ह्यावर्षीच्या जानेवारी महिन्यात यंगुन अर्ध मॅरेथॉन माझ्याकडून यशस्वीरित्या पूर्ण झाली. त्यानिमिताने यंगुन शहराची भ्रमंती झाली. त्या अनुषंगाने वाचकांच्या ज्ञानात काही भर पडावी म्हणून हा (नसता) खटाटोप.
इतर काहीही सांगायच्या आधी, एक अतिशय महत्वाचे - एका कठीण प्रसंगात असूनही मला साथ देऊन माझी ट्रिप सफल होऊ देण्यासाठी माझ्या बायडीचे शंभर आभार. घरातल्या भक्कम पाठिंब्या शिवाय सातासमुद्रापार झेंडे लावणे शक्य होत नसते.
ह्या सफरीची ट्रॅव्हल स्टाईल :
माझं यंगुन मध्ये भेट देण्याचं कारण होतं तिथे १९ जानेवारी २०२० रोजी आयोजित केलेली अर्ध मॅरेथॉन धावण्यासाठी. भारतीय नागरिकांसाठी म्यानमार मध्ये सध्या व्हिसा-ऑन-अरायव्हल आहे. पण ई-व्हिसा काढलेला बरा असा विचार करून मी वेळेत ई-व्हिसा काढला. म्यानमार चा ई-व्हिसा काढण्यासाठी अधिकृत वेब साईट आहे https://evisa.moip.gov.mm/Tourist
म्यानमार चा ई-व्हिसा काढणे सोपे आहे. ट्रॅव्हल एजन्ट कडे न जाता आपण स्वतः म्यानमार चा ई-व्हिसा काढू शकतो. वेब साईट वर अर्ज भरल्यानंतर ई-व्हिसा मिळायला तीन दिवस लागतात. टुरिस्ट ई-व्हिसा घेतल्यापासून तीन महिन्यात वापरायचा असतो. टुरिस्ट ई-व्हिसा घेऊन २८ दिवस म्यानमार मध्ये राहू शकतो.
म्यानमार चे चलन आहे कॅट. हे चलन भारतात मिळत नाही. कारण बँका, ट्रॅव्हल एजन्ट वगैरे कोणी ते ठेवत नाहीत. म्यानमार ला जाताना अमेरिकी डॉलर बरोबर घेऊन जावे लागतात. तिथे गेल्यावर अमेरिकी डॉलर देऊन बदल्यात म्यानमार कॅट घ्यावे लागतात. एक महत्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकी डॉलरच्या मळक्या नोटा तिथे नेऊ नयेत. कोऱ्या करकरीत घड्या न पडलेल्या नोटा न्याव्यात. तसेच शंभर डॉलरच्या नोटांना चांगला भाव मिळतो. एक डॉलर, दोन डॉलर, पन्नास डॉलर वगैरे नोटा तुमच्याकडे असतील तर त्याही घेऊन जा. काही ठिकाणी त्या उपयोगी पडतात.
कॅट हे नाव क्याथा ह्या पारंपारिक वजन मोजायच्या एककावरून पडले आहे. पूर्वीच्या काळी १६.३ ग्राम चांदी हे प्रमाण क्याथा असे होते. आणि आज अंदाजे १५०० कॅट दिल्यावर १ अमेरिकी डॉलर मिळतो. पहा दुनिया कुठच्या कुठे गेलीये.

- हौशी आणि नवख्या पर्यटकांसाठी सावधानतेचा इशारा - प्रदेशाची योग्य माहिती करून घेतल्याशिवाय एकट्याने भ्रमण (solo travel) करणे धोक्याचे ठरू शकते. साहसाला सावधतेची जोड असावी.
- ह्या लेखाला जर "माझीच लाल" असा वास आला तर लेखकाचा तसा कोणताही उद्देश नसून तो निव्वळ योगायोग समजावा.
ह्या सफरीची ट्रॅव्हल स्टाईल :
- Sports trip + Backpacker trip
- Solo trip
माझं यंगुन मध्ये भेट देण्याचं कारण होतं तिथे १९ जानेवारी २०२० रोजी आयोजित केलेली अर्ध मॅरेथॉन धावण्यासाठी. भारतीय नागरिकांसाठी म्यानमार मध्ये सध्या व्हिसा-ऑन-अरायव्हल आहे. पण ई-व्हिसा काढलेला बरा असा विचार करून मी वेळेत ई-व्हिसा काढला. म्यानमार चा ई-व्हिसा काढण्यासाठी अधिकृत वेब साईट आहे https://evisa.moip.gov.mm/Tourist
म्यानमार चा ई-व्हिसा काढणे सोपे आहे. ट्रॅव्हल एजन्ट कडे न जाता आपण स्वतः म्यानमार चा ई-व्हिसा काढू शकतो. वेब साईट वर अर्ज भरल्यानंतर ई-व्हिसा मिळायला तीन दिवस लागतात. टुरिस्ट ई-व्हिसा घेतल्यापासून तीन महिन्यात वापरायचा असतो. टुरिस्ट ई-व्हिसा घेऊन २८ दिवस म्यानमार मध्ये राहू शकतो.
मला मिळालेला म्यानमार चा टुरिस्ट ई-व्हिसा |
म्यानमार चे चलन आहे कॅट. हे चलन भारतात मिळत नाही. कारण बँका, ट्रॅव्हल एजन्ट वगैरे कोणी ते ठेवत नाहीत. म्यानमार ला जाताना अमेरिकी डॉलर बरोबर घेऊन जावे लागतात. तिथे गेल्यावर अमेरिकी डॉलर देऊन बदल्यात म्यानमार कॅट घ्यावे लागतात. एक महत्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकी डॉलरच्या मळक्या नोटा तिथे नेऊ नयेत. कोऱ्या करकरीत घड्या न पडलेल्या नोटा न्याव्यात. तसेच शंभर डॉलरच्या नोटांना चांगला भाव मिळतो. एक डॉलर, दोन डॉलर, पन्नास डॉलर वगैरे नोटा तुमच्याकडे असतील तर त्याही घेऊन जा. काही ठिकाणी त्या उपयोगी पडतात.
म्यानमार कॅट Myanmar Kyat |
कॅट हे नाव क्याथा ह्या पारंपारिक वजन मोजायच्या एककावरून पडले आहे. पूर्वीच्या काळी १६.३ ग्राम चांदी हे प्रमाण क्याथा असे होते. आणि आज अंदाजे १५०० कॅट दिल्यावर १ अमेरिकी डॉलर मिळतो. पहा दुनिया कुठच्या कुठे गेलीये.
म्यानमार कॅट मधले वस्तूंचे भाव भारतीय रुपयात कसे ओळखायचे त्याचे गणित सोपे आहे. म्यानमार कॅट मधला जो भाव आहे त्यातला एक शून्य उडवायचा. उरलेल्या रकमेच्या निम्मी रक्कम म्हणजे भारतीय रुपयातली अंदाजे किंमत. जसे, एखाद्या वस्तूचा भाव जर २००० म्यानमार चॅट असेल तर एक शून्य उडवल्यावर राहिले २००. त्याच्या निम्मे १००. म्हणजे त्या वस्तूची किंमत अंदाजे १०० भारतीय रुपये. हे जमायला मला चार दिवस लागले. तोपर्यंत मी घरून बनवून नेलेले हे कागद प्रत्येक ठिकाणी उपयोगी पडले.
एअरपोर्ट वर उतरल्या उतरल्या दिसेल त्या पहिला काउंटर वर चलन बदलून घेऊ नये. एअरपोर्ट वर चांगला रेट देत नाहीत. शहरातल्या मार्केट मध्ये चांगला रेट देतात.
एअरपोर्ट मधून बाहेर पडल्यावर आपल्याला जायचे असते हॉटेलवर. ट्रेन, टॅक्सी, किंवा बस मध्ये त्यांचे स्थानिक चलन चालते. जे आपल्याकडे नसते. ह्यावर उपाय काय. माझा उपाय तुम्हाला पटेलच असे नाही. मी तशी गॅरंटीही देत नाही. तुमचा प्रश्न तुम्ही स्वतः सोडवायचाय. इथे मी माझा उपाय सांगत आहे. तो आहे एअरपोर्ट मधून बाहेर पडून हॉटेलपर्यंत चालत जाणे. दचकून जाऊ नका. जर तुम्ही मॅरेथॉन रनर असाल किंवा ट्रेकर असाल आणि तुमच्याकडे मोबाईल फोन असेल आणि त्यात गुगल मॅप असेल तर हे करता येते.
कसे ते सांगतो. ट्रिप ची तयारी करताना हे करावे लागते. ज्या एअरपोर्ट वर उतरायचं त्याच्या जवळपासची हॉटेलं शोधून त्यातले योग्य ते निवडायचे. ह्या कामात गुगल मॅप उपयोगी येते. घरून निघण्याआधी गुगल मॅप मध्ये तो सर्व परिसर डाउनलोड करून ठेवायचा. एअरपोर्ट वर उतरल्यानंतर मोबाईल मध्ये गुगल मॅप चालू करायचा. त्यात बघून ठरवलेल्या हॉटेल पर्यंत चालत जायचं. यासाठी बरोबर आणलेलं सामान स्वतः उचलून न्यायची तयारी लागते. तसेच जगप्रवासाला निघाल्यासारखं चार पोती दिसेल ते सामान घरून आणायचं नाही. बॅग भरताना योग्य असेल तेवढंच सामान घ्यायचं.
सिम कार्ड नसेल तरी काही फरक पडत नाही. विमानात मोबाईल स्वीच-ऑफ करायचा नाही. फ्लाईट मोड वर ठेवायचा. विमानातून बाहेर पडल्यावर मोबाईल तसाच फ्लाईट मोड वर ठेऊन वापरायचा. मोबाईल स्वीच-ऑफ केला तर परत चालू केल्यावर त्याचा वापर करण्यासाठी त्यात सिम कार्ड असावं लागतं. पाहिजे तर काही एअरपोर्ट वर टुरिस्ट सिम कार्ड विकत मिळतात. पण जर मोबाईल फ्लाईट मोड वर ठेवला तर टुरिस्ट सिम कार्ड विकत घ्यायची गरज नाही.
काही एअरपोर्ट शहरापासून बरेच लांब असतात. अशा वेळी माझा हा उपाय कामाचा नाही. जे एअरपोर्ट शहरात किंवा शहराजवळ आहेत त्या ठिकाणी हा उपाय लागू पडतो.
हे सगळं करायचं नसेल आणि पैसे खर्च करायची तयारी असेल तर हॉटेल वाल्यांना गाडी पाठवायला सांगायची.
यंगुन एअरपोर्ट शहरापासून जवळ आहे. शहरातच आहे असं म्हटलं तरी चालेल. एअरपोर्ट वरून बाहेर पडल्यावर मी आधी ठरवलेल्या स्काय मॅन हॉटेल पर्यंत चालत गेलो. आवरून झाल्यावर श्वे ताओ म्या पागोडा बघायला गेलो. प्रत्येक दिवशी काय करायचं, कुठे जायचं त्याची मी एक यादी बनवून आणली होती.
श्वे ताओ म्या पागोडा
हि जागा पर्यटकांमध्ये फारशी प्रसिद्ध नाही. त्यामुळे इतर ठिकाणची गर्दी इथे नसते.
पत्ता = धम्मपाल टेकडी, श्वे ताओ रस्ता, मयंगोने टाउनशिप, यंगुन
प्रकार = बौद्ध पागोडा
वेळ = सकाळी ५ ते संध्याकाळी ७
तिकीट = ३००० म्यानमार चॅट, म्हणजे अंदाजे १४० भारतीय रुपये
काय पहाल = उत्कृष्ट वास्तुकला
पाहण्यासाठी लागणार वेळ = अंदाजे एक तास
पागोडांचे द्वारपाल, चिंठी
अनेक हिंदू मंदिरांच्या प्रवेशदाराजवळ जसे मूर्तिरूपातील द्वारपाल असतात तसेच ते बऱ्याच बौद्ध व जैन मंदिरांच्या प्रवेशदाराजवळ सुध्दा दिसतात. संकल्पना तीच. वेगवेगळ्या प्रदेशात ते वेगवेगळ्या प्रकारचे आढळतात. म्यानमार मधल्या पागोडांचे द्वारपाल म्हणजे सिंह सदृश्य प्राणी, ज्याला तिथल्या भाषेत चिंठी असं म्हणतात. म्यानमारच्या संस्कृतीत ह्यांना महत्वाचं स्थान आहे. पूर्वीच्या काळातली बांधकामं, पागोडातल्या छोट्या मोठ्या घंटा, नाणी, नोटा अशा अनेक ठिकाणी हे चिंठी दिसतात. म्यानमार मध्ये ह्यांच्या सारखे आणखी एका प्रकारचे द्वारपाल पाहायला मिळतात ते म्हणजे मनुसिंह. मनुसिंह म्हणजे अर्धा मानव आणि अर्धा सिंह. हे दोन चिंठी आहेत यंगून मधल्या श्वे ताओ म्या पागोडाच्या प्रवेशद्वाराजवळचे.
श्वे ताओ म्या पागोडा पाहून झाल्यावर हॉटेलच्या दिशेने थोडं अंतर चालत गेलो.
हॉटेल वर परत जाण्यासाठी सिटी बस चा स्टॉप शोधला. सिटी बस खचाखच भरलेली. चाकरमानी माणसं संध्याकाळी आपापल्या घरी परतत होती. बस मध्ये कंडक्टर नव्हता. फक्त ड्रायवर. बसच्या पुढच्या दाराजवळ एक काचेचा बॉक्स होता. त्यात प्रवासी नोटा टाकत होते. छापील तिकीट वगैरे काही मिळत नव्हते. म्यानमार बद्दलच्या माझ्या समजुतींना मोठा धक्का बसला तो इथे. पुण्यात मी जेव्हापासून राहतोय, म्हणजे १९८४ सालापासून, आजपर्यंत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले आहेत. छत्तीस वर्षात PMT सुधारू शकली नाही. जाऊदे तो एक वेगळा विषय आहे. आजचा विषय आहे यंगुन मधल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतली शिस्त. एकूणच यंगुन मधल्या रस्त्यांवरची शिस्त. जी मी दुपारी यंगुन मध्ये पोहोचल्यापासून पाहतोय.
स्काय मॅन हॉटेल जवळच्या मार्केट मध्ये चलन बदलून देणारे सापडले. रेटही चांगला मिळाला. शोधलं कि सापडतं. शोधणेवाला चाहिये.
स्काय मॅन हॉटेलच्या जवळ एक भारी रेस्टोरंट सापडले. गोल्डन क्रॅब हाऊस रेस्टोरंट. पण मी तिथे पोहोचेपर्यंत उशीर झाला होता. तिथे नऊ नंतर ऑर्डर घेत नाहीत. मी दुसऱ्या देशातून आलोय हे पाहून तिथे मला ऑर्डर घेतली जाईल असे सांगण्यात आले.
रस्सा भलता झणझणीत होता.
यंगुन मध्ये रात्री नऊ नंतर सगळी दुकानं वगैरे सगळं बंद. संध्याकाळी गर्दीने भरलेले रस्ते आता बरेचसे रिकामे.
Thursday 16 January 2020
गुरुवार १६ जानेवारी २०२०
सकाळी स्काय मॅन हॉटेल मध्ये ब्रेकफास्ट करून बाहेर पडलो. आजचा कार्यक्रम यंगुन मधल्या जमतील तितक्या ठिकाणांना भेट देणे.
स्काय मॅन हॉटेल मधून चालत निघालो. आज जमेल तितकी यंगुन परिक्रमा करण्याचा माझा विचार होता. त्या निमित्ताने मॅरेथॉन ची तयारी पण. असा दुहेरी फायदा.
आइसलँड सुपरमार्केट हे स्वच्छ, नीटनेटकं दुकान सापडलं. ड्यूरियन फळाच्या चवीची चॉकलेट इथे मिळाली.
पुढचा स्टॉप ओशन सुपरसेंटर हा भलामोठ्ठा मॉल. प्रेक्षणीय स्थळांच्या जवळच्या दुकानात अवाच्या सवा दरात खरेदी करण्यापेक्षा अशा मोठ्या मॉल मध्ये करावी. त्याच वस्तू स्वस्त किमतीत मिळतात.
ड्यूरियन फळाच्या चवीची चॉकलेट इथेही मिळाली.
यंगुन मध्ये फिरताना डोक्यावर टोपी असलीच पाहिजे. जानेवारीतच इतकी ऊन आणि गर्मी. उन्हाळ्यात इथे काय होत असेल.
ओशन सुपरसेंटर मधून बाहेर पडल्यावर पुढचा स्टॉप बांबू स्ट्रीप पागोडा, म्हणजेच ऑंग म्याय बोन थर शान मॉनेस्ट्री. मोठं आवार. गर्दी अजिबात नाही. टुरिस्ट नाहीत. त्यामुळे तिकीट नाही.
ऑंग म्याय बोन थर शान मोनेस्टरी
पत्ता = प्याय रस्ता, ९ मैल, मयंगोने टाउनशिप, यंगुन
प्रकार = बौद्ध पागोडा
वेळ = सकाळी ६ ते संध्याकाळी ७:३०
पाहण्यासाठी लागणार वेळ = अर्धा ते एक तास
इथली बुद्ध मूर्ती बांबूच्या काड्यांनी बनवलेली आहे. वरून सोनेरी रंग आहे. त्यामुळे मूर्ती लाकडाची आहे का काचेची का बांबूची ते कळायला काहीच मार्ग नाही. मूर्ती हि फक्त एक प्रतीक असते. कधी ती दगडाची असते. कधी लाकडाची. कधी धातूची. कधी काचेची. कधी प्लॅस्टिकची. मनात भाव असतील तर मूर्ती. नाहीतर नुसता दगड नाहीतर रंग दिलेलं प्लास्टिक. मूर्ती काय किंवा आणखी काही काय, फक्त आपल्या मनात अस्तित्वात असतं. इतर कुठेही नाही. बाकी संबंध जग शून्य आहे. पोकळ आणि रिक्त. समोर दिसत असलेल्या मूर्तीसारखं. खरं तर अख्ख जग म्हणजे फक्त आपल्या मनाचे खेळ आणि प्रदर्शनं. समजायला अवघड आहे. तोपर्यंत आपण आपल्या वाटेने चालत राहायचं.
इथून पुढं मी आजच्या मुक्कामाचं ठिकाण गाठलं - वाई वाई प्लेस बेड अँड ब्रेकफास्ट. गुगल मॅप मध्ये ह्या जागेबद्दलचा बऱ्याच जणांचा चांगला अभिप्राय वाचून मी हि जागा निवडली होती. आवरून बाहेर पडलो. जवळच्या दुकानातून सिम कार्ड विकत घेऊन फोन मध्ये घातलं. मग बोज्यो पार्क ह्या जवळच्या ठिकाणी भेट दिली. ह्याच नावाची दुसरी एक मोठी जागा दुसऱ्या एका ठिकाणी आहे. हे एक छोटे पार्क होते. इथून श्वे डॅगॉन पागोडा सोनेरी रंगात झळकताना दिसत होता. ज्याला मी उद्या सकाळी भेट देणार होतो.
संध्याकाळी गेलो म्यानमार प्लाझा हा मॉल बघायला. खूप मोठा चकाचक मॉल. मला माहिती असलेल्या नसलेल्या अनेक ब्रँडची दुकानं. इथल्या वस्तू सगळ्या इतर मोठ्या मॉल प्रमाणेच महाग. इथे दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर जेवण्यासाठी इतके पर्याय आहेत कि महिनाभर रोज इथे वेगवेगळे जेवता येईल. पण नऊ वाजता सगळं बंद होतं हे लक्षात ठेवावं. नऊ नंतर जेवायला मिळणं अशक्य. आणि जर मॉल मध्ये जेवायचे नसेल तर मॉलच्या समोरच्या रस्त्याकडेला अनेक पर्याय आहेत. ते नऊ नंतरही सुरु असतात.
दिवसभराच्या पायपिटीने दमलेलो होतो. परत जाताना टॅक्सी केली. टॅक्सीत बसण्यापूर्वी भाडं ठरवून घ्यायचं. टॅक्सीवाला जी रक्कम सांगेल त्यात हजार कमी करून बघावे. यंगुन मधले टॅक्सीवाले पर्यटकांना रक्कम सांगताना कधीकधी हजार वाढवून सांगतात. त्याने जर चार हजार सांगितले तर आपण तीन हजार सांगून बघावे.
Friday 17 January 2020
शुक्रवार १७ जानेवारी २०२०
सकाळी चार वाजता उठलो. कारणच तसं होतं. श्वे डॅगॉन पागोडा.
पत्ता = यंगुन मधलं सर्वात प्रसिद्ध स्थळ
प्रकार = ऐतिहासिक बौद्ध पागोडा
अधिकृत संकेतस्थळ = https://www.shwedagonpagoda.com.mm/
उंची = ९९ मीटर (३२६ फूट)
वेळ = पहाटे ४ ते रात्री १०
तिकीट = १०,००० म्यानमार चॅट, म्हणजे अंदाजे ४५० भारतीय रुपये
पाहण्यासाठी लागणार वेळ = कमीतकमी तीन तास. मला चार तास लागले.
श्वे डॅगॉन पागोडा एका टेकडीवर आहे. तिथे जाण्यासाठी चार दिशांनी मार्ग आहेत. पायऱ्यानी वर चढून जाऊ शकतो किंवा सरकत्या जिन्याने. टेकडीच्या पायथ्यालाच पायातले बूट चप्पल काढून मग पुढे जावे लागते. इथे जाताना बरोबर एक पिशवी न्या ज्यात पायातून काढलेले बूट चप्पल ठेवता येतील. म्हणजे प्रवेशद्वाराजवळ सोडलेले बूट चप्पल आणि त्यांच्यामुळे होणारी जीवाची घालमेल टाळता येईल.
पहाटे साडेपाच वाजता मी इथे पोहोचलो तेव्हा उजाडायला अवकाश होता.
मधला मुख्य स्तूप ९९ मीटर उंचीचा असून पूर्णपणे सोन्याच्या पत्र्याने आच्छादलेला आहे. टेकडीवर असल्यामुळे यंगुनच्या बऱ्याच भागातून हा दिसतो. संध्याकाळी आणि रात्री दुरून बघताना ते दृश्य जादुई भारावलेलं दिसतं. मुख्य स्तूपाच्या भोवती ६४ छोटे स्तूप आहेत.
बौद्ध मॉनेस्टरी किंवा पागोडा ह्या ठिकाणांना भेट देताना तोकडे कपडे घालून जाऊ नये. स्तूपाभोवती घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने (clockwise) फिरावे.
ह्या जागेला २६०० वर्षांचा इतिहास आहे. २६०० वर्षांपूर्वी बांधलेला पागोडा ६६ फूट उंचीचा होता. नंतर अनेकदा त्याची उंची वाढवत नेण्यात आली. अनेक बदल करण्यात आले. कधी तो पुन्हा नव्याने बांधण्यात आला. परिसरात अनेक छोट्या मोठ्या वास्तूंची भर पडत गेली.
मुख्य स्तूपाच्या सगळ्यात वरचा भाग हा एक आणखी वेगळा विषय आहे. हा संबंध सोन्याचा असून त्यात हजारो रत्ने बसवलेली आहेत. शेकडो सोन्याच्या अंगठ्या, दागिने, इतर वस्तू आहेत. ७६ कॅरट चा एक हिरा सगळ्यात वरच्या भागात बसवलेला आहे. ह्या भागाचे जवळून काढलेले फोटो बघण्यासाठी श्वे डॅगॉन पागोडाच्या आवारातल्या फोटो गॅलरी ला भेट द्यावी.
श्वे डॅगॉन पागोडा २०१८ सालापासून युनेस्को वर्ल्ड हेरिटेज च्या संभाव्य यादीत आहे.

श्वे ताओ म्या पागोडा |

तिसऱ्या आणि भात |

यंगुन मध्ये पाहिलेला एक मोठा फलक |
आइसलँड सुपरमार्केट हे स्वच्छ, नीटनेटकं दुकान सापडलं. ड्यूरियन फळाच्या चवीची चॉकलेट इथे मिळाली.
आइसलँड सुपरमार्केट |
पुढचा स्टॉप ओशन सुपरसेंटर हा भलामोठ्ठा मॉल. प्रेक्षणीय स्थळांच्या जवळच्या दुकानात अवाच्या सवा दरात खरेदी करण्यापेक्षा अशा मोठ्या मॉल मध्ये करावी. त्याच वस्तू स्वस्त किमतीत मिळतात.
ड्यूरियन फळाच्या चवीची चॉकलेट इथेही मिळाली.
ओशन सुपरसेंटर मधला खाऊ |
यंगुन मध्ये फिरताना डोक्यावर टोपी असलीच पाहिजे. जानेवारीतच इतकी ऊन आणि गर्मी. उन्हाळ्यात इथे काय होत असेल.
ओशन सुपरसेंटर मधून बाहेर पडल्यावर पुढचा स्टॉप बांबू स्ट्रीप पागोडा, म्हणजेच ऑंग म्याय बोन थर शान मॉनेस्ट्री. मोठं आवार. गर्दी अजिबात नाही. टुरिस्ट नाहीत. त्यामुळे तिकीट नाही.
बांबू स्ट्रीप पागोडाच्या आवारातील एक जागा |
ऑंग म्याय बोन थर शान मोनेस्टरी
पत्ता = प्याय रस्ता, ९ मैल, मयंगोने टाउनशिप, यंगुन
प्रकार = बौद्ध पागोडा
वेळ = सकाळी ६ ते संध्याकाळी ७:३०
पाहण्यासाठी लागणार वेळ = अर्धा ते एक तास
बांबू स्ट्रीप पागोडा |
इथली बुद्ध मूर्ती बांबूच्या काड्यांनी बनवलेली आहे. वरून सोनेरी रंग आहे. त्यामुळे मूर्ती लाकडाची आहे का काचेची का बांबूची ते कळायला काहीच मार्ग नाही. मूर्ती हि फक्त एक प्रतीक असते. कधी ती दगडाची असते. कधी लाकडाची. कधी धातूची. कधी काचेची. कधी प्लॅस्टिकची. मनात भाव असतील तर मूर्ती. नाहीतर नुसता दगड नाहीतर रंग दिलेलं प्लास्टिक. मूर्ती काय किंवा आणखी काही काय, फक्त आपल्या मनात अस्तित्वात असतं. इतर कुठेही नाही. बाकी संबंध जग शून्य आहे. पोकळ आणि रिक्त. समोर दिसत असलेल्या मूर्तीसारखं. खरं तर अख्ख जग म्हणजे फक्त आपल्या मनाचे खेळ आणि प्रदर्शनं. समजायला अवघड आहे. तोपर्यंत आपण आपल्या वाटेने चालत राहायचं.
बांबू स्ट्रीप पागोडाच्या आवारातील एक जागा |
इथून पुढं मी आजच्या मुक्कामाचं ठिकाण गाठलं - वाई वाई प्लेस बेड अँड ब्रेकफास्ट. गुगल मॅप मध्ये ह्या जागेबद्दलचा बऱ्याच जणांचा चांगला अभिप्राय वाचून मी हि जागा निवडली होती. आवरून बाहेर पडलो. जवळच्या दुकानातून सिम कार्ड विकत घेऊन फोन मध्ये घातलं. मग बोज्यो पार्क ह्या जवळच्या ठिकाणी भेट दिली. ह्याच नावाची दुसरी एक मोठी जागा दुसऱ्या एका ठिकाणी आहे. हे एक छोटे पार्क होते. इथून श्वे डॅगॉन पागोडा सोनेरी रंगात झळकताना दिसत होता. ज्याला मी उद्या सकाळी भेट देणार होतो.
बो ज्यो पार्क |
संध्याकाळी गेलो म्यानमार प्लाझा हा मॉल बघायला. खूप मोठा चकाचक मॉल. मला माहिती असलेल्या नसलेल्या अनेक ब्रँडची दुकानं. इथल्या वस्तू सगळ्या इतर मोठ्या मॉल प्रमाणेच महाग. इथे दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर जेवण्यासाठी इतके पर्याय आहेत कि महिनाभर रोज इथे वेगवेगळे जेवता येईल. पण नऊ वाजता सगळं बंद होतं हे लक्षात ठेवावं. नऊ नंतर जेवायला मिळणं अशक्य. आणि जर मॉल मध्ये जेवायचे नसेल तर मॉलच्या समोरच्या रस्त्याकडेला अनेक पर्याय आहेत. ते नऊ नंतरही सुरु असतात.
Ice Chocolate |
दिवसभराच्या पायपिटीने दमलेलो होतो. परत जाताना टॅक्सी केली. टॅक्सीत बसण्यापूर्वी भाडं ठरवून घ्यायचं. टॅक्सीवाला जी रक्कम सांगेल त्यात हजार कमी करून बघावे. यंगुन मधले टॅक्सीवाले पर्यटकांना रक्कम सांगताना कधीकधी हजार वाढवून सांगतात. त्याने जर चार हजार सांगितले तर आपण तीन हजार सांगून बघावे.
Friday 17 January 2020
शुक्रवार १७ जानेवारी २०२०
सकाळी चार वाजता उठलो. कारणच तसं होतं. श्वे डॅगॉन पागोडा.
पत्ता = यंगुन मधलं सर्वात प्रसिद्ध स्थळ
प्रकार = ऐतिहासिक बौद्ध पागोडा
अधिकृत संकेतस्थळ = https://www.shwedagonpagoda.com.mm/
उंची = ९९ मीटर (३२६ फूट)
वेळ = पहाटे ४ ते रात्री १०
तिकीट = १०,००० म्यानमार चॅट, म्हणजे अंदाजे ४५० भारतीय रुपये
पाहण्यासाठी लागणार वेळ = कमीतकमी तीन तास. मला चार तास लागले.
श्वे डॅगॉन पागोडा एका टेकडीवर आहे. तिथे जाण्यासाठी चार दिशांनी मार्ग आहेत. पायऱ्यानी वर चढून जाऊ शकतो किंवा सरकत्या जिन्याने. टेकडीच्या पायथ्यालाच पायातले बूट चप्पल काढून मग पुढे जावे लागते. इथे जाताना बरोबर एक पिशवी न्या ज्यात पायातून काढलेले बूट चप्पल ठेवता येतील. म्हणजे प्रवेशद्वाराजवळ सोडलेले बूट चप्पल आणि त्यांच्यामुळे होणारी जीवाची घालमेल टाळता येईल.
पहाटे साडेपाच वाजता मी इथे पोहोचलो तेव्हा उजाडायला अवकाश होता.
श्वे डॅगॉन पागोडा - मधला मुख्य स्तूप आणि भोवतीचे इतर छोटे स्तूप |
मधला मुख्य स्तूप ९९ मीटर उंचीचा असून पूर्णपणे सोन्याच्या पत्र्याने आच्छादलेला आहे. टेकडीवर असल्यामुळे यंगुनच्या बऱ्याच भागातून हा दिसतो. संध्याकाळी आणि रात्री दुरून बघताना ते दृश्य जादुई भारावलेलं दिसतं. मुख्य स्तूपाच्या भोवती ६४ छोटे स्तूप आहेत.
Better to see something once than to hear about it a thousand times |
बौद्ध मॉनेस्टरी किंवा पागोडा ह्या ठिकाणांना भेट देताना तोकडे कपडे घालून जाऊ नये. स्तूपाभोवती घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने (clockwise) फिरावे.
मला न समजलेला एक फलक |
ह्या जागेला २६०० वर्षांचा इतिहास आहे. २६०० वर्षांपूर्वी बांधलेला पागोडा ६६ फूट उंचीचा होता. नंतर अनेकदा त्याची उंची वाढवत नेण्यात आली. अनेक बदल करण्यात आले. कधी तो पुन्हा नव्याने बांधण्यात आला. परिसरात अनेक छोट्या मोठ्या वास्तूंची भर पडत गेली.
श्वे डॅगॉन पागोडा - मधला मुख्य स्तूप आणि भोवतीचे इतर छोटे स्तूप |
मुख्य स्तूपाच्या सगळ्यात वरचा भाग हा एक आणखी वेगळा विषय आहे. हा संबंध सोन्याचा असून त्यात हजारो रत्ने बसवलेली आहेत. शेकडो सोन्याच्या अंगठ्या, दागिने, इतर वस्तू आहेत. ७६ कॅरट चा एक हिरा सगळ्यात वरच्या भागात बसवलेला आहे. ह्या भागाचे जवळून काढलेले फोटो बघण्यासाठी श्वे डॅगॉन पागोडाच्या आवारातल्या फोटो गॅलरी ला भेट द्यावी.
फोटो गॅलरी मधला एक फोटो - मुख्य स्तूपाच्या सर्वात वरच्या भागाचा |
श्वे डॅगॉन पागोडा २०१८ सालापासून युनेस्को वर्ल्ड हेरिटेज च्या संभाव्य यादीत आहे.
बुद्ध पदचिह्न |
श्वे डॅगॉन पागोडा बघण्यासाठी उत्तम वेळ आहे भल्या पहाटे, किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी. दुपारी जाणं टाळावे. इथे गाईड हवा असेल तर अंदाजे ५०० ते १००० भारतीय रुपये लागतील.
चिंठी (जवळचा) आणि मनूसिंह (लांबचा) |
यंगुन मध्ये गेलात आणि श्वे डॅगॉन पागोडा चुकवलात तर एका खूप मोठ्या अनुभवाला मुकाल. तसं करू नका.
श्वे डॅगॉन पागोडाच्या परिसरात |
श्वे डॅगॉन पागोडा हा एक अनुभव आहे. तो प्रत्यक्ष अनुभवावा लागतो. ऐकून, वाचून, फोटो बघून तो मिळू शकत नाही.
वाई वाई प्लेस बेड अँड ब्रेकफास्ट ह्या ठिकाणी परत आलो तेव्हा दहा वाजून गेले होते. ब्रेकफास्ट ची वेळ संपून गेली होती. वाई वाई ताईंनी मला विचारलं, "भात, ऑम्लेट, आणि कॉफी चालेल का"? नाही कोण कशाला म्हणेल. जे मिळालं ते हेल्थी, चवदार, आणि पोटभर होतं.
Breakfast at Wai Wai's |
आता मी निघालो थुवन्नभूमी इव्हेंट पार्क च्या दिशेने. मॅरेथॉनचं बिब घ्यायला. बिब म्हणजे मॅरेथॉन पळताना शर्ट वर लावतात तो नंबर. तो मॅरेथॉनच्या दिवशी मिळत नाही. एक किंवा दोन दिवस आधी संयोजकांनी सांगितलेल्या ठिकाणी जाऊन घ्यावा लागतो.
टॅक्सी वाला हिंदी बोलणारा निघाला. पान खात होता. थुंकायला त्याच्या सीटच्या बाजूला एक प्लास्टिकची बाटली. रस्त्यावर एकदाही थुंकला नाही. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीच्या एका दिवसाच्या देशभक्तांना दाखवण्यासारखी गोष्ट.
थुवन्नभूमी हे सुवर्णभूमी ह्या शब्दाचं इथलं रूप. म्यानमार आणि आजूबाजूच्या इतर देशांवर मध्ययुगीन काळात हिंदू धर्माचा प्रभाव होता. बौद्ध धर्म तिथे नंतर आला.
रस्त्यात दिसलेला एक फलक |
बीब घेतल्यानंतर निघालो आयबीस हॉटेलच्या दिशेने. स्वतःच्या मालकीच्या पायगाडीने. माझं बुकिंग त्यांनी घेतलय ना ते बघायला. कारण माझ्याकडून त्यांना पेमेंट झालं नव्हतं. मॅरेथॉन च्या दिवशी सगळी हॉटेल फुल असतात. त्यामुळे त्या दिवशी हॉटेल शोधत फिरू नये. आधी बुकिंग करून ठेवावं. उद्या शनिवारी आणि नंतर रविवारी मला आयबीस हॉटेलमध्ये राहायचं होतं. मॅरेथॉनची सुरुवात आणि शेवट थुवन्नभूमी इव्हेंट पार्क मध्ये होणार होता, जे आयबीस हॉटेल पासून जवळ होतं.
जाताना वाटेत एक फुटबॉल ग्राउंड दिसलं. तिकडे मोर्चा वळवला. हि होती नॅशनल फुटबॉल अकादमी. तिथला सिक्युरिटी गार्ड हिंदी बोलणारा निघाला. त्याला बोलता केल्यावर त्याने बरीच बडबड केली. रविवारी दुपारी ह्या ग्राउंड वर मॅच आहे, बघायला या म्हणाला.
नॅशनल फुटबॉल अकादमीचं फुटबॉल ग्राउंड |
आयबीस हॉटेल मध्ये त्यांनी माझं रूम बुकिंग ठेवलं आहे ह्याची खात्री झाल्यावर मी माझी यंगुन मधल्या ठिकाणांची लिस्ट काढून बघितली. जवळपासचं कोणतं ठिकाण बघावं ते ठरवण्यासाठी. चौक हतात गयी पागोडा इथून जवळ होता. त्या दिशेने वाटचाल सुरुवात केली. गुगल मॅप मध्ये बघितल्याप्रमाणे चौक हतात गयी पागोडा जवळ आला तेव्हा रस्त्यात एक दुसरा बौद्ध पागोडा दिसला. तोही बघावा म्हटले.
आवई यार पागोडा
पत्ता = श्वे गॉन दिने रस्ता, बहान टाउनशिप, यंगुन
प्रकार = बौद्ध पागोडा
वेळ = सकाळी ६ ते संध्याकाळी ८
पाहण्यासाठी लागणार वेळ = अर्धा तास
आवई यार पागोडा |
हि काही प्रसिद्ध जागा नाही. इथे भेट देणारं माझ्याशिवाय कोणीच नव्हतं. इथल्या माणसाने मला जिन्याने वर चढून जा असा इशारा केला. त्याप्रमाणे जिन्याने वर चढून गेलो. उंचावरून आजूबाजूचा बराच परिसर दिसत होता. आपल्याकडे जसा मूर्त्यांना केशरी रंग तसा इथे कळसांना सोनेरी रंग.
आवई यार पागोडा |
इथे तीन मांजराची पिल्लं खेळत होती. बऱ्याच बौद्ध मोनेस्टरी मध्ये मांजरं असतात. का ते मला अजून समजलं नाहीये.
मांजराचं पिल्लू |
इथून बाहेर पडल्यावर थोड्या अंतरावर होता चौक हतात गयी पागोडा, जो बघायला मी इथे आलो होतो.
चौक हतात गयी पागोडा
पत्ता = श्वे गॉन दिने रस्ता, बहान टाउनशिप, यंगुन
प्रकार = बौद्ध पागोडा
वेळ = सकाळी ६ ते संध्याकाळी ८
काय पहाल = ६५ मीटर लांब बुद्ध मूर्ती
पाहण्यासाठी लागणार वेळ = एक तास
चौक हतात गयी पागोडा मधली ६५ मीटर लांब बुद्ध मूर्ती |
कालच्याप्रमाणे आज संध्याकाळीही म्यानमार प्लाझा हा मोठा मॉल गाठून तिथे जेवलो.
आजचं जेवण |
मॉल मधून परत जायला जी टॅक्सी केली ती वेगळीच निघाली. जग्वार, फेरारी वगैरे गाड्या जशा भन्नाट आवाज करत सुसाट जातात तसली. ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल दोन्ही गियर ट्रान्समिशन. ते बदलण्यासाठी एक छोटा रिमोट. गियर बदलण्यासाठी स्टिअरिंग व्हील वर हाताजवळ बटनं. मोकळा रस्ता मिळाला कि अशी काही वेगात निघणार कि डोळे विस्फारून समोर पाहात राहावे. बास. म्यानमार ला जे कोणी गरीब देश म्हणतात त्यांनी जीव द्या कुठेतरी.
Saturday 18 January 2020
शनिवार १८ जानेवारी २०२०
आज रोजच्यापेक्षा उशिरा, म्हणजे सात वाजता उठलो. मॅरेथॉन च्या आदल्या रात्री म्हणजे शनिवारी रात्री झोप नीट येत नाही. त्यामुळे शुक्रवारी रात्री चांगलं झोपून घ्यावं.
ब्रेकफास्ट करून आवरून बाहेर पडलो पीपल्स पार्क बघायला.
पीपल्स पार्क
पत्ता = बहान टाउनशिप, यंगुन
प्रकार = मोठी सार्वजनिक बाग
वेळ = सकाळी ७ ते संध्याकाळी ७
पाहण्यासाठी लागणार वेळ = कमीतकमी एक तास. पूर्ण फिरलात तर तीन तासही लागू शकतात.
१३० एकर जागेत पसरलेलं हे प्रचंड मोठं पार्क आहे. पूर्ण फिरून सगळं काही बघितलं तर अख्खा दिवसही जाईल. जे काही बनवायचं ते भव्य दिव्य असा म्यानमारी खाक्या दिसतो. अश्यांना आमच्या गावाला म्हणतात खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी.
पीपल्स पार्क |
पीपल्स पार्क जमेल तेवढं बघून परत आलो. वाई वाई प्लेस बेड अँड ब्रेकफास्ट हि जागा स्वस्त आणि मस्त आहे. त्यांचा निरोप घेतला. निघालो आयबीस हॉटेलच्या दिशेने.
आयबीस हॉटेल मध्ये रूम घेऊन बॅग ठेऊन माझी यंगुन मधल्या ठिकाणांची लिस्ट बघितली. अब अगला पडाव थीरी मिंगला कबा अय पागोडा.
थीरी मिंगला कबा अय पागोडा
पत्ता = कबा अय रस्ता, मयंगोने टाउनशिप, यंगुन
प्रकार = बौद्ध पागोडा
वेळ = सकाळी ६ ते संध्याकाळी ८
पाहण्यासाठी लागणार वेळ = एक तास
इथे जपानी पर्यटक अनेक मोठ्या बस मधून आलेले. एका वेळी साधारण वीस जण आत येत होते. त्यांचा रितीरिवाजाप्रमाणे सांघिक प्रार्थना करत होते. शिस्तबद्ध रितीत. गोंगाट गोंधळ म्हणजे काय आणि तो कसा करतात हे त्यांच्या गावीच नाही.
थीरी मिंगला कबा अय पागोडा - जपानी पर्यटकांची सांघिक प्रार्थना |
म्यानमारच्या स्थानिक लोकांची बुद्ध मूर्तीसमोर बसण्याची एक विशिष्ठ पद्धत आहे. सर्वजण तसेच बसतात.
थीरी मिंगला कबा अय पागोडा |
थीरी मिंगला कबा अय पागोडा पाहून झाल्यावर मी टॅक्सी करून आयबीस हॉटेलला परतलो. दुपारच्या उन्हात यंगुनच्या रस्त्यांवर चालणं अवघड जातं. थोडा वेळ आराम केला. संध्याकाळी जेवण्यासाठी बाहेर पडलो. रस्त्याच्या बाजूच्या एका गल्ली मध्ये चार जण एक छोटा वेताचा चेंडू पायाने एकमेकांकडे उडवायचा खेळ खेळत होते. ह्या खेळाला चीनलोन असं म्हणतात. हा म्यानमारचा पारंपरिक आणि राष्ट्रीय खेळ आहे. इतर खेळात असते तशी ह्या खेळात हरण्या जिंकण्याची स्पर्धा नाही. चेंडू जमिनीवर पडू न देता पायाने एकमेकांकडे उडवत ठेवायचा.
आयबीस हॉटेलच्या जवळ के के सीफुड रेस्टॉरंट हि भारी जागा सापडली.
King Prawns |
मासे आणि इतर समुद्री खाद्य खायची आवड असेल तर यंगुन सारखी जागा नाही.
आठ वाजता जेवण आटोपून हॉटेल वर परतलो. शक्य तितक्या लवकर झोपायचा प्रयत्न केला. उद्या मॅरेथॉन चा दिवस. लवकर उठायचं होतं ना.
Sunday 19 January 2020 - Race Day
रविवार १९ जानेवारी २०२०
अर्ध मॅरेथॉन पहाटे साडेपाचला सुरु होणार होती. हॉटेल च्या दारात एक रनर भेटला. दोघे थुवन्नभूमी इव्हेंट पार्क मध्ये दाखल झालो. अर्ध मॅरेथॉन सुरु व्हायला पाऊण तास वेळ होता. मॅरेथॉन च्या ठिकाणी वेळेच्या आधी हजर राहावे. दणकून पॉझिटिव्ह एनर्जी असते. ती चुकवू नये. इथे रनिंग शूज, हेल्थ ड्रिंक, हेल्थ सप्लिमेंट वगैरे अनेकविध उत्पादकांचे स्टॉल होते. जोडीला अगदी KFC पण. KFC वाले मोठ्या अक्षरात KFC लिहिलेल्या टोप्या फुकट वाटत होते. त्या कोणी घेईनात. मॅरेथॉन पळताना KFC ची टोपी घालून कोण पळेल? इथे एका हेल्थ सप्लिमेंट वाल्यांच्या स्टॉल वर त्यांनी फोटो काढण्यासाठी जागा बनवलेली. मी फोटो काढायला उभा राहिलो आणि दोन उंच सुंदर पऱ्या (किंवा बाहुल्या) येऊन माझ्या बाजूला उभ्या राहिल्या. हा फोटो नंतर बराच चर्चेत येईल असं तेव्हा मला वाटलं नव्हतं. स्थानिक रनर च्या बाजूला ह्या फारशा उभ्या राहात नव्हत्या. माझा INDIA लिहिलेला फ्लॅग लावलेला शर्ट इथे लकी ठरला.
एक बहुचर्चित फोटो |
डझनभर अर्ध मॅरेथॉन पळून झाल्यावर रनर म्हणून जे शहाणपण येतं त्याचा एक भाग म्हणजे सुरुवातीलाच दणकून जोर लावायचा नाही. सुरुवात एनर्जी राखून करायची. मुख्य एनर्जी नंतरसाठी राखून ठेवायची. सुरुवात दणकून केली तर शेवटच्या टप्प्यात बॅटरी संपलेली अवस्था होते.
तसेच स्टार्ट लाईन ला सगळ्यात पुढच्या भागातून सुरुवात करायची नाही. तिथे सुसाट धावणारे रनर असतात. त्यांच्यात आपण नको तेवढे जोरात धावले जातो आणि मग नंतर फाफलत बसतो. तसेच सगळ्यात मागून पण सुरुवात करायची नाही. तिथे सगळ्या स्लो ट्रेन गर्दी करून असतात. त्यांच्यातून वाट काढण्यात बरीच एनर्जी लागते. सुरुवात मधल्या भागातून करायची. तसेच पहिले दोन ते तीन किलोमीटर जी गर्दी असते तिचा फार विचार करायचा नाही. आपल्या स्पीड ने धावत राहायचं. गर्दीतून पुढे जाण्यासाठी सारखं डावीकडे उजवीकडे असं केलं तरी बऱ्यापैकी एनर्जी लागते. जमेल तेवढं सरळ रेषेत पळण्याचा प्रयत्न करायचा. पाच किलोमीटर वरचं वॉटर स्टेशन आलं कि तिथून पुढे गर्दी कमी होत जाते.
आणखी एक शहाणपण म्हणजे कुठेच ब्रेक न घेता अखंड पळत राहू नये. त्यामुळे इंजिन ओव्हर हीट होऊन मग थांबावे लागते. इंजिन ओव्हर हीट व्हायला लागले आहे अशी शंका आली कि एक छोटा ब्रेक घ्यावा. जरी असं वाटलं कि ह्या छोट्या ब्रेक मध्ये वेळ वाया जातोय तरी हा ब्रेक महत्वाचा असतो. ब्रेक नंतर नव्या जोमाने गाडी पुढे नेता येते. ब्रेक मध्ये फोटो एखादा काढावा. फोटो पण मिळतो आणि ब्रेक पण होतो. दुहेरी फायदा.
यंगून अर्ध मॅरेथॉन मधला एक छोटा ब्रेक |
यंगुन अर्ध मॅरेथॉन हि रोड रेस आहे. बऱ्याचश्या सपाट रस्त्यांवरून धावलेली. ऑफ-रोड, डोंगर, टेकड्या असलं काही नसलेली. माझ्या अनेक वर्ष्यांपासूनच्या सरावात ऑफ-रोड, डोंगर, टेकड्या वगैरे असल्यामुळे चढ किंवा उतार आला कि मी इतरांपेक्षा वेगात धावत होतो. सपाट रस्त्यांचा भाग आला कि काहीजण माझ्या पुढे जात. सपाट रस्त्यांवर माझा वेग इतरांपेक्षा थोडा कमी होतो. चढ उताराचे टप्पे हे आपले मित्र. माझं मॅरेथॉन पुराण हे असंच आहे. जे कठीण आहे ते शोधून त्याचा सराव करून बनलेलं. अवघड परिस्थितीत तग धरून राहायला शिकवणारं. रनिंग च्या बरोबरीला ट्रेकिंग, फुटबॉल, माउंटन बाइकिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग ह्या सगळ्याची जोड देऊन बनलेलं. दिएगो सिमिओन जसा त्याच्या ऍथलेटिको माद्रिद संघाला संयम न सोडता शेवटपर्यंत टिकून राहायला शिकवतो तसं. संधीची वाट बघत शांतपणे थांबून संधी दिसल्यावर ती न सोडणारं.
पंधरा किलोमीटर च्या आसपास माझा वेग थोडा कमी झाला. निगेटिव्ह स्प्लिट मला कधी जमले नाहीत. ते जमवण्याचा मी प्रयत्नही करत नाही. दोन तासात अर्ध मॅरेथॉन पूर्ण होणं इथून पुढे कठीण दिसत होतं. निगेटिव्ह स्प्लिट म्हणजे काय ते इथे वाचा.
फिनिश लाईन च्या अलीकडे एक वळण होतं. त्यामुळे फिनिश लाईन लांबून दिसू शकली नाही. फिनिश लाईन जर लांबून दिसली किंवा कुठे आहे ते लांबून लक्षात आले तर मला शेवटचा टप्पा वेगात पूर्ण करण्यासाठी फायदा होतो.
यंगुन अर्ध मॅरेथॉन फिनिश लाईन पर्यंतची स्प्रिंट |
घड्याळात बघून मला दोन तासापेक्षा थोडा जास्त वेळ लागला होता यंगुन अर्ध मॅरेथॉन पूर्ण करायला. नंतर वेब साईट वर रिझल्ट्स आल्यावर वेळ बघितली. दोन तास दोन मिनिटं एकवीस सेकंद. टायमिंग इथे बघितलं.
यंगुन अर्ध मॅरेथॉन दोन तास दोन मिनिटं एकवीस सेकंद |
माझा फिनिश टाइम आहे दोन तास दोन मिनिटं एकवीस सेकंद. तर नेट टाइम आहे दोन तास चौपन्न सेकंद. स्पर्धेला सुरुवात झाल्यापासूनची मोजलेली वेळ म्हणजे फिनिश टाइम. एखाद्या स्पर्धकाने ज्या वेळेला आरंभ रेषा ओलांडली त्या वेळेपासून मोजलेली वेळ म्हणजे नेट टाइम. म्हणजे ह्या स्पर्धेत आरंभ रेषा ओलांडल्यापासून मला अर्ध मॅरेथॉन पूर्ण करायला दोन तास चौपन्न सेकंद लागले. स्पर्धा साडेपाच वाजता सुरु झाली. साडेपाच वाजल्यापासूनची वेळ म्हणजे फिनिश टाइम. स्पर्धा सुरु होताना मी आरंभ रेशेपासून थोडे अंतर मागे उभा होतो. मी जिथे उभा होतो तिथून मला प्रत्यक्ष आरंभ रेषेपर्यंत जायला ८७ सेकंद लागले. गणित मांडायचं तर, नेट टाइम + आरंभ रेषेपर्यंत जायला लागलेला वेळ = फिनिश टाइम
सर्व स्पर्धकांसाठी स्पर्धेची अधिकृत वेळ हि फिनिश टाइम असते. नेट टाइम आणि फिनिश टाइम ह्यामधला हा वेळेचा फरक वाचवण्यासाठी आरंभ रेषेच्या जवळ उभे राहून स्पर्धेला सुरुवात करू नये. का ते मी आधी सांगितले आहेच.
यंगुन अर्ध मॅरेथॉन |
कामगिरी फत्ते. आता आजूबाजूला फिरून फोटो काढणे.
यंगुन अर्ध मॅरेथॉन |
फिनिशर मेडल खिशात घालून हॉटेल वर परतलो. ब्रेकफास्ट केला. अंघोळ केली. पूर्ण दुपारभर हॉटेल वर आराम केला. जवळच्या ग्राउंड वरची फुटबॉल मॅच बघायला जायचा विचार मनात आला होता. पण थकव्याने त्यावर मात केली. संध्याकाळी बाहेर पडलो. के के सीफुड रेस्टॉरंट गाठलं.
Baked Prawns |
उद्याचा दिवसाचा कार्यक्रम म्हणजे यंगुन मधली राहिलेली ठिकाणं पाहणे. पहाटे उठून सुले पागोडा पासून सुरुवात करायचं ठरवलं.
Monday 20 January 2020
सोमवार २० जानेवारी २०२०
माझा स्टॅंडर्ड टाइम म्हणजे पाच वाजता उठलो. आयबीस हॉटेलच्या बाहेर टॅक्सी मिळाली. ड्रायवर बोलका होता. सुले पागोडा बघून झाल्यावर बाजूच्या गार्डन मध्ये जा म्हणाला.
सुले पागोडा
पत्ता = महा बंदुला रस्ता, यंगुन
प्रकार = ऐतिहासिक बौद्ध पागोडा
वेळ = पहाटे ६ ते रात्री ८
पाहण्यासाठी लागणार वेळ = अर्धा ते एक तास
सुले पागोडा मला फारसा भावला नाही. कदाचित श्वे डॅगॉन पागोडा बघून झाल्यावर इतर जागा त्यासमोर फिक्या पडत असाव्या.
सुले पागोडा |
सुले पागोडा आतून बघून झाल्यावर बाहेरूनही बघावा. थोडं लांब उभं राहून. बाजूच्या महा बंदुला गार्डन मधून.
महा बंदुला गार्डन
पत्ता = महा बंदुला रस्ता, यंगुन
प्रकार = सार्वजनिक तसेच ऐतिहासिक बाग
वेळ = पहाटे ५ ते रात्री ८
पाहण्यासाठी लागणार वेळ = अर्धा तास
मॉर्निंग वॉक आणि सकाळच्या व्यायामासाठी इथे बरेच जण आलेले. बहुतेक सगळे पन्नाशीच्या पुढचे. त्यातल्या एक आज्जी माझ्या मनात घर करून गेल्या. चेहरा सुरकुतलेला. हालचाली वयोमानाप्रमाणे संथ. पण कपडे माउंटन बाइकिंग चे. त्यांच्या माउंटन बाईक च्या बाजूला उभ्या. बहुत काय सांगणे. फोटो पाहून घ्या. माझ्याकडून त्यांना शंभर सॅल्यूट.
महा बंदुला गार्डन मधून बाहेर पडल्यावर मी आजूबाजूचे रस्ते धुंडाळत फिरलो. हा यंगुन मधला जुना भाग. पुण्यातल्या शनिपार किंवा बंगलोरच्या बसवनगुडी भागाची आठवण झाली. जुन्या झालेल्या इमारती. काही ठिकाणी जुन्या इमारती पडून नव्या बांधलेल्या. फुटपाथ वर अनेक छोटे मोठे विक्रेते. विकायला सगळ्या स्थानिक आणि पारंपरिक वस्तू. विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल.
तासभर फिरल्यावर हॉटेलच्या दिशेने निघालो. अर्ध मॅरेथॉन पळून झाल्यावर तास दोन तास पायी चालणं काहीच वाटत नाही. जाताना रस्त्याच्या कडेला एक भाजी बाजार असतो तसलं मार्केट लागलं. सर्व प्रकारच्या स्थानिक मालाने भरलेली छोटी छोटी दुकानं. त्यांच्यामधून चालायला छोट्या वाटा. एका कोपऱ्यात मासे बाजार.
इथून हॉटेल चालत जायला बरंच लांब होतं. पण टॅक्सीसाठी हे अंतर फारच कमी होतं. तसंच इथे टॅक्सी कोणी दिसेना. सायकल रिक्षावाले इथे बरेच थांबलेले. पण त्यांच्यातल्या कोणालाही इंग्लिश समजेना. मला कुठे जायचंय ते सांगण्यासाठी आयबीस हॉटेलचं कार्ड दाखवून एका दुकानदाराकडून मदत घेतली. आयबीस हॉटेल जिथे आहे त्या भागात सायकल रिक्षावाले येत नाहीत असे समजले. दमलो होतो. पण चालत राहिलो. पर्याय नव्हता.
दहाच्या आत हॉटेलवर पोहोचलो तरच ब्रेकफास्ट मिळणार होता. बरंच अंतर गेल्यावर एक सायकल रिक्षावाला मिळाला. सायकल रिक्षा स्टॅन्ड च्या बाजूला बसलेल्या एका माणसाने माझ्याशी हिंदीत आणि सायकल रिक्षावाल्याशी स्थानिक भाषेत बोलून मध्यस्ती केली. असे हिंदी बोलू शकणारे काही जण सापडतात यंगुन मध्ये. मूळचे भारतीय असलेले हे एक दोन पिढ्यांपूर्वी म्यानमार मध्ये येऊन राहिले असणार.
सायकल रिक्षा म्हणजे काळा घोडा सायकलला बाजूला दोन माणसं बसतील अशी व्यवस्था केलेली. यंगुनच्या ठराविक जुन्या भागातच ह्या सायकल रिक्षा चालतात. मोठ्या रस्त्यांवर कधीच येत नाहीत.
यंगुन मधली सायकल रिक्षा |
टॅक्सी पेक्षा सायकल रिक्षा भलती महाग पडली. असो. वेळेला उपयोगी पडली ते बघून पुढे जायचं. आयबीस हॉटेलला वेळेत पोहोचून ब्रेकफास्ट केला. मग जवळचं फुटबॉल स्टेडियम बघायला निघालो.
थुवन्ना फुटबॉल स्टेडियम |
स्टेडियम रिकामं होतं. खास स्टेडियम बघायला आलेला इथे मी एकटाच. हौस. दुसरं काय.
थुवन्ना फुटबॉल स्टेडियम |
स्टेडियम मधून बाहेर पडल्यावर टॅक्सी केली जनरल ऑंग सॅन पार्कला जाण्यासाठी.
जनरल ऑंग सॅन पार्क
पत्ता = नाट मौक रस्ता, यंगुन
प्रकार = सार्वजनिक बाग
वेळ = सकाळी ८ ते रात्री १०
तिकीट = नाही
पाहण्यासाठी लागणार वेळ = एक तास
ह्या जागेला बोज्यो पार्क असं म्हणतात.
जनरल ऑंग सॅन पार्क मधून पाहिलेला श्वे डॅगॉन पागोडा |
बोज्यो पार्क मध्ये युटोपिया टॉवर हा एक पाच मजली मनोरा आहे. सर्वात वरच्या मजल्यावर जाण्यासाठी तिकीट आहे. इथून संध्याकाळी फोटो अप्रतिम येतील.
तळ्याच्या पलीकडे करावैक पॅलेस हे बोटीच्या आकारात बांधलेलं आलिशान हॉटेल आहे.
जनरल ऑंग सॅन पार्क मधून पाहिलेला करावैक पॅलेस |
संध्याकाळी म्यानमार प्लाझा मॉल गाठून तिथे जेवलो.
Tuesday 21 January 2020
मंगळवार २१ जानेवारी २०२०
आज परतीचा दिवस. सकाळी आयबीस हॉटेलच्या जिम मध्ये गेलो. नंतर आवरून ब्रेकफास्ट केला. बॅग भरली. आयबीस हॉटेल मधली रूम सोडून एअरपोर्ट गाठलं. यंगुन एअरपोर्ट मोठं आहे. गर्दी नाही.
विमानात बसण्यापूर्वी टिपलेला फोटो |
म्यानमार ला प्रत्यक्ष भेट देईपर्यंत म्यानमार हा मला एक लष्करी सत्तेखाली दबून गेलेला, गरीब जनतेचा, मागासलेला देश वाटत होता. त्यातच पाश्चात्य देशातली मीडिया रोहिंग्यांना डोक्यावर बसवून नाही नाही त्या बनवलेल्या बातम्या सगळीकडे पसरवत असते. आपल्या देशातली मीडिया जशी बिनडोक (आणि बऱ्याचदा देशविरोधी) आहे तशीच पाश्चात्य देशातली मीडियाही बेअक्कल आणि ठराविक चार धनदांडग्यांचा इशाऱ्यावर नाचणारी आहे. त्यांच्या मनात असतील त्याच बातम्या छापून देणारी. खरं खोटं काय ते स्वतः प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्यावरच कळतं. आज एकविसाव्या शतकात इतर देशांच्या बरोबरीने म्यानमार उत्तम प्रगती करत असताना स्वतःच्या परंपरा, स्वतःचं वेगळेपण जपून आहे. श्रीमंत लोकांचा गरीब देश होण्याऐवजी समाधानी लोकांचा श्रीमंत देश होणं चांगलं हे समजून आहे. केवळ लोकशाहीच्या नावाखाली बेशिस्त बेताल जनता असण्यापेक्षा लष्करी सत्ता आणि लोकशाही ह्यांचा समतोल असलेलं सरकार कधीही चांगलं. पुढच्या काही वर्षात म्यानमार प्रगती करत पुढे घोडदौड करेल हे निश्चित.
Epilogue
Myanmar has been plagued with conflicts for decades. A long running civil war is in progress. Although there may be conflicts going on in some of the border states, most of the Burmese people do not give the crisis much thought. Most of the Burmese people are aware that the conflict is complex, and the government’s actions are fair.
When I arrived in Yangon and walked out of the airport, I was cautious and reticent. I was mindful of everything I did, lest I get locked up by the government for misspeaking, or offending a citizen. Now I realize that those thoughts are simply laughable. Yangon is absolutely safe to travel. When asked to buy something or take a taxi, a simple “no thanks” suffices, and the conversation is done. No heckling nor pressure.
Hope, love and optimism the Burmese people display is sometimes subtle, but never mistaken. The politeness and the hospitality of the Burmese folks is clearly visible to a seasoned traveler.
Now as I reflect on Yangon and the Burmese people, it is my hope that this country continues the path towards democratizing their government and advancing the lives of their people. The people deserve a country that will bring them wealth and prosperity. They deserve a future for themselves and for their children. Hopefully the world sees the diamond in the rough that is Myanmar, separates it up from the gravel, and recognizes its brilliance.