माझा आवडता ऋतु आहे हिवाळा. थंडी. पण थंडी पडायला अजुन वेळ आहे. सध्या चालु आहे सप्टेंबर. सप्टेंबर म्हणजे ट्रेक करायला उत्तम दिवस. गणेश चतुर्थीच्या शुभ दिवशी आम्ही पुन्हा एकदा तिकोना सर करायचा बेत ठरवला. तसा तिकोना मी "य" वेळा सर केलाय. पण दिप्ती आणि खुशी नेहमी येत नाहीत ना. मागच्या वर्षीच्या गणेश चतुर्थीच्या शुभ दिवशी केलेल्या ट्रेक मधुन शिकलेल्या दोन गोष्टी म्हणजे :
१. ह्या दिवशी रस्त्याला ट्रॅफिक नसतं. अपवाद पुण्यातुन कोकणात जाणारे रस्ते.
२. किल्ले रिकामे असतात.
आजच्या ट्रेक साठी तिकोना का निवडला ?
१. पुण्यातुन कोकणात जाणारं ट्रॅफिक आम्हाला सकाळी लागणार नव्हतं.
२. लोणावळा आणि मावळ परिसरात जून - जुलै मधे होणारी आचरट पर्यटकांची गर्दी आता संपली होती.
माझा दिवस ४:५५ ला उजाडला. तिघं आवरून घरातुन निघायला पावणे सहा होऊन गेले होते. रस्त्यावर तुरळक वाहनं. आज भल्या पहाटे उठून किल्ल्यावर निघालेले आमच्यासारखे आम्हीच. आमच्या घरापासुन तिकोना पर्यंतचा रस्ता मला पाठ आहे. गुगल मॅप च्या बाईला मी हा रस्ता सांगु शकतो.
खुशी मागच्या सीट वर आडवी झोपली होती. दिप्तीही पुढे डुलक्या काढत होती. जुन्या मुंबई पुणे रस्त्याने कामशेत पर्यंत जाऊन डावीकडचा रस्ता घेतला. पुढे पवनानगर वगैरे परिसरात काही ठिकाणी रस्त्यात खड्डे, तर काही ठिकाणी खड्ड्यात रस्ते. पण जेंव्हापासुन मी काठमांडू मधले रस्ते बघितलेत तेव्हापासुन भारतातल्या रस्त्यांना आणि ते रस्ते बनवुन घेणाऱ्यांना शिव्या घालणं सोडुन दिलंय. तिकोना किल्ल्याच्या पायथ्याचं तिकोनापेठ गाव जवळ आलं होतं. दहा मिनिटांच्या अंतरावर. एक बाई जड ओझं घेऊन चालत चालल्या होत्या. आमची गाडी येताना बघून थांबल्या. त्यांना लिफ्ट दिली. त्यांना जायचं होतं जवण गावाला. म्हणजे तिकोनापेठच्या पुढचं गाव. त्यांच्या विनंतीवरून त्यांना त्यांच्या जवण गावात सोडलं. तिकोनापेठच्या पुढे आलोच आहोत तर तिकोनाच्या ऐवजी तुंग करायचं ठरवलं.
दरवेळी तिकोना वरून तुंग बघताना तो आशेने बघत असतो. इकडे येताय ना. का नेहमीप्रमाणे तिकोनावरूनच परत. असा दुजभाव कशासाठी. आज वाट लांबडी करून तुंगकडे निघालो. लांबडी म्हणजे पवना धरणाच्या दूरवर पसरलेल्या पाणीसाठ्याला भलामोठा वळसा घालून तुंगच्या पायथ्याला पोहोचावं लागतं. तिकोनापेठ पासुन पुढे पाऊण तास.
तिकोनापेठ ते तुंग ह्या रस्त्याला ट्रॅफिक असे नाहीच. पण रस्त्याला खड्डे बरेच आहेत. त्यामुळे गाडी सुसाट चालवता येत नाही. खुशी आणि दिप्ती गाडीत झोपलेल्या असल्या कि मी गाडी फार जोरात पळवत नाही.
आता मी मधे मधे गाडी थांबवुन फोटो काढायला सुरुवात केली. सप्टेंबर महिन्यातली रानफुलं जिकडे तिकडे. सोनकीची छोटी पिवळी फुलं होतीच. इतरही बरीच होती.
एका झाडावर बगळे दिसले त्यांचा फोटो घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे. पक्षांचे फोटो काढायला वेगळी लेन्स घ्यावी लागेल. ह्या १८ - ५५ लेन्स ने पक्षांचे फोटो जमत नाहीत.
नेहमी न दिसणारी जरा वेगळी फुलं दिसली कि गाडी थांबवून त्यांचे फोटो काढायला सुरुवात केली. हि लालसर पिवळी कांडी कसली आहे ते मी अजून शोधतोय. Zingiber diwakarianum असावे. नक्की माहिती नाही.
थोडं पुढे गेल्यावर रस्त्याच्या कडेला एका ठिकाणी आकर्षक वेगळी फुलं दिसली. गाडी थांबवुन फोटो काढले. हि एक विषारी वनस्पती आहे. ह्या वनस्पती बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी इथे टिचकी मारा. झिम्बाब्वे ह्या देशाचे हे राष्ट्रीय फुल आहे.
Common name = Glory Lily
मराठी = कळलावी, अग्निशिखा, वाघचबका
Botanical name = Gloriosa superba
थोडं पुढे गेल्यावर पवना धरणाच्या पाणीसाठ्यात तुंग किल्ल्याचं प्रतिबिंब छान दिसत होतं. तो फोटो काही मला घेता आला नाही. एका ठिकाणी भारंगी दिसल्यावर पुढे भारंगी आणि पाठीमागे दूरवर तुंग असा फोटो घेतला.
Common name = Blue Fountain Bush
मराठी = भारंगी
Botanical name = Rotheca serrata
रस्त्याच्या कडेला गवतावर पसरलेली दोन कोळ्याची जाळी दिसली. तिकोनापेठ ते तुंग हा रस्ता इतर रस्त्यांसारखा नाही. इथे ट्रॅफिक नसल्यामुळे बरंच काही आहे.
एक दोन ठिकाणी छोटे तपकिरी रंगाचे पक्षी पळत जाताना दिसले. Quail असावे. नक्की कोणते ते मला ओळखता येत नाहीत. जमिनीवरून पळणारे असले पक्षी आम्ही तुंग तिकोना परिसरात आधीही पाहिलेत.
आठला किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचलो. पार्किंगच्या जागेत गाडी लावली. आमच्याशिवाय कोणीच नव्हते. माकडांचा एक कळप झाडांवरून उड्या मारत गेला. पार्किंगच्या जागेसमोर दोन बोर्ड आहेत तुंग किल्ल्याची माहिती देणारे ते वाचले. आजुबाजुला छोटी निळी जांभळी फुलं बरीच दिसत होती त्यांचे फोटो घेतले.
Common name = Lambert's Borage
मराठी = हिरवी निसुर्डी
Botanical name = Adelocaryum lambertianum
दिप्ती आणि खुशीला थोडा वेळ देऊन मग सावकाशपणे चढायला सुरुवात केली. मी पुढे, मधे खुशी आणि मागे दिप्ती. कैलासगडला दिप्तीला पुढे ठेऊन मि मागे राहिलो होतो. ति चुक परत केली नाही. फुटबॉल काय किंवा ट्रेकिंग काय, फॉर्मेशन हि लाखमोलाची गोष्ट आहे.
पिवळी स्मिथिया फुलं घोळक्याने अनेक ठिकाणी फुललेली. ह्या फुलांना मिकी माउस म्हणतात. वाऱ्याबरोबर डुलली कि मजेदार वाटतात.
Common name = Hairy Smithia
मराठी = कावळा
Botanical name = Smithia hirsuta
वाटेशेजारी डावीकडे कातळात पहारेकऱ्यांची छोटी जागा खोदलेली. तिथे आता एक मारुतीची मूर्ती आहे.
पुढे नेहमीपेक्षा वेगळी फुलं दिसली. गुलाबी अडुळसा.
Common name = Squirrel Tail
मराठी = गुलाबी अडुळसा
Botanical name = Justicia betonica
एका ठिकाणी उजवीकडे थोडं पुढे गेल्यावर खांब टाकी आहेत. दिप्ती आणि खुशीने माझा तिकडे जाण्याचा विचार हाणून पाडला.
नाजुक गुलाबी तेरड्याची फुलं सोनकीची बरोबरी करायला सगळीकडे.
Common name = Garden Balsam
मराठी = तेरडा
Botanical name = Impatiens balsamina
वाटेच्या उजवीकडे थोड्या उंचावर एक पाण्याचं टाकं आहे. पावसाळ्यात निसरड्या दगडावर तिथे चढणं जरा अवघड आहे. तिथे जायचा प्रयत्न न करता आम्ही पुढे गेलो. जरा पुढे गेल्यावर पहिला दरवाजा समोर दिसायला लागला.
सुरक्षिततेच्या दृष्टीने पहिला दरवाजा तिथे येणाऱ्या वाटेपेक्षा उंचावर बनवला आहे.
सप्टेंबर महिना ट्रेकिंग साठी का उत्तम असतो हा ज्याने त्याने स्वतः शोधून काढायचा प्रश्न आहे. तरी तुंगच्या पहिल्या दरवाज्याचा मी मागच्या वर्षीच्या नोव्हेंबर मधल्या एका सकाळी काढलेला फोटो पहा.
पहिल्या दरवाजातुन आत गेल्यावर लगेच येतो दुसरा दरवाजा. दुसऱ्या दरवाजाकडे जाण्यासाठी उजवीकडे वळावे लागते. दरवाजासमोर गोलसर मोकळी जागा सोडली आहे. इथे शत्रू थांबला तर तिन्ही बाजूंच्या भिंतींवरून त्याच्यावर हल्ला करता येईल.
इथल्या भिंतीतल्या एका दगडात कोरलाय मारुती. शक्तीची देवता मारुती गडावर पाहिजेच.
दरवाजासमोरच्या मोकळ्या गोल जागेत येण्यासाठीची वाट मुद्दाम छोटी ठेवलेली आहे. जेणेकरून एकावेळी खूप माणसं तिथे येणार नाहीत.
कोणत्या तरी दुर्ग संवर्धन संस्थेने इथे लाकडी दरवाजा बसवलाय. मागच्या वर्षी मी इथे आलो होतो तेव्हा दरवाजा बसवण्याचं काम चालु होतं.
दुसऱ्या दरवाजाच्या आत दोन्ही बाजुला पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. देवड्या म्हणजे दरवाजाच्या आतल्या बाजुला पहारेकऱ्यांना राहण्यासाठीची जागा. देवड्या म्हणजे काय ते खुशीला सांगितले. एका देवडीत कोनाडा आहे. कोनाडा म्हणजे भिंतीतला कप्पा. वस्तू ठेवण्यासाठी. तसेच रात्रीच्या वेळी दिवा लावण्यासाठी.
दुसऱ्या दरवाजातुन आत गेल्यावर छोटं पठार आहे. इथे डावीकडे पुढे जाऊन माची आणि बुरुज पाहिले जिथे आम्ही गेलो नाही.
४ सप्टेंबर १६५६ रोजी शिवाजी महाराजांनी आदिलशहाच्या ताब्यातील हा किल्ला जिंकुन घेतला. किल्ल्याचे नाव कठीणगड असे ठेवले. मुघल सरदार जयसिंग आणि दिलेरखान ह्यांनी ६ मे १६६५ रोजी तुंग आणि तिकोना परिसरातली अनेक गावं जाळली. पण हे किल्ले ते जिंकू शकले नाहीत. पुढे पुरंदरच्या तहामध्ये हा किल्ला मोगलांना देण्यात आला. नंतर १६७० किंवा १६७१ ह्या काळात कधीतरी शिवाजी महाराजांनी हा किल्ला पुन्हा जिंकुन घेतला. पुढची ३३ वर्ष कठीणगड मराठ्यांच्या ताब्यात होता. १३ मे १७०४ रोजी मुगल सरदार अमानुल्ला खान ह्याने हा किल्ला जिंकला. औरंगजेबाने किल्ल्याचे नाव बंकीगड असे ठेवले. दिल्लीहुन महाराष्ट्र बुडवायला आलेला औरंगजेब १७०४ मधे महाराष्ट्रातच हाय खाऊन गेला. मोगल साम्राज्याची पीछेहाट सुरु झाली. तुंग किल्ला मोगलांकडून हिरावला गेला. १८१८ साली ब्रिटिशांनी इतर अनेक किल्ल्यांबरोबर तुंग किल्लाही जिंकुन घेतला. नंतरच्या काळात हा किल्ला भोर संस्थानाच्या ताब्यात होता.
आम्ही आता गणेश मंदिराकडे निघालो. मी पुढे, खुशी मधे, आणि दिप्ती मागे. एका ठिकाणी वाटेत माझ्या समोरून एक छोटा काळपट साप बाजुच्या झुडुपात गेला. दिप्ती आणि खुशीला सांगितलाच नाही. सांगितला असता तर आमचा तुंग किल्ला इथेच संपला असता. आणि परतीच्या वाटेतही अनेक शंका कुशंका आडव्या आल्या असत्या.
गणेश मंदिराच्या बाजुचा छोटा तलाव हिरव्या पाण्याने भरलेला. गणेश मंदिरासमोर दिप्तीने गणपतीची आरती म्हटली. आम्ही दोघं दोन बाजुला हात जोडुन उभं राहिलो. आज गणेश चतुर्थी. तरी बरं दिप्ती गणपतीची आरती म्हणून थांबली. इतर आरत्या सुरु नाही केल्या.
गणेश मंदिरासमोरच्या छोट्या जांभळ्या फुलांचे फोटो घेतले.
Common name = Water Willow
मराठी = करंबल
कोकणी = घाटी पित्तपापड
नेपाळी = बिसाउने झार, खुर्सानी झार
Botanical name = Justicia procumbens
आजुबाजुच्या परिसरातुन मोरांचे आवाज अधून मधून ऐकू आले.
मराठी = निलवंती
Botanical name = Cyanotis fasciculata
ट्रेकिंग का करावे ह्या प्रश्नाच्या पन्नास उत्तरांपैकी काही दिप्ती आणि खुशीला समाजलीयेत. पुढे जाऊन बाकीचीही समजतील.
पांढरी छोटी फुलं आणि कळ्या काही ठिकाणी दिसल्या. एका दांडीवर एक कीटक येऊन बसला. निळसर हिरव्या पंखांचा.
Common name = Scaly-Stem Chlorophytum
Botanical name = Chlorophytum glaucum
बालेकिल्ल्यावर जायची वाट अवघड अशी नाही. पण जपुन जावे. एका बाजुला दरी आहे. गणेश मंदिर ते बालेकिल्ला ह्या भागात आज फुलांची विविधता पहायला मिळाली. सप्टेंबर असल्यामुळे. एरवी तुंग फक्त ऐतिहासिक किल्ला म्हणुन पहावा लागतो. किंवा पाऊण तासात बालेकिल्ल्यावर पोहोचायचा शारीरिक व्यायाम म्हणुन.
Common name = Konkan Begonia
मराठी = गजकर्णिका
Botanical name = Begonia concanensis
चढाईला सुरुवात केल्यापासुन एका तासात बालेकिल्ल्यावर पोहोचलो. तुंगीदेवीचे मंदिर पाहिले. मंदिरासमोरची खोदीव गुहा पाहिली. खालच्या गावातले आवाज इथे ऐकू येत होते. तुंग किल्ल्याचा बालेकिल्ला इतर सर्व किल्ल्यांच्या बाल्लेकिल्ल्यांपेक्षा छोटा असेल. पण इथून चहुबाजूंना दूरपर्यंत नजर ठेवता येते. तुंग किल्ल्याची समुद्रसपाटीपासुनची उंची आहे ३५३० फूट. पवन मावळातला तुंग हा एक घाटरक्षक किल्ला होता. जुन्या काळी बोरघाटामार्गे चालणाऱ्या वहातुकीवर लक्ष ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याचा उपयोग होत असे. बालेकिल्ल्यावरून लोहगड, विसापुर, कोराईगड, तिकोना, मोरगिरी हे किल्ले दिसतात. दरवेळी तिकोना वरून तुंग पहातो. आज तुंग वरून तिकोना पहात होतो.
पिवळ्या सोनकीचा बहर तिकोनापेठ सोडल्यापासुन अधे मधे सोबतीला होता. इथे बालेकिल्ल्यावरही.
Common name = Graham's groundsel
मराठी = सोनकी
Botanical name = Senecio bombayensis
बालेकिल्ल्यावर फोटो उत्कृष्ट येतात. फोटोग्राफी सुरु करतोय तोपर्यंत दिप्तीला एक मधमाशी चावली. इथे खूप मधमाशा आहेत ह्याची दिप्ती आणि खुशीला आता जाणीव झाली. मग काय. राहिली फोटोग्राफी. चला तडक खाली. जितकी फुलं तितक्याच मधमाशा. मधमाशा आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाच्या आहेत. कशा ते तुम्हाला माहिती नसेल तर हे वाचा. हे हि वाचा. आणि हे पण वाचा.
समोरच्या घराचं लोकेशन बघुन घ्या. शेणात गेले ते प्रदुषणाच्या विळख्यात अडकलेल्या शहरातले दीड दोन कोटीचे फ्लॅट. आणि त्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्याचा सत्तर लाखाचा बँक बॅलन्स. होय मि त्याच घराबद्दल बोलतोय ज्याच्या चहुबाजूंनी पाणी आहे. घरापर्यंत जायला एक वाट आहे.
मी दोन चार फोटो काढतोय तो पर्यंत दिप्ती आणि खुशी माझ्या पुढे पटापट उतरून गेल्या. गळ्यात अडकवलेला कॅमेरा सांभाळत उतरायला मला वेळ लागत होता. तसाही उतारण्यात मी सावकाशच आहे. चढण्यात मी वेग पकडतो. पायातली ताकद चढताना कामी येते. उतरताना ताकदीचे काय काम. उतरताना शरीराचा तोल सांभाळण्याचं कसब उपयोगाचं. पाण्याची टाकं आहेत तिकडे दिप्ती आणि खुशीला जायचं नव्हतं. तिथे जायची वाट जिथे आहे तिथपर्यंत मी यायच्या आताच दोघी तिथून खाली सटकल्या. खुदुखुदु हसत होत्या. थोडं उतरून गेल्यावर थांबुन आणलेली बिस्कीटं खाल्ली. पाणी प्यायलो.
मी पुढे राहुन माझ्या मागे खुशी आणि तिच्या मागे दिप्ती असे आता उतरायला लागलो. मी मुद्दामच वेग कमी ठेवला. पळू नको म्हणून खुशीला अधेमधे सांगितलं. तुंग किल्ल्यावरून उतरताना कोणी पाय सटकुन दरीत खाली पडलं तर डायरेक्ट डोंगराच्या तळाला जाऊन थांबणार. अधे मधे कुठे स्टॉप नाही. ह्या वर्षीच एक मुलगी उतरताना दरीत खाली पडुन मृत्युमुखी पडली. असो. आम्ही तिघेही कुठेही न धडपडता एक एक टप्पा उतरत होतो.
दुसऱ्या दरवाजाच्या समोरच्या भागात गेल्यावर तिथून समोर भिंतीपकडे सूर्यदेव पृथ्वीवरील सर्व जीवजंतुंना ऊर्जा देण्याचे कार्य अखंड नित्यनेमाने करताना दिसत होते. त्यांचा एक वेगळा फोटो घेण्याचा प्रयत्न केला. मोबाईल मधून काढलेल्या फोटोत असे चमकदार सूर्यकिरण कधीच दिसत नाहीत. मला तरी कधीच जमलं नाहीये मोबाईल मधून असला फोटो काढायला.
पहिल्या दरवाजाच्या अलीकडच्या भिंतीवर बसून दिप्ती आणि खुशीचे फोटो काढले.
इथून एक वाट माची आणि बुरुजाकडे जाते तिकडे जायला परत दिप्ती आणि खुशीचा नकार. दरवाजातुन पलीकडे किल्ला उतरत निघालो. पुन्हा एकदा सगळ्यात पुढे मी, मधे खुशी, आणि मागे दिप्ती.
गळ्यातला कॅमेरा मि बॅगेत ठेऊन दिला. कोणतीही धावपळ गडबड न करता सावकाश उतरत होतो. तुंग किल्ल्याची वाट बऱ्याच ठिकाणी अरुंद आहे. एक माणूस जाईल इतकीच. वाटेच्या कडेला वाढलेलं गवत आणि झुडुपं ऐन भरात असल्यामुळे वाट अरुंद झाली होती. उन्हाळ्यात गवत आणि झुडुपं वाळून गेल्यावर हीच वाट अरुंद रहात नाही.
इथे काही छोटे खेकडे आणि बेडूक दिसले. एक खेकड्याचं पिल्लू पूर्ण लाल रंगाचं होतं.
माझ्या पायाखाली नकळतपणे एक छोटा खेकडा चिरडला गेला. माझ्या मागोमाग येताना खुशीने पाहिला. अशी अजाणतेपणी केलेली हत्या आपल्या अकाउंट मधे जमा होत नाही असा माझा समज आहे. ऍक्शन (किंवा इनॅक्शन), म्हणजे आपली कृती नाही, तर त्यामागचे आपले इंटेन्शन (म्हणजे हेतू) जे काही असेल ते आपल्या अकाउंट मधे जमा होते. अर्थात हा माझा विचार आहे. तुमचा वेगळा असू शकतो. असो. विषय भलतीकडे जाण्याआधीच थांबूया.
खुशी sure footed आहेच. उतरताना न घाबरता पटापट उतरते. कसलाही गडबड घोटाळा नको म्हणून पुढे राहून मी अधे मधे अर्ध्या मिनिटांचे छोटे ब्रेक घेतले.
उतरताना शेवटच्या टप्प्याला तीव्र उतार आहे. घसारा (स्क्री) कुठेच नाही. दगडात होल्ड मिळतात. फोटोग्राफी करत करत पाऊण तासात उतरून आलो. आम्ही उतरून आलो तेव्हा नवख्या ट्रेकर्स ची एक टोळी चढायला सुरुवात करत होती. माझ्या तुंगच्या मागच्या भेटीत असंच झालं. पूर्णवेळ किल्ला माझ्या एकट्याचाच. मी उतरून आलो तेव्हा ट्रेकर्स चढायला सुरुवात करत होते.
सव्वादहाच्या सुमारास गाडीतुन परतीच्या प्रवासाला लागलो. रस्त्याच्या कडेला काही ठिकाणी पंद दिसले. छोट्या छोट्या घोळक्याने. एका ठिकाणी तर मोठा घोळका. मागच्या महिन्यात तिकोना वर फक्त एकाच ठिकाणी पंद होते. इथे शेकड्यात सापडतील. पंद पाहून मला अमेरिकेने शोधून काढलेले क्लस्टर बॉम्ब आठवले. अमेरिकेचे क्लस्टर बॉम्ब महाप्रचंड विध्वंसकारी. सह्याद्रीतले पंद हा निसर्गाचा एक उत्कृष्ट अविष्कार.
Common name = Konkan Pinda
मराठी = पंद
Botanical name = Pinda concanensis
एका ठिकाणी छोट्या पठारावर सोनकी बहरलेली. जोडीला कुठे कुठे तेरडा.
सकाळी येताना रस्ता बघून ठेवल्याने आता परतीचा रस्ता शोधावा लागला नाही.
फुलांचे फोटो काढायला आता परत एकदा गाडी थांबवली. एकाच ठिकाणी अनेक प्रकारची फुलं होती. पांढरी छोटी खाली वाकलेली फुलं दिसली तसली मागच्या महिन्यात मला घोराडेश्वर टेकडीवर पण दिसली होती.
Common name = Clasping-Leaf Borage
Botanical name = Trichodesma inaequale
ह्याचे मराठी नाव मला माहित नाही. तुम्हाला माहित असेल तर मला सांगा.
इथे रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला पिवळी फुलं दिसली.
Common name = Bitter Luffa, wild luffa, wild ribbed gourd, wild ridge gourd
मराठी = दिवाळी
कोकणी = कोडु घोसाळे
Botanical name = Luffa acutangula
फोटो काढायला गाडी थांबवली कि दिप्तीला कधीकधी आवडत नाही. तसे आज मला बरेच फोटो काढू दिले.
Common name = Sweet Clock-Vine, White Lady
मराठी = चिमीन
Botanical name = Thunbergia fragrans
तिकोनापेठ ते पवनानगर रस्त्याला जो उतार आहे तिथे संध्याकाळी भन्नाट वारा असतो. आत्ता सकाळीही बऱ्यापैकी होता. इथून समोर पवना धरणाचा पाणीसाठा आणि त्याच्या पलीकडे दूरवर तुंग दिसतो.
तुंग पासुन जसजसे लांब गेलो तसतशी पोटातली भुकेची जाणीव वाढत गेली. मुंबई पुणे जुना रस्ता येईपर्यंत पोटासाठी काही मिळण्याची शक्यता नव्हतीच. तिथून पुढेही काही मिळेना. गणेश चतुर्थी मुळे आज सर्व ठिकाणं बंद. एखादा दिवस असा पोटाला ताण दिल्यास हरकत नाही. रोजच न चुकता वेळच्या वेळी खायला मिळत असेल तर न खायला मिळालेली परिस्थिती पोटाला कधी समजतच नाही. आता जेवायची वेळ झालीच आहे, घरी जाऊन जेऊया असा विचार केला. पण वाकडला शिव सागर समोर थांबलो. स्वच्छ पण अतिशय खर्चिक ठिकाण आहे. पोटातला आगडोंब शांत करून घरी पोहोचलो. घरी येतानाही कुठे ट्रॅफिक लागलं नाही.
आजच्या जमेच्या बाजु :
१. दिप्ती आणि खुशीची पहिली तुंग स्वारी
२. सप्टेंबर महिन्यातलं उत्कृष्ट हवामान
३. सगळीकडे फुललेली सप्टेंबर महिन्यातली रानफुलं. फुलांची माहिती मी जर कुठे चुकीची छापून दिली असेल तर मला सांगा.
४. खुशी अवघड ट्रेक न घाबरता करते ह्याच्यावर शिक्कामोर्तब
पुढे काय :
१. दिप्तीची सापांची काल्पनिक भिती आणि खुशीची मधमाश्यांची भिती घालवणे. ह्याचा उपयोग होईल.
२. सप्टेंबर महिना आणि गणेश चतुर्थी हे दोन्हीही ट्रेकर्ससाठी "चुकवू नये असे काही" ह्या सदरात मोडतात. दोहोंचा लाभ असावा. ही विनंती.
३. मागच्या वर्षी अर्ध्यात सोडुन दिलेला कैलासगड ह्या वर्षी पूर्ण करावा म्हणतो. तसे कागदावर प्लॅन तर खूप तयार आहेत हो आमचे. रात्र थोडी नि सोंगे फार. असो. चालायचंच.
१. ह्या दिवशी रस्त्याला ट्रॅफिक नसतं. अपवाद पुण्यातुन कोकणात जाणारे रस्ते.
२. किल्ले रिकामे असतात.
आजच्या ट्रेक साठी तिकोना का निवडला ?
१. पुण्यातुन कोकणात जाणारं ट्रॅफिक आम्हाला सकाळी लागणार नव्हतं.
२. लोणावळा आणि मावळ परिसरात जून - जुलै मधे होणारी आचरट पर्यटकांची गर्दी आता संपली होती.
माझा दिवस ४:५५ ला उजाडला. तिघं आवरून घरातुन निघायला पावणे सहा होऊन गेले होते. रस्त्यावर तुरळक वाहनं. आज भल्या पहाटे उठून किल्ल्यावर निघालेले आमच्यासारखे आम्हीच. आमच्या घरापासुन तिकोना पर्यंतचा रस्ता मला पाठ आहे. गुगल मॅप च्या बाईला मी हा रस्ता सांगु शकतो.
खुशी मागच्या सीट वर आडवी झोपली होती. दिप्तीही पुढे डुलक्या काढत होती. जुन्या मुंबई पुणे रस्त्याने कामशेत पर्यंत जाऊन डावीकडचा रस्ता घेतला. पुढे पवनानगर वगैरे परिसरात काही ठिकाणी रस्त्यात खड्डे, तर काही ठिकाणी खड्ड्यात रस्ते. पण जेंव्हापासुन मी काठमांडू मधले रस्ते बघितलेत तेव्हापासुन भारतातल्या रस्त्यांना आणि ते रस्ते बनवुन घेणाऱ्यांना शिव्या घालणं सोडुन दिलंय. तिकोना किल्ल्याच्या पायथ्याचं तिकोनापेठ गाव जवळ आलं होतं. दहा मिनिटांच्या अंतरावर. एक बाई जड ओझं घेऊन चालत चालल्या होत्या. आमची गाडी येताना बघून थांबल्या. त्यांना लिफ्ट दिली. त्यांना जायचं होतं जवण गावाला. म्हणजे तिकोनापेठच्या पुढचं गाव. त्यांच्या विनंतीवरून त्यांना त्यांच्या जवण गावात सोडलं. तिकोनापेठच्या पुढे आलोच आहोत तर तिकोनाच्या ऐवजी तुंग करायचं ठरवलं.
दरवेळी तिकोना वरून तुंग बघताना तो आशेने बघत असतो. इकडे येताय ना. का नेहमीप्रमाणे तिकोनावरूनच परत. असा दुजभाव कशासाठी. आज वाट लांबडी करून तुंगकडे निघालो. लांबडी म्हणजे पवना धरणाच्या दूरवर पसरलेल्या पाणीसाठ्याला भलामोठा वळसा घालून तुंगच्या पायथ्याला पोहोचावं लागतं. तिकोनापेठ पासुन पुढे पाऊण तास.
तिकोनापेठ ते तुंग ह्या रस्त्याला ट्रॅफिक असे नाहीच. पण रस्त्याला खड्डे बरेच आहेत. त्यामुळे गाडी सुसाट चालवता येत नाही. खुशी आणि दिप्ती गाडीत झोपलेल्या असल्या कि मी गाडी फार जोरात पळवत नाही.
पवना धरणाचा पाणीसाठा आणि पलीकडे तुंग |
एका झाडावर बगळे दिसले त्यांचा फोटो घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे. पक्षांचे फोटो काढायला वेगळी लेन्स घ्यावी लागेल. ह्या १८ - ५५ लेन्स ने पक्षांचे फोटो जमत नाहीत.
नेहमी न दिसणारी जरा वेगळी फुलं दिसली कि गाडी थांबवून त्यांचे फोटो काढायला सुरुवात केली. हि लालसर पिवळी कांडी कसली आहे ते मी अजून शोधतोय. Zingiber diwakarianum असावे. नक्की माहिती नाही.
Zingiber diwakarianum असावे हे. नक्की माहिती नाही. |
थोडं पुढे गेल्यावर रस्त्याच्या कडेला एका ठिकाणी आकर्षक वेगळी फुलं दिसली. गाडी थांबवुन फोटो काढले. हि एक विषारी वनस्पती आहे. ह्या वनस्पती बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी इथे टिचकी मारा. झिम्बाब्वे ह्या देशाचे हे राष्ट्रीय फुल आहे.
कळलावी |
मराठी = कळलावी, अग्निशिखा, वाघचबका
Botanical name = Gloriosa superba
थोडं पुढे गेल्यावर पवना धरणाच्या पाणीसाठ्यात तुंग किल्ल्याचं प्रतिबिंब छान दिसत होतं. तो फोटो काही मला घेता आला नाही. एका ठिकाणी भारंगी दिसल्यावर पुढे भारंगी आणि पाठीमागे दूरवर तुंग असा फोटो घेतला.
समोर भारंगी मागे तुंग किल्ला |
मराठी = भारंगी
Botanical name = Rotheca serrata
रस्त्याच्या कडेला गवतावर पसरलेली दोन कोळ्याची जाळी दिसली. तिकोनापेठ ते तुंग हा रस्ता इतर रस्त्यांसारखा नाही. इथे ट्रॅफिक नसल्यामुळे बरंच काही आहे.
कोळ्याचं जाळं आणि कोळी |
एक दोन ठिकाणी छोटे तपकिरी रंगाचे पक्षी पळत जाताना दिसले. Quail असावे. नक्की कोणते ते मला ओळखता येत नाहीत. जमिनीवरून पळणारे असले पक्षी आम्ही तुंग तिकोना परिसरात आधीही पाहिलेत.
तुंगच्या अलीकडची छोटी टेकडी |
आठला किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचलो. पार्किंगच्या जागेत गाडी लावली. आमच्याशिवाय कोणीच नव्हते. माकडांचा एक कळप झाडांवरून उड्या मारत गेला. पार्किंगच्या जागेसमोर दोन बोर्ड आहेत तुंग किल्ल्याची माहिती देणारे ते वाचले. आजुबाजुला छोटी निळी जांभळी फुलं बरीच दिसत होती त्यांचे फोटो घेतले.
हिरवी निसुर्डी |
Common name = Lambert's Borage
मराठी = हिरवी निसुर्डी
Botanical name = Adelocaryum lambertianum
दिप्ती आणि खुशीला थोडा वेळ देऊन मग सावकाशपणे चढायला सुरुवात केली. मी पुढे, मधे खुशी आणि मागे दिप्ती. कैलासगडला दिप्तीला पुढे ठेऊन मि मागे राहिलो होतो. ति चुक परत केली नाही. फुटबॉल काय किंवा ट्रेकिंग काय, फॉर्मेशन हि लाखमोलाची गोष्ट आहे.
पिवळी स्मिथिया फुलं घोळक्याने अनेक ठिकाणी फुललेली. ह्या फुलांना मिकी माउस म्हणतात. वाऱ्याबरोबर डुलली कि मजेदार वाटतात.
स्मिथिया ... बोलीभाषेत मिकी माउस |
Common name = Hairy Smithia
मराठी = कावळा
Botanical name = Smithia hirsuta
वाटेशेजारी डावीकडे कातळात पहारेकऱ्यांची छोटी जागा खोदलेली. तिथे आता एक मारुतीची मूर्ती आहे.
पुढे नेहमीपेक्षा वेगळी फुलं दिसली. गुलाबी अडुळसा.
गुलाबी अडुळसा |
मराठी = गुलाबी अडुळसा
Botanical name = Justicia betonica
एका ठिकाणी उजवीकडे थोडं पुढे गेल्यावर खांब टाकी आहेत. दिप्ती आणि खुशीने माझा तिकडे जाण्याचा विचार हाणून पाडला.
नाजुक गुलाबी तेरड्याची फुलं सोनकीची बरोबरी करायला सगळीकडे.
तेरडा |
Common name = Garden Balsam
मराठी = तेरडा
Botanical name = Impatiens balsamina
वाटेच्या उजवीकडे थोड्या उंचावर एक पाण्याचं टाकं आहे. पावसाळ्यात निसरड्या दगडावर तिथे चढणं जरा अवघड आहे. तिथे जायचा प्रयत्न न करता आम्ही पुढे गेलो. जरा पुढे गेल्यावर पहिला दरवाजा समोर दिसायला लागला.
पहिला दरवाजा |
सप्टेंबर महिना ट्रेकिंग साठी का उत्तम असतो हा ज्याने त्याने स्वतः शोधून काढायचा प्रश्न आहे. तरी तुंगच्या पहिल्या दरवाज्याचा मी मागच्या वर्षीच्या नोव्हेंबर मधल्या एका सकाळी काढलेला फोटो पहा.
तुंगचा पहिला दरवाजा ... मागच्या वर्षीच्या नोव्हेंबर मधल्या एका सकाळी काढलेला फोटो |
पहिल्या दरवाजातुन आत गेल्यावर लगेच येतो दुसरा दरवाजा. दुसऱ्या दरवाजाकडे जाण्यासाठी उजवीकडे वळावे लागते. दरवाजासमोर गोलसर मोकळी जागा सोडली आहे. इथे शत्रू थांबला तर तिन्ही बाजूंच्या भिंतींवरून त्याच्यावर हल्ला करता येईल.
इथल्या भिंतीतल्या एका दगडात कोरलाय मारुती. शक्तीची देवता मारुती गडावर पाहिजेच.
भिंतीतल्या दगडात कोरलेला मारुती |
भिंतींमधल्या चिंचोळ्या जागेतुन पाहिलेलं विहंगम दृश्य |
कोणत्या तरी दुर्ग संवर्धन संस्थेने इथे लाकडी दरवाजा बसवलाय. मागच्या वर्षी मी इथे आलो होतो तेव्हा दरवाजा बसवण्याचं काम चालु होतं.
दुसऱ्या दरवाजाच्या आत दोन्ही बाजुला पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. देवड्या म्हणजे दरवाजाच्या आतल्या बाजुला पहारेकऱ्यांना राहण्यासाठीची जागा. देवड्या म्हणजे काय ते खुशीला सांगितले. एका देवडीत कोनाडा आहे. कोनाडा म्हणजे भिंतीतला कप्पा. वस्तू ठेवण्यासाठी. तसेच रात्रीच्या वेळी दिवा लावण्यासाठी.
दुसऱ्या दरवाजातुन आत गेल्यावर छोटं पठार आहे. इथे डावीकडे पुढे जाऊन माची आणि बुरुज पाहिले जिथे आम्ही गेलो नाही.
माची आणि बुरुज |
आम्ही आता गणेश मंदिराकडे निघालो. मी पुढे, खुशी मधे, आणि दिप्ती मागे. एका ठिकाणी वाटेत माझ्या समोरून एक छोटा काळपट साप बाजुच्या झुडुपात गेला. दिप्ती आणि खुशीला सांगितलाच नाही. सांगितला असता तर आमचा तुंग किल्ला इथेच संपला असता. आणि परतीच्या वाटेतही अनेक शंका कुशंका आडव्या आल्या असत्या.
गणेश मंदिराच्या बाजुचा छोटा तलाव हिरव्या पाण्याने भरलेला. गणेश मंदिरासमोर दिप्तीने गणपतीची आरती म्हटली. आम्ही दोघं दोन बाजुला हात जोडुन उभं राहिलो. आज गणेश चतुर्थी. तरी बरं दिप्ती गणपतीची आरती म्हणून थांबली. इतर आरत्या सुरु नाही केल्या.
गणेश मंदिरासमोरच्या छोट्या जांभळ्या फुलांचे फोटो घेतले.
करंबल |
मराठी = करंबल
कोकणी = घाटी पित्तपापड
नेपाळी = बिसाउने झार, खुर्सानी झार
Botanical name = Justicia procumbens
आजुबाजुच्या परिसरातुन मोरांचे आवाज अधून मधून ऐकू आले.
निलवंती |
Botanical name = Cyanotis fasciculata
ट्रेकिंग का करावे ह्या प्रश्नाच्या पन्नास उत्तरांपैकी काही दिप्ती आणि खुशीला समाजलीयेत. पुढे जाऊन बाकीचीही समजतील.
पांढरी छोटी फुलं आणि कळ्या काही ठिकाणी दिसल्या. एका दांडीवर एक कीटक येऊन बसला. निळसर हिरव्या पंखांचा.
पांढऱ्या फुलांची दांडी आणि त्यावर बसलेला निळसर हिरव्या पंखाचा कीटक |
Common name = Scaly-Stem Chlorophytum
Botanical name = Chlorophytum glaucum
बालेकिल्ल्यावर जायची वाट अवघड अशी नाही. पण जपुन जावे. एका बाजुला दरी आहे. गणेश मंदिर ते बालेकिल्ला ह्या भागात आज फुलांची विविधता पहायला मिळाली. सप्टेंबर असल्यामुळे. एरवी तुंग फक्त ऐतिहासिक किल्ला म्हणुन पहावा लागतो. किंवा पाऊण तासात बालेकिल्ल्यावर पोहोचायचा शारीरिक व्यायाम म्हणुन.
गजकर्णिका |
Common name = Konkan Begonia
मराठी = गजकर्णिका
Botanical name = Begonia concanensis
चढाईला सुरुवात केल्यापासुन एका तासात बालेकिल्ल्यावर पोहोचलो. तुंगीदेवीचे मंदिर पाहिले. मंदिरासमोरची खोदीव गुहा पाहिली. खालच्या गावातले आवाज इथे ऐकू येत होते. तुंग किल्ल्याचा बालेकिल्ला इतर सर्व किल्ल्यांच्या बाल्लेकिल्ल्यांपेक्षा छोटा असेल. पण इथून चहुबाजूंना दूरपर्यंत नजर ठेवता येते. तुंग किल्ल्याची समुद्रसपाटीपासुनची उंची आहे ३५३० फूट. पवन मावळातला तुंग हा एक घाटरक्षक किल्ला होता. जुन्या काळी बोरघाटामार्गे चालणाऱ्या वहातुकीवर लक्ष ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याचा उपयोग होत असे. बालेकिल्ल्यावरून लोहगड, विसापुर, कोराईगड, तिकोना, मोरगिरी हे किल्ले दिसतात. दरवेळी तिकोना वरून तुंग पहातो. आज तुंग वरून तिकोना पहात होतो.
पिवळ्या सोनकीचा बहर तिकोनापेठ सोडल्यापासुन अधे मधे सोबतीला होता. इथे बालेकिल्ल्यावरही.
सोनकी |
Common name = Graham's groundsel
मराठी = सोनकी
Botanical name = Senecio bombayensis
बालेकिल्ल्यावर फोटो उत्कृष्ट येतात. फोटोग्राफी सुरु करतोय तोपर्यंत दिप्तीला एक मधमाशी चावली. इथे खूप मधमाशा आहेत ह्याची दिप्ती आणि खुशीला आता जाणीव झाली. मग काय. राहिली फोटोग्राफी. चला तडक खाली. जितकी फुलं तितक्याच मधमाशा. मधमाशा आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाच्या आहेत. कशा ते तुम्हाला माहिती नसेल तर हे वाचा. हे हि वाचा. आणि हे पण वाचा.
बालेकिल्ल्यावरून सभोवतालचं दृश्य |
मी दोन चार फोटो काढतोय तो पर्यंत दिप्ती आणि खुशी माझ्या पुढे पटापट उतरून गेल्या. गळ्यात अडकवलेला कॅमेरा सांभाळत उतरायला मला वेळ लागत होता. तसाही उतारण्यात मी सावकाशच आहे. चढण्यात मी वेग पकडतो. पायातली ताकद चढताना कामी येते. उतरताना ताकदीचे काय काम. उतरताना शरीराचा तोल सांभाळण्याचं कसब उपयोगाचं. पाण्याची टाकं आहेत तिकडे दिप्ती आणि खुशीला जायचं नव्हतं. तिथे जायची वाट जिथे आहे तिथपर्यंत मी यायच्या आताच दोघी तिथून खाली सटकल्या. खुदुखुदु हसत होत्या. थोडं उतरून गेल्यावर थांबुन आणलेली बिस्कीटं खाल्ली. पाणी प्यायलो.
मी पुढे राहुन माझ्या मागे खुशी आणि तिच्या मागे दिप्ती असे आता उतरायला लागलो. मी मुद्दामच वेग कमी ठेवला. पळू नको म्हणून खुशीला अधेमधे सांगितलं. तुंग किल्ल्यावरून उतरताना कोणी पाय सटकुन दरीत खाली पडलं तर डायरेक्ट डोंगराच्या तळाला जाऊन थांबणार. अधे मधे कुठे स्टॉप नाही. ह्या वर्षीच एक मुलगी उतरताना दरीत खाली पडुन मृत्युमुखी पडली. असो. आम्ही तिघेही कुठेही न धडपडता एक एक टप्पा उतरत होतो.
दुसऱ्या दरवाजाच्या समोरच्या भागात गेल्यावर तिथून समोर भिंतीपकडे सूर्यदेव पृथ्वीवरील सर्व जीवजंतुंना ऊर्जा देण्याचे कार्य अखंड नित्यनेमाने करताना दिसत होते. त्यांचा एक वेगळा फोटो घेण्याचा प्रयत्न केला. मोबाईल मधून काढलेल्या फोटोत असे चमकदार सूर्यकिरण कधीच दिसत नाहीत. मला तरी कधीच जमलं नाहीये मोबाईल मधून असला फोटो काढायला.
चमकदार सूर्यकिरण फोटोत पकडण्याचा एक प्रयत्न |
भिंतीवर बसून फोटोग्राफी |
इथून एक वाट माची आणि बुरुजाकडे जाते तिकडे जायला परत दिप्ती आणि खुशीचा नकार. दरवाजातुन पलीकडे किल्ला उतरत निघालो. पुन्हा एकदा सगळ्यात पुढे मी, मधे खुशी, आणि मागे दिप्ती.
दूरवर पसरलेला पवना धरणाचा पाणीसाठा सगळ्यात डावीकडे दिसतोय तो तिकोना |
इथे काही छोटे खेकडे आणि बेडूक दिसले. एक खेकड्याचं पिल्लू पूर्ण लाल रंगाचं होतं.
बेडुक घसरड्या दगडावर चिकटुन बसलाय पाठीवर फुलाच्या पाकळीचा तुकडा |
खुशी sure footed आहेच. उतरताना न घाबरता पटापट उतरते. कसलाही गडबड घोटाळा नको म्हणून पुढे राहून मी अधे मधे अर्ध्या मिनिटांचे छोटे ब्रेक घेतले.
तुंग उतरताना शेवटचा टप्पा |
उतरताना शेवटच्या टप्प्याला तीव्र उतार आहे. घसारा (स्क्री) कुठेच नाही. दगडात होल्ड मिळतात. फोटोग्राफी करत करत पाऊण तासात उतरून आलो. आम्ही उतरून आलो तेव्हा नवख्या ट्रेकर्स ची एक टोळी चढायला सुरुवात करत होती. माझ्या तुंगच्या मागच्या भेटीत असंच झालं. पूर्णवेळ किल्ला माझ्या एकट्याचाच. मी उतरून आलो तेव्हा ट्रेकर्स चढायला सुरुवात करत होते.
सव्वादहाच्या सुमारास गाडीतुन परतीच्या प्रवासाला लागलो. रस्त्याच्या कडेला काही ठिकाणी पंद दिसले. छोट्या छोट्या घोळक्याने. एका ठिकाणी तर मोठा घोळका. मागच्या महिन्यात तिकोना वर फक्त एकाच ठिकाणी पंद होते. इथे शेकड्यात सापडतील. पंद पाहून मला अमेरिकेने शोधून काढलेले क्लस्टर बॉम्ब आठवले. अमेरिकेचे क्लस्टर बॉम्ब महाप्रचंड विध्वंसकारी. सह्याद्रीतले पंद हा निसर्गाचा एक उत्कृष्ट अविष्कार.
पंद |
मराठी = पंद
Botanical name = Pinda concanensis
एका ठिकाणी छोट्या पठारावर सोनकी बहरलेली. जोडीला कुठे कुठे तेरडा.
दिप्तीची फोटोग्राफी |
फुलांचे फोटो काढायला आता परत एकदा गाडी थांबवली. एकाच ठिकाणी अनेक प्रकारची फुलं होती. पांढरी छोटी खाली वाकलेली फुलं दिसली तसली मागच्या महिन्यात मला घोराडेश्वर टेकडीवर पण दिसली होती.
Clasping-Leaf Borage |
Common name = Clasping-Leaf Borage
Botanical name = Trichodesma inaequale
ह्याचे मराठी नाव मला माहित नाही. तुम्हाला माहित असेल तर मला सांगा.
इथे रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला पिवळी फुलं दिसली.
दिवाळी |
Common name = Bitter Luffa, wild luffa, wild ribbed gourd, wild ridge gourd
मराठी = दिवाळी
कोकणी = कोडु घोसाळे
Botanical name = Luffa acutangula
फोटो काढायला गाडी थांबवली कि दिप्तीला कधीकधी आवडत नाही. तसे आज मला बरेच फोटो काढू दिले.
चिमीन |
Common name = Sweet Clock-Vine, White Lady
मराठी = चिमीन
Botanical name = Thunbergia fragrans
तिकोनापेठ ते पवनानगर रस्त्याला जो उतार आहे तिथे संध्याकाळी भन्नाट वारा असतो. आत्ता सकाळीही बऱ्यापैकी होता. इथून समोर पवना धरणाचा पाणीसाठा आणि त्याच्या पलीकडे दूरवर तुंग दिसतो.
समोर पवना धरणाचा पाणीसाठा ... पलीकडे तुंग उत्तम दृश्यमानता ... पाण्याचा गडद निळा रंग इथे कधी न पाहिलेला |