रात्री कधीतरी पावसाला जि सुरुवात झाली तो थांबलाच नव्हता. वातावरण थंडगार त्यामुळे सकाळपासुन. एका मित्राबरोबर घोराडेश्वरला जायचा बेत बनवला होता. पावसाने तो वाहुन गेला. ब्रेकफास्ट झाल्यावर जायचं मि ठरवलं. खुशीला पावसात फिरायला आवडतं. ति तयार झाली यायला. खुशी येतेय म्हणुन दीप्तीपण तयार झाली.
चढायला सुरुवात केली तेव्हा आम्ही तिघेच. रविवार असुन सुद्धा कोणीच नव्हतं. चार पाच कॉलेजची पोरं पोरी खाली आली. बाकी पूर्ण वेळ आम्हीच. जोडीला पाऊस आणि वारा.
पहिल्या पाच मिनिटातच दीप्ती "घरी चला" करायला लागली. खुशीचा जोर आज भलताच होता. सारखी पुढे पुढे जात होती. दीप्तीला ओढून न्यायला लागत होतं. थोडंच राहिलं थोडंच राहिलं करत दीप्तीला वरपर्यंत घेऊन गेलो. नेलेले सामोसे खायला जागा शोधली. एका टेकाडाच्या मागे, जिथे वारा थोडा कमी लागेल असं. उभ्याउभ्याच खाल्ले. खाईपर्यंत ओले आणि गार झाले सगळे. पाऊस चालू होताच. डोंगरावर त्याचा जोर भलताच वाढलेला. पाऊस आणि वारा हे कॉम्बिनेशन डेडली होतं.
काही गोष्टींची किंमत पैश्यात करता येत नाही. आकडे अपुरे पडतात हो. घरच्या उबेची किंमत अशा उघड्या डोंगरावर पावसाने झोडपल्याशिवाय कशी समजणार. घरी आल्यावर तिघेही गुडुप्प झोपुन गेलो.
खुशीची तयारी होतेय हळुहळु मोठ्या ट्रेक्स साठी. एक दोन वर्ष्यात आम्ही तिघं जाऊ ट्रेकिंगला. पाहुया कसं जमतंय ते.

No comments:
Post a Comment