कुठल्यातरी गप्पांमध्ये माझा एक मित्र एकदा म्हणाला - इंग्रज गेले पण इंग्रजी सोडून गेले. विषय वाटतो त्यापेक्षाही बराच गहन आहे. असो. बोलू त्याविषयी जमलं तर कधीतरी. भारताच्या ABC पैकी C म्हणजे क्रिकेट हा गोऱ्या साहेबाने इथे सोडलेला खेळ. त्याच इंग्रजीचा एक भाग.
इथे इंग्रज हा खेळ खेळायचे तेव्हा इथल्या जनतेला ह्या खेळाबद्दल अप्रूप होतं. साहेबाचा खेळ म्हणून. काहीजण तर साहेबाचा खेळ कसा खेळायचा ते शिकले. सर्वसामान्यांच्या कल्पनेपलीकडची गोष्ट. दहा पाच वर्षात कधीमधी साहेबाच्या खेळात साहेबालाच हरवलं तर जग जिंकल्याचा आनंद व्हायचा.
मग साहेबाच्याच देशात जाऊन वर्ल्ड कप काय जिंकला. जगात देश एकशे चौऱ्यांशी. त्यातले आठ देश म्हणतात आम्हीच फक्त वर्ल्ड कप खेळणार. बाकीचे खेळायला पात्र नाहीत. अहो जगभरात इतरही शेकडो खेळ आहेत. त्यांच्याही स्पर्धा होतात. पण फक्त आम्हीच खेळायला पात्र, बाकीचे सगळे अपात्र असा माजुर्डेपणा इतर कोणी केलेला दिसत नाही. आणि खेळ तरी कसला. ह्या खेळात कुरापतींना, खाबुगिरीला, भांडणांना अनेक जागा. मग होणार काय. खेळ राहिला देखाव्याला आणि पैशाचा बाजार चालु.
खेळाला पुढं करून त्याच्यामागुन चालणारा बाजार कल्पना करवणार नाही इतका मोठा. तो राहुद्या. उघडपणे खिशातला टॉवेल बाहेर काढुन दाखवतात. घराघरात टीव्ही समोर बसलेलं खुळं बघतंय. दूरवर बसलेले डॉन हजारो कोटी कमावतायत. दिसायला आकर्षक असलं तरी हे आहे चिखलाचं डबकं. दिसतं तसं नसतं. म्हणून तर जग फसतं.
इथे इंग्रज हा खेळ खेळायचे तेव्हा इथल्या जनतेला ह्या खेळाबद्दल अप्रूप होतं. साहेबाचा खेळ म्हणून. काहीजण तर साहेबाचा खेळ कसा खेळायचा ते शिकले. सर्वसामान्यांच्या कल्पनेपलीकडची गोष्ट. दहा पाच वर्षात कधीमधी साहेबाच्या खेळात साहेबालाच हरवलं तर जग जिंकल्याचा आनंद व्हायचा.
मग साहेबाच्याच देशात जाऊन वर्ल्ड कप काय जिंकला. जगात देश एकशे चौऱ्यांशी. त्यातले आठ देश म्हणतात आम्हीच फक्त वर्ल्ड कप खेळणार. बाकीचे खेळायला पात्र नाहीत. अहो जगभरात इतरही शेकडो खेळ आहेत. त्यांच्याही स्पर्धा होतात. पण फक्त आम्हीच खेळायला पात्र, बाकीचे सगळे अपात्र असा माजुर्डेपणा इतर कोणी केलेला दिसत नाही. आणि खेळ तरी कसला. ह्या खेळात कुरापतींना, खाबुगिरीला, भांडणांना अनेक जागा. मग होणार काय. खेळ राहिला देखाव्याला आणि पैशाचा बाजार चालु.
चिखलाचं डबकं |
No comments:
Post a Comment