा झाला. हे काही तासाभराचं काम नाही.
दगडधोंड्यांनी भरलेली घळ पुढे गेल्यावर अवघड बनत गेली. एके ठिकाणी डावीकडे एक आणि उजवीकडे एक अशा दोन वाटा दिसल्या. उजवीकडची वाट गावात जाते. डावीकडच्या वाटेने उतरून गेलो. आता वाट शोधावी लागत होती. एखादं झाडावरचं मार्किंग, कुठे दगडावर रंगवलेला बाण. काही वेळ मि लीड ला राहून वाट शोधली.
भोरांड्याच्या ह्या घाटवाटेल पाण्याची चिंता नाही. खळाळत्या झर्याचं गोड पाणी शेवटपर्यंत साथीला राहतं. पावसाळा संपुन झरा आटल्यावर मात्र पुरेसं पाणी बरोबर ठेवलंच पाहिजे.
दोन चार वेळा झरा ओलांडावा लागला. झरा ओलांडायला सोपा आहे, फक्त सावध राहवं. शेवाळ्याने भरलेले दगड घसरडे होते. शेवाळ्याचा थर जितका जाड तितकी घसरण जास्त.
निसर्गदेवतेच्या कृपेने पाऊस आला नाही. पाऊस आला असता तर हि वाट आणखीनच अवघड झाली असती.
Chimps never leave chimps behind ह्या उक्ती प्रमाणे कोणीही एकटे पडणार नाही ह्याची दक्षता सर्वांनी पूर्णवेळ घेतली.
सव्वातीन तासात आम्ही भोरांड्याच्या दाराने उतरून आलो. मागे वळुन पाहिल्यावर दूरवर दिसत होतं भोरांड्याचं दार.
सरत्या पावसाच्या दिवसातला हा ट्रेक काय वर्णावा. उन्हाचा रखरखाट नाही. थंडीचा कडाका नाही. झोडपणारा पाऊस नाही. सर्वत्र आल्हाददायक वातावरण. टोळक्याचा मेळ व्यवस्थित जमलेला. सगळीकडे रानफुलांची सोबत. खाण्यापिण्याची चंगळ. बरोबर घेतलेले पाणी संपण्याचा धोका नाही. हे सगळं कमी पडतं म्हणुन कि काय नानांच्या अंगठ्यावरून दिसणारा अलौकिक नजारा, एक नवीन घाटवाट उतरण्याचं समाधान, प्यायला हवं तितकं झऱ्याचं चवदार पाणी, आणि शेवटी झऱ्यातली डुंबाडुंबी म्हणजे कळसच झाला.
झऱ्यातली डुंबाडुंबी थांबवुन बाहेर पडायला कोणीच तयार नव्हतं. झऱ्यासमोर दिसणारा पूल आणि गाड्यांचे आवाज मात्र आजच्या जगाची आठवण करून देत होते.
खाते पिते घर के ४ जाडजूड सुटलेले मर्द रस्त्यावरून झऱ्याच्या काठाला उतरले. बॉड्या काढून ठेऊन काहीतरी खायला लागले. बहुदा खाऊन झाल्यावर झऱ्यात एन्ट्री मारणार असावेत.
नाईलाजाने झरा सोडून आम्ही रस्ता पकडला. काय करणार. १२ तास निसर्गाच्या बरोबर राहिल्यानंतर मग ह्या मानवनिर्मित कृत्रिम वातावरणात परत येणं फार अवघड होतं. विशालने ड्राइवर काकांना फोन करून बोलावून घेतले. आवरा आवरी करून गाडीत बसलो.
बायकर्सची एक मोठी झुंड रस्त्याच्या कडेला थांबली होती. त्यांच्यातला एक जण वळण घेताना रस्ता सोडून बाजुच्या खोलगट भागात पडला होता. त्यांचं मदतकार्य चालू होतं.
मुंबईचे ९ स्वछंद गिर्यारोहक जवळच पोहोचले होते. बसने त्यांच्याकडे गेलो. थोड्या गप्पा टप्पा झाल्यावर आमची बस पुण्यनगरीच्या दिशेने निघाली. बसमध्ये मी जमेल तेवढी झोप काढली. थोड्या वेळाने चहा वडापावचा pitstop आला. मी झोपुनच राहिलो बसमध्ये.
जेवणासाठी एका ठिकाणी थांबलो. ११ पैकी ५ व्हेज आणि ६ नॉनव्हेज अशी विभागणी झाली. व्हेज वाले त्यांच्या आवडीच्या ठिकाणी आणि नॉनव्हेज वाले त्यांच्या आवडीच्या ठिकाणी. दोन्ही हॉटेलं ५० मीटर अंतरावर.
जेवायला माझ्या शेजारी स्वप्नील खोत हा निगर्वी निर्भीड सह्यमित्र बसला होता. जग जिंकलंयस तु मित्रा. ह्या सह्याद्रीला अभिमान आहे तुझ्यासारख्या सह्यमित्रांचा. तुझ्यासारख्यांसाठीच ह्या ओळी लिहिल्या आहेत
क्या ये उजाले
क्या ये अँधेरे
दोनों से आगे है मंज़र तेरे
क्यों रौशनी तू बाहर तलाशे
तेरी मशालें हैं अंदर तेरे
क्यों ढूंढना पैरों के निशां
जाए वहीं ले जाए जहाँ
आणि मला सुचलेल्या ह्या चार ओळी
स्वप्नील खोत येति ट्रेकला
तोचि दिवाळी दसरा
पोटोबा भरल्यानंतर सर्वांना घरी परतायचे वेध लागले होते. परतीच्या प्रवासात विशालने त्याचा गाण्याचा तास सुरु केला. इतरांनी त्याला जमेल तशी साथ दिली. साडे अकरा वाजता नाशिक फाट्यावर रुपेश आणि मि गाडीतुन उतरलो. ४ किलोमीटर आणि ४० मिनिटात मि चालत घरी पोहोचलो.
ह्या offbeat ट्रेक ला किती खर्च आला ते विचारूही नका. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरची हि भटकंती पैश्यात मोजता येत नाही. भाग्य लागतं नशिबाला.
टोळके
१. विशाल काकडे
२. डॉ. मुग्धा कोल्हटकर मॅम
३. स्वप्नील खोत
४. सविता कानडे मॅम
५. सुरेश भाग्यवंत
६. उदय मोहिते
७. सागर मोहिते
८. रुपेश गौल (रुपेश मित्रा, तुझं आडनाव जर मि चुकवलं असेल तर चुक भुल देणे घेणे)
९. भाग्येश मोहिते
१०. दिलीप गाडे
११. योगेश सावंत
शनिवारी दिवसा विशाल आणि भाग्येशने स्वछंद गिर्यारोहकांचा रिव्हर्स अंधारबन ट्रेक यशस्वीरीत्या पार पाडला. त्यांची बस रात्री ९ वाजता शिवाजीनगरला पोहोचली. तिच बस घेऊन त्यांनी पुढचा ट्रेक सुरु केला. ठरल्याप्रमाणे ११ वाजता इतर सदस्य जमले आणि बस मार्गस्थ झाली. रुपेश आणि मि नाशिक फाट्याला बसमध्ये चढलो. नारायणगावला चहा आणि मसाला दुध अशी सर्वांची फर्माईश होती. सर्व हॉटेले बंद झाल्यामुळे ति राहुन गेली.
ड्राइवर काकांना बिलकुल घाईची लागलेली नव्हती. त्यांनी सरळ सोप्या पद्धतीने बस चालवली. रात्रीच्या अंधारात विशालने गुगल मॅपचा आधार घेत ड्राइवर काकांना रस्ता सांगितला. घाटात एका चेकपोस्ट वर पोलीसमामांनी १०० रुपये घेतले. आधी ५० दिले तर ते त्यांना कमी पडले. पुण्यापासुन जसजसे लांब गेलो तसतसे रस्तावरचे खड्डे वाढतच गेले. त्यामुळे झोप काही चांगली झाली नाही.
साधारण साडेतीनला विशालने एका ठिकाणी बस थांबवली. सर्वजण बसमधुन उतरून तयार झालो. इथुन पुढे पायगाडीने प्रवास होता. उद्या दुपारी बस कुठे आणायची ते विशालने ड्राइवर काकांना सांगितले. आम्ही नाणेघाटातुन चढुन जाणार होतो आणि भोरांड्याच्या दाराने उतरणार होतो.
मुंबईचे ९ स्वछंद गिर्यारोहक आमच्या दोन तास आधी पोहोचले होते. त्यांनी चढायला सुरुवात केलेली होती. नाणेघाट चढून गेल्यावर त्यांना भेटण्याचा आमचा प्लॅन होता.
सर्वांची थोडक्यात तोंडओळख केली आणि पायगाडीला स्टार्ट मारला. मिट्ट अंधार असल्यामुळे आजुबाजुच्या परिसराचा फारसा अंदाज येत नव्हता. बॅटऱ्यांच्या उजेडात सर्वजण एका रांगेत जात होतो. वाट अवघड नव्हती पण घाम काढणारी होती. बहुदा आमचा स्पीड चांगला होता. ट्रेकची सुरुवात चांगल्या स्पीडने केली कि पूर्ण ट्रेक चांगला जातो. नवखे कोणीच नसल्यामुळे हा ट्रेक चांगला होणार ह्याचा अंदाज आला.
![]() |
पायगाडीला सुरुवात झाल्यानंतर थोड्या अंतरावर हे निसर्ग पर्यटन केंद्र लागले. इथे काही खेळणी होती लहान मुलांसाठी. |
नाणेघाटाच्या पायऱ्या जिथे सुरु होतात तिथे एक मोठा ब्रेक घेतला. निमित्त होते नानांच्या अंगठ्याचा फोटो काढण्याचे. हळुहळु उजाडायला लागले. थोडे उजाडल्यावर नानांचा अंगठा दिसायला लागला. अंगठा नक्की कसा बघायचा ते काही मला समजले नाही. असो. आमचा लॉन्ग ब्रेक चालु असताना एका उंदराने आमच्या अधेमधे लुडबुडून जमेल तसे खाऊचे तुकडे पळवुन नेले.
![]() |
उजाडल्यावर दिसणारा नानांचा अंगठा. डावीकडच्या घळीतून नाणेघाटाची वाट घाटमाथ्यावर जाते |
आम्ही पहिला टप्पा जोरदार पार केलेला होता. लॉन्ग ब्रेक आटोपल्यावर पुढच्या वाटचालीस सुरुवात. घडीव पायऱ्यांची वाट माथ्यापर्यंत आहे. कुठे चुकण्याचा प्रश्नच नाही. ग्रुप ट्रेक मध्ये लीड ला राहण्याचा मोह काही मला सोडवत नाही.
![]() |
नाणेघाटातील पायऱ्यांची वाट |
फार्फार पुर्वीच्या काळी कधीतरी सोपारा ते पैठण हा व्यापारी मार्ग होता. कल्याण ते जुन्नर हा ह्या मार्गाचा एक भाग. सातवाहन काळातील हा एक्सप्रेस-वे. ह्या मार्गावर सह्याद्री चढून वर येण्याचा घाट तो नाणेघाट. कल्याण पासुन ५५ किलोमीटर वर हा नाणेघाट आहे.
![]() |
सप्टेंबरच्या सकाळी नाणेघाटातुन दिसणारं विहंगम दृश्य. नजर जाईल तिथपर्यंत ढग रेंगाळतायत. सर्वत्र हिरवंगार रान आणि मधेच एखादी वीसेक घरांची वाडी. |
एक दोन वेळा वानरांचा आवाज परिसरात घुमला. मोरांचा आवाज ह्या पूर्ण ट्रेक मध्ये कुठेच आला नाही. रात्री बंद असलेले कॅमेरे आता बाहेर आले होते. आम्हा सर्वांचा स्पीड चांगला असल्यामुळे वेळेत ट्रेक पूर्ण होतो का नाही वगैरे विषय आलेच नाहीत. आणि दिवसभर मनसोक्त फोटोग्राफीला वेळ मिळाला.
![]() |
नाणेघाटातुन दिसणारा नानांच्या अंगठ्याचा कडा |
सध्याच्या काळात माळशेज घाटाचा गुळगुळीत डांबरी रस्ता बनल्यावर नाणेघाटाची गरज संपली. आसपासच्या गावातले दोनेक जण फक्त जाताना दिसले. नाणेघाटाच्या शेवटच्या टप्प्यात कातळात कोरलेली पाण्याची टाकं आणि सातवाहन कालीन लेणी आहेत. घाट चढून वर आल्यावर प्यायला पाणी आणि आरामाला जागा हवीच.
![]() |
नाणेघाटातली सातवाहन कालीन लेणी |
सातवाहन राजा सातकर्णी ह्याची राणी नागनिका हिने हि लेणी बनवुन घेतली. लेण्याच्या भिंतींवर ब्राम्ही लिपीतील शिलालेख कोरलेला आहे. सातवाहनांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग वाचा.
![]() |
सातवाहन कालीन लेण्याच्या भिंतीवर कोरलेला शिलालेख |
इथून पुढे नाणेघाटाचा फक्त शेवटचा चढ राहिला होता. एका घळीतला दगड धोंड्यांनी भरलेला १०० मीटर ट्रॅक. पाणी वाहुन जायला भरपूर जागा असल्यामुळे हे दगड घसरडे नव्हते.
![]() |
नाणेघाटाचा शेवटचा टप्पा |
![]() |
नाणेघाटाच्या प्राचीन दगडी मार्गाला घाटमाथ्यावर भिडणारा आजचा डांबरी रस्ता. समोर जीवधन किल्ला. |
मुंबईचे ९ स्वछंद गिर्यारोहक इथुन बऱ्याच आधी पुढे गेलेले होते. ते आम्हाला भोरांड्याच्या दाराने उतरून गेल्यावरच भेटले.
उन्हात न्हाऊन निघालेलं डोंगरपठार, सर्वत्र हिरवंगार गवत, काही रानफुले, मधेच कुठेकुठे पाणी. दूरवर दिसणारे उंचच उंच डोंगर. उत्कृष्ट लँडस्केप.
![]() |
डोंगरपठारावर ढगात बुडालेले नवरा, नवरी, भटजी, आणि वाजंत्री |
नाणेघाट चढून घाटमाथ्यावर पोहोचल्यावर एक दगडी रांजण दिसतो. ह्या मार्गाचा वापर करणारे व्यापारी इथे टोल देत असणार नाण्यांच्या स्वरूपात. म्हणून हा नाणेघाट.
![]() |
घाटमाथ्यावर पोहोचल्यावर बाजुला दगडी रांजण - सातवाहन कालीन टोल बूथ |
डोंगरपठारावर पोहोचल्यानंतर थोड्या वेळाने आम्ही बाजूच्या नानांच्या अंगठ्याकडे मोर्चा वळवला. घाटमाथ्यावरून कोकणच्या दिशेला थेट आकाशात घुसलेला डोंगर आणि पलीकडे सरळसोट खोल दरी. एक टप्पा आऊट वगैरे नाहीच. डायरेक्ट बाउन्सर कोकणात जाणार. हाईट ची भीती घालवायची असेल तर अतिउत्तम जागा.
![]() | |
नानांच्या अंगठ्या वरून... समोर हिरवाईने नटलेल्या कोकणच्या वाड्या आजुबाजुला भिरभिरणारे चतुर (म्हणजे Dragon flies) ह्या रम्य सकाळी सोनकीच्या फुलांमध्ये आणि ढगांमध्ये जास्त कोण तो खेळ चाललेला |
एकेक करत सर्वजण नानांच्या अंगठ्यावर पोहोचलो. रुपेश खालीच राहिला. मागचे काही आठवडे (त्यात वीकेंड्स पण) त्याच्या कंपनीने त्याला जबरी राबवून काढल्याने बिचारा मिळेल तिथे मिळेल तशी झोप पूर्ण करत होता. यथेच्छ फोटोग्राफी झाल्यावर सर्वानुमते इथे एक खादंती ब्रेक झाला. सुरेश भाग्यवंत सरांनी आणलेली भाकरी, मिरचीचा ठेचा आणि चटणी ज्यांनी नानांच्या अंगठ्यावर बसून खाल्ली तेच खरे भाग्यवंत.
नानांच्या अंगठ्यावरून उतरल्यानंतर आम्ही दूरवर दिसणाऱ्या आमच्या ब्रेकफास्ट च्या जागी पायगाडी वळवली. डोंगरपठारावर सकाळच्या उन्हात न्हालेली रानफुलं. दूरवर दिसणारे सह्याद्रीचे रथी महारथी. असं दिवसभर भटकलं तरी मन भरेल कि नाही सांगता येत नाही.
![]() |
सोनकीच्या फुलांची मुक्तहस्ताने उधळण |
वाटेत एक मेलेला साप सापडला. ह्या भागात साप खूप आहेत म्हणे. आमच्या वाटेल त्यातला एकही नाही आला. सापांविषयी दिवसभरात चांगली डिस्कशन झाली. इतरही अनेक विषय चावले गेले. भुतं, सातवाहन काळ, घाटवाटा, भारतीय स्वातंत्र्यलढा, आजूबाजूचे किल्ले, रानफुलं, वगैरे वगैरे. स्वप्नील खोत हा तर एक चालता बोलता विकिपीडिया आहे. विशेष म्हणजे डोकं आभाळात असूनसुद्धा पाय पक्के जमिनीवर.
![]() |
दुपारच्या उन्हात ढग आणि धुकं हटल्यावरचे नवरा, नवरी, भटजी, आणि वाजंत्री |
रस्त्यावर बसून थोडी फोटोग्राफी झाली. मि माझी फोटो स्टाईल रुपेश आणि उदय मोहिते सरांना शिकवली.
![]() |
फोटोग्राफी करण्याचा मोह कोणाला आवरत नाही |
आधी एक चहाचा राऊंड, मग अनलिमिटेड पोहे, वर अजून एक चहाचा राऊंड असा भरपेट ब्रेकफास्ट झाला. खुर्चीत बसल्या बसल्या मि एक डुलकी घेतली. काहीजण पळशीकरांना भेटून आले.
आता आल्या वाटेने नाणेघाटातून उतरून न जाता भोरांड्याच्या दाराने जायचे होते. भोरांड्याच्या दारापर्यंत पोहोचण्याची एक छोटीशी शोधमोहीम पार पडली.
![]() |
भोरांड्याचं दार |
हि घळ ६०० फूट उतरत जाते. कोकणातल्या घाटवाटा पावसाळ्यात सुद्धा घाम काढतात. उन्हाळ्यात काय होत असेल इथे.
![]() |
भोरांड्याच्या दारानी उतरताना... स्वछंद गिर्यारोहक विशाल काकडे |
उतरायला सुरुवात केली तेव्हा तासाभरात खाली पोहोचू असा अंदाज होता. जसजसे पुढे जाऊ लागलो तसतसा उलगडा झाला. हे काही तासाभराचं काम नाही.
![]() |
शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती The one and only Swapnil Khot |
दगडधोंड्यांनी भरलेली घळ पुढे गेल्यावर अवघड बनत गेली. एके ठिकाणी डावीकडे एक आणि उजवीकडे एक अशा दोन वाटा दिसल्या. उजवीकडची वाट गावात जाते. डावीकडच्या वाटेने उतरून गेलो. आता वाट शोधावी लागत होती. एखादं झाडावरचं मार्किंग, कुठे दगडावर रंगवलेला बाण. काही वेळ मि लीड ला राहून वाट शोधली.
![]() |
दगडांचा हा माझा देश जितका राकट कणखर, तितकाच मृदू मुलायम |
भोरांड्याच्या ह्या घाटवाटेल पाण्याची चिंता नाही. खळाळत्या झर्याचं गोड पाणी शेवटपर्यंत साथीला राहतं. पावसाळा संपुन झरा आटल्यावर मात्र पुरेसं पाणी बरोबर ठेवलंच पाहिजे.
![]() |
पाणी प्यावं तर असं. हेच खरे भाग्यवंत. |
दोन चार वेळा झरा ओलांडावा लागला. झरा ओलांडायला सोपा आहे, फक्त सावध राहवं. शेवाळ्याने भरलेले दगड घसरडे होते. शेवाळ्याचा थर जितका जाड तितकी घसरण जास्त.
![]() |
अश्या कुत्र्याच्या छत्र्या (mushrooms) जागोजागी होत्या |
निसर्गदेवतेच्या कृपेने पाऊस आला नाही. पाऊस आला असता तर हि वाट आणखीनच अवघड झाली असती.
![]() |
भोरांड्याच्या दारानी उतरणारे ११ स्वछंद गिर्यारोहक |
![]() |
हा झरा भोरांड्याच्या दारात जो सुरु झाला तो माळशेज घाटाचा रस्ता येईपर्यंत सोबतीला होता |
सव्वातीन तासात आम्ही भोरांड्याच्या दाराने उतरून आलो. मागे वळुन पाहिल्यावर दूरवर दिसत होतं भोरांड्याचं दार.
![]() |
उतरून आल्यावर एकदा पाहून घेतलं, कुठच्या भोरांड्याच्या दारातून खाली आलोय आपण |
सरत्या पावसाच्या दिवसातला हा ट्रेक काय वर्णावा. उन्हाचा रखरखाट नाही. थंडीचा कडाका नाही. झोडपणारा पाऊस नाही. सर्वत्र आल्हाददायक वातावरण. टोळक्याचा मेळ व्यवस्थित जमलेला. सगळीकडे रानफुलांची सोबत. खाण्यापिण्याची चंगळ. बरोबर घेतलेले पाणी संपण्याचा धोका नाही. हे सगळं कमी पडतं म्हणुन कि काय नानांच्या अंगठ्यावरून दिसणारा अलौकिक नजारा, एक नवीन घाटवाट उतरण्याचं समाधान, प्यायला हवं तितकं झऱ्याचं चवदार पाणी, आणि शेवटी झऱ्यातली डुंबाडुंबी म्हणजे कळसच झाला.
![]() |
खळाळत्या झऱ्यातली हि मजा शब्दात कशी सांगावी |
झऱ्यातली डुंबाडुंबी थांबवुन बाहेर पडायला कोणीच तयार नव्हतं. झऱ्यासमोर दिसणारा पूल आणि गाड्यांचे आवाज मात्र आजच्या जगाची आठवण करून देत होते.
खाते पिते घर के ४ जाडजूड सुटलेले मर्द रस्त्यावरून झऱ्याच्या काठाला उतरले. बॉड्या काढून ठेऊन काहीतरी खायला लागले. बहुदा खाऊन झाल्यावर झऱ्यात एन्ट्री मारणार असावेत.
नाईलाजाने झरा सोडून आम्ही रस्ता पकडला. काय करणार. १२ तास निसर्गाच्या बरोबर राहिल्यानंतर मग ह्या मानवनिर्मित कृत्रिम वातावरणात परत येणं फार अवघड होतं. विशालने ड्राइवर काकांना फोन करून बोलावून घेतले. आवरा आवरी करून गाडीत बसलो.
बायकर्सची एक मोठी झुंड रस्त्याच्या कडेला थांबली होती. त्यांच्यातला एक जण वळण घेताना रस्ता सोडून बाजुच्या खोलगट भागात पडला होता. त्यांचं मदतकार्य चालू होतं.
मुंबईचे ९ स्वछंद गिर्यारोहक जवळच पोहोचले होते. बसने त्यांच्याकडे गेलो. थोड्या गप्पा टप्पा झाल्यावर आमची बस पुण्यनगरीच्या दिशेने निघाली. बसमध्ये मी जमेल तेवढी झोप काढली. थोड्या वेळाने चहा वडापावचा pitstop आला. मी झोपुनच राहिलो बसमध्ये.
जेवणासाठी एका ठिकाणी थांबलो. ११ पैकी ५ व्हेज आणि ६ नॉनव्हेज अशी विभागणी झाली. व्हेज वाले त्यांच्या आवडीच्या ठिकाणी आणि नॉनव्हेज वाले त्यांच्या आवडीच्या ठिकाणी. दोन्ही हॉटेलं ५० मीटर अंतरावर.
जेवायला माझ्या शेजारी स्वप्नील खोत हा निगर्वी निर्भीड सह्यमित्र बसला होता. जग जिंकलंयस तु मित्रा. ह्या सह्याद्रीला अभिमान आहे तुझ्यासारख्या सह्यमित्रांचा. तुझ्यासारख्यांसाठीच ह्या ओळी लिहिल्या आहेत
क्या ये उजाले
क्या ये अँधेरे
दोनों से आगे है मंज़र तेरे
क्यों रौशनी तू बाहर तलाशे
तेरी मशालें हैं अंदर तेरे
क्यों ढूंढना पैरों के निशां
जाए वहीं ले जाए जहाँ
आणि मला सुचलेल्या ह्या चार ओळी
स्वप्नील खोत येति ट्रेकला
तोचि दिवाळी दसरा
पोटोबा भरल्यानंतर सर्वांना घरी परतायचे वेध लागले होते. परतीच्या प्रवासात विशालने त्याचा गाण्याचा तास सुरु केला. इतरांनी त्याला जमेल तशी साथ दिली. साडे अकरा वाजता नाशिक फाट्यावर रुपेश आणि मि गाडीतुन उतरलो. ४ किलोमीटर आणि ४० मिनिटात मि चालत घरी पोहोचलो.
ह्या offbeat ट्रेक ला किती खर्च आला ते विचारूही नका. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरची हि भटकंती पैश्यात मोजता येत नाही. भाग्य लागतं नशिबाला.
खुप सुंदर लिहिलाय blog.. तुमची लेखनशैली विशेष आहे.. लवकरच पुन्हा trek करू😊😊
ReplyDeleteधन्यवाद स्वप्नील
DeleteLay bhari!
ReplyDeleteधन्यवाद रुपेश मित्रा
DeleteBravo Yogesh... Bravo.... Awesome post
ReplyDeleteधन्यवाद शिरीष
DeleteVery interesting!!!
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDeleteधन्यवाद दत्ता भाऊ
Delete