शाळेत असताना कधी वाटायचं दूर दूर जाऊन सगळीकडे फिरावं. विहिरीतल्या बेडकासारखं एका जागी राहू नये. ऊन पाऊस वाऱ्याला घाबरू नये. ज्या देशात जन्म घेतलाय तो देश फिरून बघावा. इतिहासाच्या मारकुट्या आणि भूगोलाच्या रागीट चिडक्या शिक्षकांच्या पलीकडे जाऊन हे विषय खरे काय आहेत ते बघावे.
समोर येईल तो डोंगर चढून जावा.
आपल्यासारखेच चार मित्र भेटावे जे तहान भूक विसरून आपल्याबरोबर दिवसभर फिरतील.
जगाला फाट्यावर मारून स्वतःला हवं तसं जगावं.
उंचावरच्या भिंतींवर धिटाईने आरामात बसावं.
ज्या भागात गेलोय तो पूर्ण प्रदेश पालथा घालावा. मग एकेक गोष्टी सापडत जाव्या. पाडलेली देवळं, भंगलेल्या मुर्त्या, वाड्यांचे अवशेष, मध्ययुगीन पायविहिरी.
इतिहासाच्या पुस्तकापलीकडचा ह्या देशाचा खरा इतिहास उलगडत जावा.
गावं शहरं रस्ते गल्ल्या धुंडाळत फिरावं.
प्लॅन मध्ये नसलेल्या पण जरा वेगळ्या जागा दिसल्या तर थांबावं.
ज्ञात अज्ञात सगळ्या जागा पाहता याव्या. जे पाहतो ते काय आहे तिथे का आहे हे जाणून घ्याची इच्छा असावी.
तोफा बुरुज चोरवाटा बघताना चतकोर हत्तीचं बळ मिळावं.
एखाद्या डोंगरकपारीत दोन घटका विश्रांती घ्यावी. घळीतलं थंडगार पाणी प्यावं.
कधी अचानक एखाद्या जागी दगडी तोफगोळे सापडावे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरा फक्त प्रतिज्ञेपुरत्याच न राहता त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा.
दिवसभराच्या शोधमोहीमेनंतर शांतपणे धरणाच्या भिंतीवर बसावं. तिथे सूर्य डोंगराआड जावा.
असं म्हणतात कि प्रत्येक कुत्र्याचा एक दिवस येतोच. काहींना कमी वाट पाहावी लागते तर काहींना जास्त.
 |
समोर येईल तो डोंगर चढून जावा |
 |
आपल्यासारखेच चार मित्र भेटावे जे तहान भूक विसरून आपल्याबरोबर दिवसभर फिरतील |
 |
जगाला फाट्यावर मारून स्वतःला हवं तसं जगावं |
 |
उंचावरच्या भिंतींवर धिटाईने आरामात बसावं |
 |
ज्या भागात गेलोय तो पूर्ण प्रदेश पालथा घालावा. मग एकेक गोष्टी सापडत जाव्या. पाडलेली देवळं, भंगलेल्या मुर्त्या, वाड्यांचे अवशेष, मध्ययुगीन पायविहिरी. |
 |
इतिहासाच्या पुस्तकापलीकडचा ह्या देशाचा खरा इतिहास उलगडत जावा |
 |
गावं शहरं रस्ते गल्ल्या धुंडाळत फिरावं |
 |
प्लॅन मध्ये नसलेल्या पण जरा वेगळ्या जागा दिसल्या तर थांबावं |
 |
ज्ञात अज्ञात सगळ्या जागा पाहता याव्या. जे पाहतो ते काय आहे तिथे का आहे हे जाणून घ्याची इच्छा असावी. |
 |
तोफा बुरुज चोरवाटा बघताना चतकोर हत्तीचं बळ मिळावं. |
 |
एखाद्या डोंगरकपारीत दोन घटका विश्रांती घ्यावी. घळीतलं थंडगार पाणी प्यावं. |
 |
कधी अचानक एखाद्या जागी दगडी तोफगोळे सापडावे. |
 |
माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरा फक्त प्रतिज्ञेपुरत्याच न राहता त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. |
 |
दिवसभराच्या शोधमोहीमेनंतर शांतपणे धरणाच्या भिंतीवर बसावं. तिथे सूर्य डोंगराआड जावा. |
ठिकाण, वेळ, नाव, गाव, फळ, फुल कोणतं आहे, काय फरक पडतो? आपण समाधानी असलो तर भरून पावलो. त्यामुळे राहून राहून ह्या चार ओळी आठवतात.
माला फेरत जुग भया
फिरा न मन का फेर,
कर का मनका डारि दे
मन का मनका फेर।
हातात जपमाळ घेऊन तासनतास जपजाप्य करताना देखील ऐहिक गोष्टींपलीकडे मनाचा आवाका जात नाही. देव्हाऱ्यासमोर पूजा चालू असते पण सूनबाई मुलाशी काय खुसरपुसर करते तिकडे कान टवकारलेले असतात. नातवंडे काय उद्योग करून ठेवत आहेत, कामवाल्या बाईने भांडी नीट घासली की नाही, नवऱ्याचे जिभेचे चोचले आज योग्य प्रकारे पुरवले कि नाही, असे विचार मनात येत राहतात. मंदिरात हात जोडताना बाहेर ठेवलेली चप्पल कोणी चोरणार नाही ना, याची चिंता वाटत असेल तर त्या भक्तीला कसला आला आहे भाव. माळ फिरवताना देखील त्यांच्या मनोभूमिकेत काडीचा फरक आढळत नाही. म्हणून कबीर सांगून गेला,
"माला फेरत जुग भया, फिरा न मन का फेर" हातात जपमाळ आणि मनात कचरा ठासून भरलेला असेल, डोक्यात नको ते विचार थैमान घालत असतील तर असा जप केला काय आणि नाही केला काय, कसला फरक पडणार आहे?
"कर का मनका डारि दे" हातातली जपाची माळ टाकून दे, "मन का मनका फेर" मनाचा मणी फिरव.
पद्धत कशी का असेना, हे जमलं तर भरून पावलो.
No comments:
Post a Comment