खरं तर हि बखर आहे पण वेळेअभावी आज तिची खरडवही बनवतोय. २६ जानेवारी २०१९, भारताच्या सत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर स्वछंद गिर्यारोहकांबरोबर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई सहकुटुंब सर करण्याचं भाग्य आम्हास लाभलं. त्यानिमित्त ह्या चार ओळी खरडवहीत उमटवल्या.
२६ जानेवारी २०१९, भारताचा सत्तराव्या प्रजासत्ताक दिन शनिवारी आल्यामुळे ह्या शुभ दिवशी कळसुबाई सर करायला खूप गर्दी असेल असं वाटलं होतं. पण आमच्या अपेक्षेपेक्षा कमी गर्दी होती.
शुक्रवारी रात्री जेऊन झाल्यावर पुण्यातून निघालो. बारी गावात रात्री कधीतरी तीन वाजता पोहोचलो. पोहे आणि चहा संपवून डोंगर चढायला सुरुवात केली. अंधार असल्यामुळे किती लांब जायचंय ते कळतच नव्हतं. पुढे गेलेल्या ग्रुपच्या बॅटऱ्या चमकत होत्या. त्यामुळे वाट कुठे आहे त्याचा अंदाज येत होता. मागच्या वेळी बारी गावातल्या कुत्र्यांचा उपद्रव झाला होता तसा ह्या वेळी झाला नाही.
शिड्या चढून गेलो तेव्हापण अंधार होता. पुढे काही ठिकाणी वाटेच्या बाजूला पिवळे दिवे चालू होते. एक एक दिवा गाठत वाटचाल करत राहिलो.
सूर्योदय व्हायच्या आधी आम्ही कळसुबाई शिखरावर पोहोचलो होतो. बरोबरचे काही स्वछंद गिर्यारोहक यायला वेळ होता. सगळे येईपर्यंत आम्ही तासभर तरी शिखरावर होतो. कसे होतो विचारू नका. मंदिराच्या मागच्या भिंतीला टेकून बसलं तर जरा बरी परिस्थिती होती. तिथून जरा लांब गेलो कि थंड वारा झोडपून काढत होता. वाऱ्याच्या झोतात एका जागी थांबलं तर त्या दिशेने कपड्यांवर बारीक हिमकण जमा होत होते.
हाडं गोठवणारी थंडी, बोचरे वारे, कडाक्याचा गारठा, वगैरे वगैरे सगळं फिकं पडेल असं वातावरण होतं कळसुबाई शिखरावर. थंडी वाऱ्याचा इतका कडकडाट अपेक्षित नसल्यामुळे आम्ही फारशा तयारीनिशी नव्हतो. बॅगेतून कॅमेरा बाहेर काढलाच नाही. खिशात हात घालून मोबाईल पण बाहेर काढू शकलो नाही. हाताची बोटं थंडगार सुन्न आणि कडक झालेली.
दीप्ती आणि खुशीने थंडीचा तडाखा सहन करून, न थकता ट्रेक पूर्ण केला. अवघड ट्रेक खुशी न धडपडता यशस्वीरीत्या पूर्ण करते ह्यावर आधीच शिक्कामोर्तब झालेलं आहे.
स्वछंद गिर्यारोहकांबरोबर केलेला प्रत्येक ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण होतोच, तसेच संस्मरणीयही ठरतो हि परंपरा कायम राहिली.
ट्रेकचं योग्य नियोजन, आणि त्या दिवशी समोर असलेली परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार विशालने उत्तम प्रकारे ट्रेक पार पाडला.
लोखंडी शिड्या उतरताना गर्दी होती. शिड्यांच्या भागात ह्यावेळी माकडांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला.
निम्मा रस्ता उतरल्यावर मी कॅमेरा बॅगेतून बाहेर काढला. कॅमेरा हातात आल्यावर माझा आणि खुशीचा वेग निम्म्यावर आला.
पंगुं लंघयते गिरिम् असं कधीतरी कुठेतरी वाचणं आणि प्रत्यक्षात समोर बघणं ह्यात बराच फरक आहे.
Common name = Indian Squirrel Tail
मराठी = भामण
नेपाळी = धुर्सुली
Botanical name = Colebrookea oppositifolia
उतरताना दुसऱ्या टप्प्याला गर्दी कमी झाल्यावर खुशी आणि मी झाडांचे, फुलांचे फोटो काढले.
Common name = East Indian Globe Thistle
मराठी = गोरखमुंडी
Botanical name = Sphaeranthus indicus

२६ जानेवारी २०१९, भारताच्या सत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर स्वछंद गिर्यारोहकांबरोबर, सहकुटुंब, महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखरावर |
हाडं गोठवणारी थंडी, बोचरे वारे, कडाक्याचा गारठा, वगैरे वगैरे सगळं फिकं पडेल असं वातावरण होतं कळसुबाई शिखरावर. थंडी वाऱ्याचा इतका कडकडाट अपेक्षित नसल्यामुळे आम्ही फारशा तयारीनिशी नव्हतो. बॅगेतून कॅमेरा बाहेर काढलाच नाही. खिशात हात घालून मोबाईल पण बाहेर काढू शकलो नाही. हाताची बोटं थंडगार सुन्न आणि कडक झालेली.
दीप्ती आणि खुशीने थंडीचा तडाखा सहन करून, न थकता ट्रेक पूर्ण केला. अवघड ट्रेक खुशी न धडपडता यशस्वीरीत्या पूर्ण करते ह्यावर आधीच शिक्कामोर्तब झालेलं आहे.
स्वछंद गिर्यारोहकांबरोबर केलेला प्रत्येक ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण होतोच, तसेच संस्मरणीयही ठरतो हि परंपरा कायम राहिली.
ट्रेकचं योग्य नियोजन, आणि त्या दिवशी समोर असलेली परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार विशालने उत्तम प्रकारे ट्रेक पार पाडला.
लोखंडी शिड्या उतरताना गर्दी होती. शिड्यांच्या भागात ह्यावेळी माकडांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला.
निम्मा रस्ता उतरल्यावर मी कॅमेरा बॅगेतून बाहेर काढला. कॅमेरा हातात आल्यावर माझा आणि खुशीचा वेग निम्म्यावर आला.
पंगुं लंघयते गिरिम् असं कधीतरी कुठेतरी वाचणं आणि प्रत्यक्षात समोर बघणं ह्यात बराच फरक आहे.
पंगुं लंघयते गिरिम् Enlightened souls seen during trek to Kalsubai, the highest peak in Maharashtra on morning of 26 January 2019, the 70th Republic Day of India |
भामण |
Common name = Indian Squirrel Tail
मराठी = भामण
नेपाळी = धुर्सुली
Botanical name = Colebrookea oppositifolia
उतरताना दुसऱ्या टप्प्याला गर्दी कमी झाल्यावर खुशी आणि मी झाडांचे, फुलांचे फोटो काढले.
डोंगरातले ढग ... आणि ढगातले डोंगर |
गोरखमुंडी |
Common name = East Indian Globe Thistle
मराठी = गोरखमुंडी
Botanical name = Sphaeranthus indicus
बारी गावजवळचं लोखंडी प्रवेशद्वार |
कळसूबाईचा प्रसाद |
बारी गावातली शेतं, पलीकडे डोंगराळ भाग |
Good read . You should have given more description on your climb and descent did u enjoy at the plateau just before stairs that is awesome view
ReplyDeleteछान
ReplyDeleteतुमचं लेखन फारच छान आहे, माझ्या कळसुबाई ट्रेकच्या आठवणी ताज्या झाल्या,मी हा ट्रेक पावसाळ्यात केला नव्हता,पण तुमचा अनुभव वाचून पुन्हा एकदा पावसाळ्यात करण्याची इच्छा झाली आहे
ReplyDelete